Posts

उच्च शिक्षणाचे प्रवेशव्दार!

Image
उच्च शिक्षणाचे प्रवेशव्दार! चंद्रयान ३ चे यशस्वी उड्डाण झाल्यावर विज्ञान शाखेतील उच्च शिक्षण आणि संशोधन कार्यात तरुणांचे आकर्षण निर्माण झाल्याचे बऱ्याच जणांचे निरीक्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी केलेल्या भाषणात या बाबीचा आवर्जून उल्लेख केला. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील उच्च शिक्षण आणि संशोधन अभ्यासक्रमांसाठी भारत सरकारमार्फत प्रोत्साहन दिले जाते. या अभ्यासक्रमांसाठी शासकीय संस्थांमध्ये प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना चांगली शिष्यवृत्तीही दिली जाते. विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेतील दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण हे  आयआयटी, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआटी), नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (आयसर), इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस-बेंगळुरु, कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग-पुणे सारखे काही महत्वाचे शासकीय महाविद्यालये यांमध्ये दिले जाते. या संस्थांमध्ये प्रवेशासाठी हुषार आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला हवे. उच्चशिक्षणाचे "प्...

महिला किसान सशक्तीकरण

Image
  महिला किसान सशक्तीकरण एक केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयामार्फत महिला किसान सशक्तीकरण परियोजना (एमकेएसपी) राबवली जाते. महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी अधिकाधिक गुंतवणूक करुन त्यांचा शेतीतील सहभाग आणि उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न या योजनेव्दारे केला जातो. दिनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत राष्ट्रीय जीवनोन्नती मिशन राबवण्यात येते. महिला किसान सशक्तीकरण परियोजना हा या मिशनचा एक भाग आहे. या अंतर्गत देशभरातील ४० लाखाच्या आसपास महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आलं आहे. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती महिला शेतकऱ्यांना सुलभतेने व्हावी यासाठी महिला शेतकऱ्यांना कौशल्य प्राप्तिचं प्रशिक्षण दिलं जातं.  या प्रशिक्षणाचा कालावधी किमान २०० तास असतो. हे प्रशिक्षण राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था, राज्य कृषी व्यवस्थापन आणि विस्तार प्रशिक्षण संस्था, कृषी विज्ञान संस्था, कृषी विद्यापीठे यांच्यामार्फत दिलं जातं.

कॉर्पोरेटमध्ये यश कसं मिळवाल?

Image
  कॉर्पोरेटमध्ये यश कसं मिळवाल? कॉर्पोरेट जगात यशस्वी होण्यासाठी अनेक कौशल्याची गरज भासते. असं कौशल्य सतत हस्तगत  करावं लागतं. तरच या जगात यशाचं शीखर गाठता येतं. त्याचबरोबर उद्योग व्यवसायाच्या नेतृत्वाची जबाबदारीही मिळू शकते. याचं आजच्या काळातील महत्वाचं उदाहरण म्हणजे टाटा सन्सचे चेअरमन श्री.एन.  चंद्रेशखरन. कॉर्पोरेट अथवा उद्योगाच्या सर्वोच्च स्थानी पोहचण्यासाठी उपयुक्त ठरु शकतील असे कौशल्यर्मितीचे उच्च श्रेणीचे अभ्यासक्रम इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या,ए- बी-सी-एल” म्हणजेज अहमदाबाद, बेंगळुरु, कोलकता व लखनौ कॅम्पसेस सातत्यानं चालवित असतात. असाच एक अभ्यासक्रम,” कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीज फॉर कॉर्पोरेट लिडर्स”, हा अभ्यासक्रम आयआयएम कोलकताने सुरु केला आहे. कॉर्पोरेट मधील मनुष्यबळासाठी तो चांगलाच उपयुक्त ठरत असल्याचं दिसून आलं आहे. या अभ्यासक्रमात (१) तज्ज्ञांचं व्याख्यान, (२) विविध प्रकरण/घटनांचा अभ्यास(केस स्टडीज), (३) कार्यशाळा, (४) ऑनलाईन सादरीकरण व (५) विस्तृत व्यक्तीगत विश्लेषन या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. भविष्यात कॉर्पोरेटमध्ये महत्वाची जबाबादारी सांभ...

वेगळे पर्याय

Image
  वेगळे पर्याय (१) मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रामध्ये बीएमएस (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज)-एमबीए, हा पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन ॲडमिशन टेस्ट घेतली जाते. कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम करता येतो. त्याला सरासरीने ४५ टक्के गुण मिळायला हवेत. राखीव संवर्गासाठी गुणांमध्ये ५ टक्क्यांची सूट देण्यात येते. या अभ्यासक्रमाच्या ८५ टक्के जागा महाराष्ट्राचा अधिवास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. हा अभ्यासक्रम केल्यावर वेगवेगळया उद्योग ,व्यवसाय आणि कंपन्या यामध्ये व्यवस्थापकीय जबाबदारी पार पाडण्यासाठीच्या संधी मिळू शकतात. संपर्क- mu.ac.in/thane-sub-campus (२) सिम्बॉयसीस सेंटर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेचा बीबीए (बॅचलर ऑफ‍ बिझीनेस ॲडमीनिस्ट्रेशन) हा अभ्यासक्रम देशातील सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रमांपैकी एक समजला जातो. कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या चार वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम ...

व्हा फॅशनेबल!

Image
  व्हा फॅशनेबल! (१) स्टायलिं ग दूरचित्रवाणीवरील विविधांगी कार्यक्रम आणि कोणत्याही लाइव्ह कार्यक्रमांमध्ये स्टायलिस्ट महत्वाची भूमिका बजावत असतो . संपूर्ण कार्यक्रमाचे देखणेपण या स्टायलिस्टच्या कलाकारीवर अवलंबून असते . सध्याच्या काळात तर अनेक कलाकार स्वत : चा व्यक्तीगत स्टायलिस्ट ठेवतात . कौन बनेगा करोडपतीमध्ये ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या संपूर्ण सिझनच्या पेहराव ( पोषाख - टाय - रुमाल - कफलिंग - पादत्राणे ) यांचा सूक्ष्म विचार करण्यासाठी स्वतंत्र स्टायलिस्ट प्रत्येक सिझन सुरु होण्यापूर्वी काही महिने तयारी करत असतो . नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने सहा महिने कालावधीचा क्रिएटिव्ह फॅशन स्टायलिंग , हा अभ्यासक्रम सुरु केला आहे . या अभ्यासक्रमात समकालीन फॅशनच्या संकल्पना , छायाचित्रणाचे तंत्र , सादरणीकरण तंत्र , पोषाखांचा कल , हेअर आणि मेक अप तंत्र , साहित्याची उपलब्धता , मॉडेल कास्टिंग आदी बाबींचे ज्ञान प्रदान केले जाते . कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्...