Posts

Showing posts from December, 2022

सागरी व्यापार - आव्हान आणि संधी

Image
  सागरी व्यापार - आव्हान आणि संधी अनेक शतके सागरावरील वाहतुकीच्या बाबतीत भारत हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचा देश होता. मात्र काही कारणांमुळे शतकभरापूर्वी सागरी वाहतुकीतला देशाचा वाटा २५ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांवर पोहचला. त्यामुळे भारत सरकारने पुढील दशकभरात या क्षेत्रातील देशाचा वाटा १० टक्यांपर्यंत नेण्याचे उद्ष्टिय ठेवले आहे. यामुळे सागरी वाहतुकीची वाढ गतिने होणार असल्याने या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची गरजही वाढेल. त्याअनुषंगाने इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीने सुरु केलेले अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात. भारत सरकारच्या सागरी विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. या संस्थेत पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रम सुरु करता येतात. या संस्थेचे देशात सहा ठिकाणी कॅम्पस आहेत. सागरी वाहतूक उद्योगाच्या गरजा भागवणाऱ्या सध्याच्या काळाशी सुसंगत असणाऱ्या या अभ्यासक्रमांमुळे या संस्थेतील  ७०   टक्क्यांहून उमेदवारांना चांगले प्लेसमेंट मिळाले आहे. करिअर संधी या क्षेत्रासाठी आवश्यक असणारे तं...

डिजिटल करिअर संधी....(भाग दोन)

Image
    डिजिटल करिअर संधी.... ( भाग दोन ) ( १ ) डेटा ॲनॅलिटिक्स- दिवसेंदिवस वाढत चाललेल्या डेटा ( विदा/विविध स्त्रोतांकडून गोळा होणारी माहिती ) मुळे त्याचे विश्लेषण/उपयुक्तता आणि सुरक्षितता याविषयी अचुक आणि तातडिने निर्णय घेण्यासाठी या तंत्रज्ञाची गरज भासते. महत्वाच्या निर्णयासाठी कंपन्या त्यांच्याकडे उपलब्ध झालेल्या डेटा विश्लेषणाच्या निष्कर्षावर अधिकाधिक भर देऊ लागल्या आहेत. एका अहवालानुसार डिसेंबर २०२१ पर्यंत ९० लाखाच्यावर या मनुष्यबळाच्या जागा विविध कंपन्यांमध्ये रिक्त होत्या. ई- कॉमर्स, एडटेक ( एज्युकेशन टेक्नॉलॉजी ) , बीएफएसआय ( बँकिंग, फायनांशिअल सर्व्हिसेस आणि इंश्युरंस ) , लॉजिस्टिक्स या क्षेत्रातील कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर अशा तज्ज्ञांची गरज भासते आहे. या कंपन्यामंध्ये डेटा सायंटिस्ट, अनॅलिस्ट स्पेशॅलिस्ट, डिसिजन सायन्स मॅनेजर, बिझिनेस ॲनॅलिस्ट, ॲनॅलिस्ट मॅनेजर, ऑपरेशन  ॲनॅलिटिक्स मॅनेजर अशा संधी उपलब्ध झाल्या आहेत. ( २ ) क्लॉऊड कॉम्प्युटिंग - करोनामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कामकाजासाठी पारंपरिक पध्दतींपेक्षा क्लॉउुड तंत्रज्ञानासारख्या आधुनिक तंत्रज्ञान वापर...

डिजिटल करिअर संधी....(भाग एक)

Image
  डिजिटल करिअर संधी.... ( भाग एक ) डिजिटल तंत्रज्ञानातील विस्मयकारक प्रगतिमुळे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये विविधांगी बदल घडताहेत. बहुतेक सर्व उद्योग आणि कंपन्या हे तंत्रज्ञान प्राधान्याने अंगिकारत असल्याने पारंपरिक पध्दतीच्या नोकऱ्यांना यापुढे फारसे स्थान मिळणार नाही. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या विविध पैलुंचे कौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांना यापुढे अधिकाधिक संधी मिळू शकते. डेल टेक्नॉलॉजी या संस्थेच्या अहवालानुसार २०३० पर्यंत या तंत्रज्ञानामुळे ८५ टक्के नव्या पध्दती आणि प्रकारच्या करिअर संधी निर्माण होतील. हे तांत्रिक बदल लक्षात घेऊन माहिती तंत्रज्ञान आणि संगणक शास्त्राशी संबंधित वेगवेगळया उच्चशिक्षण अभ्यासक्रमात प्रमुख वा सहाय्यक विषय घटक म्हणून प्रोग्रॅमिंग लँग्वेज, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, सायबर सेक्युरिटी सारख्या विषय घटकांचा सध्या ठळकपणे समावेश करण्यात येत आहे. या विषय घटकांना व्यवस्थापन अभ्यासक्रमांमध्येही  समावेश करण्यात येत आहे. ॲनॅलिटिक्स, डेटा सायंस, आयटी, फिनटेक अशासारखे स्पेशलाईज्ड अभ्यासक्रम हे अ...

व्हा गणितज्ज्ञ भाग तीन

Image
  व्हा गणितज्ज्ञ भाग तीन सेंटर ऑफ एक्सलंस इन बेसिक सायन्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च भूवनेश्वर आणि मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जी   आणि सेंटर ऑफ एक्सलंस इन बेसिक सायन्स या विभागात गणित विषयामध्ये पाच वर्षे कालावधीच्या इन्टिग्रेटेड एम.एस्सी अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना दरमहा 5 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. ही परीक्षा 2 जून 2018 रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर,मुंबई   आणि पुणे शहरांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांची निवड नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट या परीक्षेद्वारे केली जाते. संपर्क - यूएम-डीएई सेंटर फॉर एक्सलंस इन बेसिक सायंसेस, हेल्थ सेंटर, मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी कॅम्पस कलिना, सांताक्रुज-पूर्व, मुंबई- ४०००९८, दूरध्वनी- ०२२- २६५२२४९८३, संकेतस्थळ- http://www.cbs.ac.in/ , ईमेल- info@cbs.ac.in ००० उच्चप्रतिचे संशोधन इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,पुणे या संस्थेत   गणित विषयात...

व्हा गणितज्ज्ञ (२)

Image
  व्हा  गणितज्ज्ञ  ( २ )      गणित आणि संगणकीय शास्त्र विषयातील शिक्षण देणारी आणि संशोधन कार्यास सहाय्य करणारी आपल्या देशातील एक महत्वाची संस्था म्हणून चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटने ख्याती प्राप्त केली आहे. अशा या संस्थेकडे 12 वी नंतरच्या करीअर प्लॅनिंगमध्ये महाराष्ट्रीय पालक व विद्यार्थ्यांचे फारसे लक्ष दिले जात नाही. या संस्थेची स्थापना 1989 साली करण्यात आली. प्रतिभावंत विद्यार्थी आणि दर्जेदार संशोधकांमध्ये सातत्यपूर्ण संवाद होत राहिला तरच शैक्षणिक गुणवत्तेची पातळी उंचावते असे संबंध जगात दिसून आले आहे. आपल्याकडे याकडे थोडेसे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विविध संशोधनात्मक कार्य करणाऱ्या संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या संशोधकांच्या ज्ञानापासून प्रतिभावंत विद्यार्थ्यांना वंचित रहावे लागत आहे. या बाबी लक्षात घेऊनच या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेने आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली आहे. संस्थेला भारत सरकारने विद्यापीठाचा दर्जा दिला आहे. भारत सरकार आणि इतर खाजगी उद्योग या संस्थेला वित्तीय सहाय्य करतात. उच्चत्तम दर्जा साध्य करण्यासाठी प्रयत्न ...