कंपनी सेक्रेटरी
कंपनी सेक्रेटरी इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी , या संस्थेची स्थापना संसदेतील अधिनियमानुसार करण्यात आली असून कंपनी सेक्रटरी व्यवसाय , प्रशिक्षण आदी बाबत संनियंत्रण करणारी व नियमन करणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे . या संस्थेच्या वतिने चालवण्यात येत असलेल्या कंपनी सेक्रेटरीशीपचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर संबंधित उमेदवार या संस्थेचा सदस्य होतो . या संस्थेचा सदस्य झालेला कंपनी सेक्रेटरी कॉर्पोरेट सुशासन , सचीव आणि विविधांगी समस्या निवारणासाठी आवश्यक असणाऱ्या पदी नियुक्तीस कायद्याने पात्र ठरतो . कंपनी सेक्रेटरी हा कार्पोरेट प्रशासनातील महत्वाचा घटक असतो . २०१३ च्या कंपनी ॲक्टनुसार कंपनी सेक्रेटरीच्या जबाबदाऱ्या , स्थान आणि भूमिकेचे बळकटीकरण करण्यात आले असून या सर्व बाबींना वैधानिक महत्व प्राप्त करुन देण्यात आले आहे . कंपनीला लागू असलेल्या कायद्यांच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या तक्रारी व समस्यांचे अनुपालन , शंका - समाधान करण्याची महत्वाची जबाबदारी कंपनी ...