गुणवत्तेला संशोधनाची जोड
गुणवत्तेला संशोधनाची जोड मुलं आयआयटीच्या ( इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ) प्रवेशासाठी जीवाजी बाजी लावून प्रयत्न करतात. चांगल्या गुणांनी जेईई ( जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन ) मेन परीक्षा उत्तीर्ण होऊन ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरतात. साधारणत: ही संख्या दीड ते दोन लाखांपर्यंत जाते. सहा ते लाख विद्यार्थ्यांमधून दोन लाखात येणे ही मोठीच बौध्दिक कामगिरी समजायला हवी. २३ आयआयटीमधील एकूण जागा या १६ हजारच्या आसपास आहेत. त्यात मग विविध संवर्गातील राखीव जागा आहेत. त्यामुळे ॲडव्हान्स्ड परीक्षेत उत्तम गुण मिळवूनही बऱ्याच जणांच्या पदरी आयआयटीच्या प्रवेशासाठी निराशा पडते. काही जणांना मनासारखी आयआयटी किंवा मनाजोगती ज्ञानशाखा मिळत नाही. त्यामुळे ते आयआयटीकडे जाणारी वाट वाकडी करण्याच्या निर्णयाप्रत येतात. काही विद्यार्थी तसा निर्णयही घेऊन टाकतात. मग मागची दोन तीन वर्षे किंवा त्याहुनही अधिक केलेली तयारी, सातत्यपूर्व सराव आणि प्रत्यक्ष परीक्षेतही उत्तम कामगिरी करुनही आयआयटीमधील प्रवेशापासून वंचित राहावे लागते की काय अशी स्थिती निर्माण झाल्यावर पायाखालची वाळू घसरु शकते. हताश आणि नैराश्याने...