Posts

Showing posts from November, 2021

आकड्यांमधील गुपित ओळखण्याची कला

Image
  आकड्यांमधील गुपित ओळखण्याची कला सध्या वेगवेगळया साधनांमध्ये आणि माध्यमांद्वारे माहितीच्या साठा प्रचंड मोठ्या संख्येने गोळा होत असतो. या साठ्यात अनेक बाबी दडलेल्या असतात. त्याचा शोध अंकगणीतीय आणि सांख्यिकी आकडेमोडीचे तंत्र वापरुन घेता येतो. हे कार्य अचुकपणे करण्याचं काम सांख्यिकीशास्त्रातील तज्ज्ञ करतात. स ध्या वेगवेगळया कंपन्या, संस्था, कार्पोरेट हाऊसेस आणि उद्योगांकडे विविध प्रकारच्या माहितीचा प्रचंड साठा गोळा होत आहे. समाजमाध्यमांचा वापर करुन फेसबुक, गुगल, व्हॉटस ॲप या कंपन्या आपली व्यक्तिगत माहिती गोळा करताहेत. यासर्व माहितीच्या साठयाचा उपयोग त्याच्या विश्लेषणानंतरच होऊ शकतो. असं विश्लेषण करण्याचं कौशल्य सांख्यिकी तज्ज्ञांना प्राप्त करता येते. सांख्यिकीशास्त्र हे उपलब्ध माहितीवरुन निष्कर्ष काढणारं शास्त्र आहे. यामध्ये शास्त्रोक्तरीत्या माहिती गोळा करणं, अर्थ लावणं, वस्तुनिष्ठ पध्दतीनं ही माहिती सादर करणं या बाबिंचा यात समावेश होतो. अचुक निष्कर्षाचं तंत्र विविध प्रयोगातून मिळालेल्या माहितीवर आधारित निष्कर्ष काढण्यासाठी सांख्यिकी तंत्राचा वापर केला जातो. आपल्या जीवनाशी...
Image
आयुर्वेदाचे वाढते महत्व करोना विषाणुवर मात करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे उपयुक्त ठरु शकतात की नाही या बाबत साशंकता असली पर्यायी उपचार पध्दती म्हणून त्याचा विचार सुरु झाला आहे. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उत्पादनांचा वापर मात्र उपयुक्त ठरु शकतो, हे या काळात सर्वमान्य झाले. आयुष मंत्रालयाने सुध्दा आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर करण्याची सूचना केली. शरीरातील विविध आजार किंवा व्याधी आयुर्वेदातील तंत्र- कौशल्य-उपचार पध्दती-औषधी मूल्य असलेल्या वनस्पतींचा वापर करुन दूर करता येणे शक्य असल्याची खात्री अनेकांना पटू लागली आहे. त्यामुळे यापुढील काळात आयुर्वेदाचे महत्व देश आणि विदेश पातळीवरही मोठे वाढेल. महाराष्ट्रात एमबीबीएसच्या समकक्ष दर्जा बीएएमएस पदवीस देण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय नोकऱ्यांमध्ये दोन्ही पदव्यांचा समानतेने विचार केला जातो. आयुर्वेद डॉक्टरांना यापुढे कॉर्पोरेट रुग्णालये, हेल्थ स्पा, मेडिकल टुरिझम ( वैद्यकीय पर्यटन ) च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली केंद्रे, याठिकाणीही करिअर संधी मिळू शकतात. या विद्यार्थ्यांना आयुर्वेद उपचार पध्दतीसोबत काही प्रमाणात ॲलोपथी ...