करिअरची दिशा
करिअरची दिशा १० वी नंतरच करिअरची दिशा स्पष्ट होते असे समजण्याचे काही कारण नाही. १० वीनंतर कोणत्या ज्ञानशाखेत म्हणजे वाणिज्य- विज्ञान- कला यामध्ये जायचे का ? हे ठरवता येऊ शकते. १२ वीनंतर अभियांत्रिकी - वैद्यकीय- डिझाइन- फॅशन तंत्रज्ञान- व्यवस्थापन- विधि- संशोधन आदी विविध करिअरचे पर्याय उपलब्ध होतात. पदवीनंतर याच शाखांमधील पदव्युत्तर पदवी किंवा इतर विषयातील पदव्युत्तर पदवी ( उदा-एमबीए-मास्टर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन / मास्टर ऑफ फॅशन टेक्नालॉजी किंवा कलाशाखेतील विषय इत्यादी ) , पदव्युत्तर पदवी नंतर संशोधनाकडे वळता येऊ शकते. शाखा एकिकडे..करिअर दुसरीकडे १२ वीनंतर ज्या ज्ञानशाखेला प्रवेश घेतला त्याच शाखेत करिअर होईल, असे काही ठामपणे सांगता येत नाही. ईलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनीअरिंग करुनही पहिले प्लेसमेंट ज्या ज्ञानशाखेशी फारसा संबंध येत नाही अशा संगणक शास्त्राशी सबंधित काम देणाऱ्या कंपनित मिळते. आयआयटीसह इतर संस्थांमधून अभियांत्रिकीची पदवी घेतलेले बरेच विद्यार्थी एमबीएचा मार्ग पकडतात. बऱ्याच अभियंत्यांना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा मार्ग खुणावू लागतो. बरेच जण अखिल भारतीय आणि...