कृषी क्षेत्रातील संधी इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च या संस्थेने कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, वनविद्या,अन्न तंत्रज्ञान , जैवतंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान या विषयातील पदवींना व्यावसायिक अभ्यासक्रम ( प्रोफेशनल कोर्स ) म्हणून मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे हे अभ्यासक्रम केल्यानंतर विविध क्षेत्रात करिअर संधी मिळणे अधिक सुलभ झाले आहे. बी.एस्सी ( कृषी ) हा अभ्यासक्रम केल्यावर, अधिक चांगल्या संधींसाठी संबंधित विद्यार्थी पदव्युत्तर पदवी ( एम.एस्सी ) , संशोधन ( पीएचडी ) , एमबीए या अभ्यासक्रमांच्या मार्गावरुन जाऊ शकतो. बँकिंग क्षेत्रातील कृषी/ग्रामीण भागाशी निगडित स्पेशलाइज्ड मनुष्यबळ किंवा प्रोबेशनरी ऑफिसर या पदांच्या चाळणी परीक्षेला बसू शकतो. संघ लोकसेवा आयोग, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च श्रेणीच्या पदांसाठीही तो पात्र ठरतो. सार्वजिनक आणि खाजगी क्षेत्रातील बऱ्याच कंपन्या/उद्योग यांनाही या मनुष्यबळाची गरज भासते. राज्य शासनामार्फत कृषी अधिकारी/ मृदसंधारण अधिकारी/कृषी विस्तार अधिकारी अशा पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना बस...