परदेशात जा, मात्र...
परदेशात जा, मात्र... युक्रेनच्या निमित्त आपल्या देशातील मुले-मुली मोठ्या संख्येने परदेशात शिक्षणासाठी जातात याची उदंड चर्चा झाली. ही चर्चा सुरु असतानाच, कोणकोणत्या देशात आपली मुले जातात याचा एक अहवाल प्रकाशित झाला. यामध्ये गेल्या वर्षी आपल्याकडील बरीच मुले पाकिस्तान, नेपाळ, ओमान, श्रीलंका, आखाती देश यामध्ये शिक्षणासाठी गेल्याचे नमूद आहे. ( ही माहिती संसदेत सादर करण्यात आली. ) कोण कुठे जावे,हा ज्याचा-त्याचा प्रश्न असला तरी आपल्या देशापेक्षा पाकिस्तान, नेपाळ, कतार,श्रीलंका किंवा काही आखाती देशात दर्जेदार शिक्षण मिळते, असे ज्या पालक आणि विद्यार्थ्यांना वाटते, ते धन्यच समजले पाहिजे. या मुलांनी कोणत्या ज्ञानशाखेत प्रवेश घेतला याची माहिती काही प्रसिध्द झालेली नाही. तथापि एकूणच इतर देशात स्वस्तात वैद्यकीय शिक्षण घेता येते म्हणून जाणारे अधिक असतात, तेव्हा हे विद्यार्थी याच शाखेत शिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानादी देशात गेले असावेत असे समजू या. मुलांना डॉक्टरच करायचे असेल तर एमबीबीएस वगळून भारतात बीएएमएस ( आयुर्वेद ) , बीएसचएमस ( होमिओपॅथी ) बीयूएमएस ( युनानी ) , नेचरोपथी, बॅचलर ऑफ आक्युपेशन...