Posts

Showing posts from May, 2023

"पंचकर्म"तंत्रकौशल्य आणि संधी

Image
  " पंचकर्म " तंत्रकौशल्य आणि संधी शरीरातील अनावश्यक कचरा, विषारी द्रव्य/ पदार्थ बाहेर काढून शरीराच्या शुध्दीकरणाची प्रक्रिया पंचकर्म तंत्राव्दारे राबवली जाते. शरीरात खोलवर रुजलेला तणाव आणि आजारावर मात करण्यासाठी पंचकर्म उपयुक्त ठरु शकते. पंचकर्म हे आयुर्वेदातील एक   महत्वाची उपचार पध्दती समजली जाते. सध्याच्या काळात धावपळीमध्ये विविध ताण- तणाव आणि जीवनशैलिशी निगडित शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यावरील उत्तम उपाय म्हणून पंचकर्म तंत्राकडे बघितलं जातं. ही बाब लक्षात आल्यानं देश-विदेशात पंचकर्म प्रकिया करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांचा ओढा वाढत चालल्याचे दिसून येतं. त्यामुळे पुढील काळात या विषयातील जाणकार किंवा तंत्रकौशल्य हस्तगत केलेल्या मनुष्यबळाला आयुर्वेद रुग्णालये, पंचकर्म केंद्रे, आरोग्य केंद्रे ( हेल्थ रिसॉर्ट ) , वेलनेस सेंटर, पुनर्वसन केंद्रे या ठिकाणी करिअरच्या विविध संधी मिळू शकतात. हे पंचकर्म पाच पध्दतीचे असल्याने त्याला पंच म्हणजे पाच आणि कर्म म्हणजे पध्दती किंवा प्रकिया असं संबोधलं जातं. शरीरास वेगवेगळया प्रकारचे आजार होऊ नये म्हणून या उपचार पध्दतीत, प्रत...

१० वी नंतरचे तंत्र कौशल्य

Image
  १० वी नंतरचे तंत्र कौशल्य खरं तर १२ वी नंतरच   मुलांच्या करिअरचा मार्ग स्पष्ट होतो. दिशा बऱ्यापैकी निश्चित होऊ शकतात. मात्र बऱ्याच पालकांना १० वीनंतरच मुलांच्या करिअरची दिशा स्पष्ट व्हावी असे वाटत असते. त्यात काहीही वावगे नाही. तथापि ही त्यांची स्वत:ची इच्छा असते की मुलालाही तसे वाटते हे समजून घेणे आवश्यक ठरते. १० वीनंतर मुलांचा सर्वसाधारण कल, आवड याची बऱ्यापैकी कल्पना आल्यास व त्याबाबत पालक आणि मुलांच्या मनात कोणताही गोंधळ नसल्यास मुलांनी १० वीनंतरही आपला मार्ग निवडायला हरकत नाही. विशेषत: तांत्रिक विषयात रस आणि गती असल्याचे लक्षात आल्यास अशा मुलांनी कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम करायला हरकत नाही. भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेझरिंग इंस्ट्रुमेंट्स या संस्थेने असे कौशल्य निर्मितीचे बरेच अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण सुरु केले आहेत. हे अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या करिअर संधी मिळाल्या आहेत. हे अभ्यासक्रम प्रात्यक्षिकावर भर देणारे आणि सैध्दांतिक पाया मजबूत करणारे आहे...

स्मार्ट फॅशन, मस्त करिअर

Image
  स्मार्ट फॅशन, मस्त करिअर लग्नात नटणार नाही, सजणार नाही ती वधु कसली ? म्हणजे लग्नात विधी पासून संगितापर्यंत, सजावटी पासून, लज्जतदार भोजनापर्यंत साऱ्याच बाबी महत्वाच्या असतातच. पण वधुचा साजशृंगाराची बात काही और असते. या सोहळ्यातला हा एक महत्वाचा आणि वधुच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. सध्या तर समकालीन वधु पोषाखाच्या डिझाइनवर विशेष लक्ष दिलं जातं. " आता नाही तर मग केव्हा, " हा त्यामागचा दृष्टिकोन असतो. नववधुच्या पोषाखाच्या डिझाइनचे क्षेत्र आता करिअर घडविण्यासाठीसुध्दा उपयुक्त ठरु शकते. हे कौशल्याचे क्षेत्र असून त्याविषयीचा प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासक्रम, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम, कंटेम्प्ररी ब्रॉयडल ट्रोस्स्यू डिझाइन , या नावाने ओळखला जातो. हा अभ्यासक्रम या संस्थेच्या निरंतर शिक्षण पध्दतीच्या उपक्रमांतर्गत करता येतो. फॅशनेबल वस्त्रांचे डिझाइन, निर्मिती, विक्री या क्षेत्रांमध्ये आवड असणाऱ्या आणि हटके काही करु इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी हा अभ्यासक्रम रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवण्याच्या अनुषंगाने उपयुक्त ठरु शकत...