सागरी व्यापार - आव्हान आणि संधी
सागरी व्यापार - आव्हान आणि संधी
अनेक शतके सागरावरील वाहतुकीच्या बाबतीत भारत हा
आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचा देश होता. मात्र काही कारणांमुळे शतकभरापूर्वी
सागरी वाहतुकीतला देशाचा वाटा २५ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांवर पोहचला. त्यामुळे भारत सरकारने पुढील दशकभरात
या क्षेत्रातील देशाचा वाटा १० टक्यांपर्यंत नेण्याचे उद्ष्टिय ठेवले आहे. यामुळे सागरी वाहतुकीची वाढ गतिने होणार असल्याने
या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची गरजही वाढेल. त्याअनुषंगाने इंडियन
मेरिटाइम युनिव्हर्सिटीने सुरु केलेले अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात.
भारत सरकारच्या सागरी विकास मंत्रालयाच्या
अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला
आहे. या संस्थेत पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रम सुरु करता
येतात. या संस्थेचे देशात सहा ठिकाणी कॅम्पस आहेत.
सागरी वाहतूक उद्योगाच्या गरजा भागवणाऱ्या
सध्याच्या काळाशी सुसंगत असणाऱ्या या अभ्यासक्रमांमुळे या संस्थेतील ७० टक्क्यांहून
उमेदवारांना चांगले प्लेसमेंट मिळाले आहे.
करिअर संधी
या क्षेत्रासाठी आवश्यक असणारे तंत्र आणि कौशल्य
हस्तगत केलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या विविधांगी संधी पुढील काळात उपलब्ध होऊ
शकतात. यामध्ये (१) जहाजाचे कॅप्टन,
(२) शिप बिल्डर, (३) इंजिनीअर, (४) डिझायनर, (५) पोर्ट मॅनेजर, (६) लॉजिस्टिक्स.
खडतर
परिश्रम करण्याची तयारी, सागरावरील कोणतेही आव्हान स्वीकारण्याची मानसिकता
असलेल्या तरुणांसाठी सागरी वाहतुकीच्या क्षेत्रात उत्कृष्ट करिअर घडवता येणे शक्य
आहे.
अभ्यासक्रम
बी.एस्सी इन नॉटिकल सायन्स - हा अभ्यासक्रम १ ऑगस्ट पासून सुरु होतो. हा अभ्यासक्रम केलेल्या
उमेदवारांना सी-फेअरर्स या पदनामापासून सुरु होणारी करिअर संधी मिळते. जहाजाचा प्रवास सुरु असतो, तेव्हा जहाजाचे
कार्यान्वयन, देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता, जहाजावरील खानपान व्यवस्थापन, इतर
कर्मचारी आणि कामगार यांची तरतूद आदी कामे या उमेदवारांना करावी लागतात. भारतीय सी-फेअरर्सची कार्यक्षमता, गुणवत्ता आणि
दर्जा उत्कृष्ट असल्याने त्यांना जगभरातून मोठी मागणी आहे. या उमेदवारांना मालवाहू
जहाजांच्या संनियंत्रणाचे काम, सागरावरील दळवळणासाठी आवश्यक असलेले कौशल्य शिकवले
जाते. या युनिव्हर्सिटीच्या कोचीन आणि चेन्नई कॅम्पसमध्ये बी.एस्सी इन नॉटिकल सायन्स हा अभ्यासक्रम करता येतो.
अशी होते प्रगती
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर जहाजावरील कॅडेट
म्हणून एक वर्षाचे प्रशिक्षण आणि त्यानंतर सेंकड मेट्स परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर
मर्चंट नेव्ही जहाजावरील तिसऱ्या क्रमांकाचा अधिकारी म्हणून नियुक्ती मिळते. सध्या
अशा उमेदवारांना दरमहा २२०० अमेरिकन
डॉलर्स पगार मिळू शकतो. जहाजावर असताना मोफत वास्तव्य आणि भोजनाची व्यवस्था केली
जाते. अशा उमेदवारांना काही अटींसह त्यांचे उत्पन्न करमुक्त मिळण्याचीही तरतूद
आहे. अशा उमेदवारांची वार्षिक कामगिरी, तज्ज्ञता आणि अनुभव लक्षात घेउुन त्यांना,
सेकंड ऑफिसर- चिफ ऑफिसर – जहाजाचा कप्तान, अशी पदोन्नती मिळू शकते. यासाठी साधारणत: आठ ते दहा वर्षाचा
कालावधी लागतो. जहाजाच्या कप्तानास दरमहा
९५०० अमेरिकन डॉलर्स एवढे वेतन दिले जाते.
काय शिकाल? कॉम्प्युटर सायन्स, नॉटिकल फिजिक्स, टेरेस्टेरिअल नेव्हिगेशन, जनरल शिप नॉलेज, नॉटिकल मॅथेमॅटिक्स, कम्युनिकेशन इंग्लिश, नॉटिकल इलेक्ट्रॉनिक्स, ॲप्लाइड फिजिक्स ॲण्ड इलेक्ट्रिसिटी, शिप ऑपरेशन्स टेक्नॉलॉजी, शिप कंस्ट्रक्शन, ॲप्लाइड मॅथेमॅटिक्स ॲण्ड फिजिक्स, शिप
मॅनेजमेंट, स्पेशलाइज्ड कार्गो हँडलिंग, सेलेस्टिअल नेव्हिगेशन, नॅवल आर्किटेक्चर, कोस्टल
नेव्हिगेशन, कोलिजन प्रिव्हेंशन रेग्युलेशन,
शिप ऑपरेशन टेक्नॉलॉजी, मरिन इंजिनीअरिंग वर्कशॉप, सिमॅनशिप, ब्रिज
इक्विपमेंट्स आणि ॲण्ड वॉच कीपिंग, कार्गो मेटिओरॉलॉजी, ऑटोमेशन ॲण्ड कंट्रोल
सिस्टिम, शिप स्टॅबिलिटी,
शिप मेंटनन्स आणि इर्मजन्सी, लाइफ सेव्हिंग ॲण्ड फायर फायटिंग अप्लायंसेस
अर्हता- (१) बी.एस्सी इन नॉटिकल सायन्स- १२ वी विज्ञान परीक्षेत, भौतिकशास्त्र, गणित आणि
रसायनशास्त्र या विषयासह ६० टक्के गुण मिळणे
आवश्यक.१० वी आणि १२ वीमध्ये इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण मिळणे
आवश्यक. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना एकूण गुणांमध्ये ५ टक्के सूट. इंग्रजी
विषयासाठी ही अट लागू नाही. कालावधी- तीन वर्षे.
(२) डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स - १२ वी विज्ञान परीक्षेत, भौतिकशास्त्र, गणित आणि
रसायनशास्त्र या विषयासह ६० टक्के गुण मिळणे आवश्यक किंवा ६० टक्के गुणांसह
भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयासह बी.एस्सी किंवा ६० टक्के गुणांसह बी.एस्सी इन
इलेक्ट्रॉनिक्स. तीन वर्षाच्या या अभ्यासक्रमात एका वर्षी भौतिकशास्त्राचा अभ्यास
केलेला असावा किंवा मान्यताप्राप्त
शिक्षणसंस्थेतील ५० टक्के गुणांसह बी.ई/बी.टेक पदवी. १०वी आणि १२
वीमध्ये इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण मिळणे
आवश्यक. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना एकूण गुणांमध्ये ५ टक्के सूट. इंग्रजी विषयासाठी
ही अट लागू नाही. कालावधी -एक वर्षं चेन्नई कॅम्पसमध्ये, डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स हा
अभ्यासक्रम करता येतो.
नवी मुंबई कॅम्पस
येथील टी.एस.चाणक्य प्रशिक्षण संस्थेला मोठी
परंपरा आहे. १९२७ साली या
ठिकाणी भारतीय सागरी वाहतुकीमध्ये कार्यरत नौदल अधिकाऱ्यांसाठी,डफरिन या जहाजावर
प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ट्रेंनिंग शिप राजेंद्रवर हे
प्रशिक्षण सुरु झाले. १९९३ साली ट्रेनिंग शिप चाणक्यवर हे प्रशिक्षण देण्यास
प्रारंभ झाला. सागरीय पूर्व प्रशिक्षण देणारी
आपल्या देशातील पहिली संस्था होय. या संस्थेला इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीमध्ये
समाविष्ट करण्यात आले असून २०१७ सालापासून ही संस्था, नवी मुंबई कॅम्पस या नावाने
ओळखली जाते.
या संस्थेत पुढील अभ्यासक्रम शिकवले जातात. (१) बॅचलर ऑफ सायन्स इन
नॉटिकल सायन्स, (२) डिप्लोमा इन नॉटिकल
सायन्स, (३) एम.एस्सी इन
कमर्शिअल शिपिंग आणि लॉजिस्टिक
संपर्क-१) इंडियन मेरिटाइम
युनिव्हर्सिटी, टी. एस. चाणक्य, कारवे, नेरुळ, नवी मुंबई- ४००७०६, दूरध्वनी-
०२२-२७७०३८७६, फॅक्स - २७७०३९८, ईमेल- director.navimumbai@imu.ac.in. संकेतस्थळ- www.imunavimumbai.com.
२) ईस्ट कोस्ट रोड, सेम्मेनचेरी, चेन्नई -६००११९, दूरध्वनी-
०४४-२४५३९०२०,
संकेतस्थळ- www.imu.ac.in

Comments
Post a Comment