कंपनी सेक्रेटरी


 

कंपनी सेक्रेटरी

इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी, या संस्थेची स्थापना संसदेतील अधिनियमानुसार करण्यात आली असून कंपनी सेक्रटरी व्यवसाय, प्रशिक्षण आदी बाबत संनियंत्रण करणारी नियमन करणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेच्या वतिने चालवण्यात येत असलेल्या कंपनी सेक्रेटरीशीपचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर संबंधित उमेदवार या संस्थेचा सदस्य होतो. या संस्थेचा सदस्य झालेला कंपनी सेक्रेटरी कॉर्पोरेट सुशासन, सचीव आणि विविधांगी समस्या निवारणासाठी आवश्यक असणाऱ्या पदी नियुक्तीस कायद्याने पात्र ठरतो. कंपनी सेक्रेटरी हा कार्पोरेट प्रशासनातील महत्वाचा घटक असतो.

   २०१३ च्या कंपनी ॲक्टनुसार कंपनी सेक्रेटरीच्या जबाबदाऱ्या, स्थान आणि भूमिकेचे बळकटीकरण करण्यात आले असून या सर्व बाबींना वैधानिक महत्व प्राप्त करुन देण्यात आले आहे. कंपनीला लागू असलेल्या कायद्यांच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या तक्रारी समस्यांचे अनुपालन, शंका-समाधान करण्याची महत्वाची जबाबदारी कंपनी सेक्रेटरीस पार पाडावी लागते. हे करताना त्यास अनुषंगिक सचिवीय उच्चत्तम दर्जाचे पालन करावे लागते. कंपनी सेक्रेटरीस अनेक कंपन्यांमध्ये प्रमुख व्यवस्थापकीय अधिकारी म्हणूनही जबाबदारी स्वीकारावी लागते. कंपनीच्या संचालक मंडळाने उत्तम सुशासनाची तत्वे अंगिकारण्यासाठी त्यास प्रयत्न करावे लागतात त्यानुसार या मंडळाची वागणूक राहील याची खातरजमाही करावी लागते. कंपनी संचालकाच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य, कामकाज आणि अधिकारा संदर्भात वेळोवेळी गरजेनुसार कंपनी सेक्रेटरीस मार्गदर्शन करावे लागते सल्लाही द्यावा लागतो.

   २०१३ च्या ॲक्टनुसार नोंदणी झालेल्या कंपन्यांना संचालक मंडळासमोर अहवाल सादर करताना कंपनी सेक्रेटरीने तयार केलेला लेखापरीक्षण अहवाल जोडणे आवश्यक करण्यात आले आहे.

कंपनी सेक्रटेरी हा अंतर्गत लेखापरीक्षक म्हणून कार्य करु शकतो. नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल, अपिलेट ट्रायब्युनल आणि विविध प्रकारच्या अशा अर्धन्यायिक संस्थांसमोर कंपनी सेक्रेटरीस कंपनीची बाजू सक्षमरीत्या मांडण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. अशा संस्थांवर तांत्रिक सदस्य म्हणूनही कंपनी सेक्रेटरीची निवड होऊ शकते.

संपर्क- सेंटर फॉर कॉर्पोरेट गव्हर्नन्स, रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग, प्लाट नंबर १०१, सेक्टर १५, इंस्टिट्युशनल एरिया, सीबीडी- बेलापूर , नवी मुंबई- ४००६१४, ईमेल- ccgrt@icsi.edu,  संकेतस्थळ- www.icsi.edu. 0000

 

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट