कृषी क्षेत्रातील संधी

इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च या संस्थेने कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, वनविद्या,अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान  या विषयातील पदवींना व्यावसायिक अभ्यासक्रम (प्रोफेशनल कोर्स) म्हणून मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे हे अभ्यासक्रम केल्यानंतर विविध क्षेत्रात करिअर संधी मिळणे अधिक सुलभ झाले आहे.

बी.एस्सी (कृषी) हा अभ्यासक्रम केल्यावर, अधिक चांगल्या संधींसाठी संबंधित विद्यार्थी पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी), संशोधन (पीएचडी), एमबीए या अभ्यासक्रमांच्या मार्गावरुन जाऊ शकतो. बँकिंग क्षेत्रातील कृषी/ग्रामीण भागाशी निगडित स्पेशलाइज्ड मनुष्यबळ किंवा प्रोबेशनरी ऑफिसर या पदांच्या चाळणी परीक्षेला बसू शकतो. संघ लोकसेवा आयोग, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च श्रेणीच्या पदांसाठीही तो पात्र ठरतो. सार्वजिनक आणि खाजगी क्षेत्रातील बऱ्याच कंपन्या/उद्योग यांनाही या मनुष्यबळाची गरज भासते.

राज्य शासनामार्फत कृषी अधिकारी/ मृदसंधारण अधिकारी/कृषी विस्तार अधिकारी अशा पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना बसू शकतो. कृषी पदवीधरास, विमा क्षेत्रातही संधी मिळू शकते. ॲग्रिकल्चरल रिसर्च सर्व्हिस एक्झामिनेशन (www.asrb.org.in)  देऊन संशोधन कार्य करण्याची संधी मिळू  शकते. या सेवेंतर्गत मुलाखतीव्दारे उपमहासंचालक, सहाय्यक संचालक, संचालक, प्रकल्प संचालक, विभागीय समन्वयक, संयुक्त संचालक, विभागीय केंद्रांवरील प्रमुख, प्रधान वैज्ञानिक, प्रशिक्षण आयोजक, वरिष्ठ संशोधक आदी पदांची भरती केली जाते.

विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट किंवा इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेची ज्युनिअर रिसर्च फेलोशीप ही परीक्षा देऊन संशोधन अभ्यासक्रम करण्याची संधी मिळू शकते. ही परीक्षा उत्तम रितिने उत्तीर्ण झाल्यास सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्रता प्राप्त होते.

ॲग्रिकल्चर सायंटिस्ट, प्रॉडक्शन मॅनेजर, फूड मायक्रोबायलॉजिस्ट, क्रॉप स्पेशॅलिस्ट,प्लान्ट जेनिटिसिस्ट, ॲग्रिकल्चरल इंजिनीअर, ॲग्रॉनॉमिस्ट, फॉरेस्टर,वाटर कंझर्व्हनिस्ट, सॉइल इंजिनीअर, फार्म मॅनेजर, फूड रिसर्चर, फर्टिलायझर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, ॲग्रिकल्चर फूड सायंटिस्ट, ॲक्वॅटिक इकॉलॉजिस्ट, हॉर्टिकल्चरालिस्ट, सॉइल ॲण्ड प्लांट सायंटिस्ट,ऑपरेशन मॅनेजर इन फर्टिलायझर युनिट, प्लँटेशन मॅनेजर बँकांमधील ॲग्रिकल्चर लोन ऑफिसर आदी करिअर संधी मिळू शकतात.

अभ्यासक्रम

महाराष्ट्रातील कृषी ‍शिक्षण - प्रशिक्षण देणाऱ्या विद्यापीठांचा दर्जा  आणि गुणवत्ता उत्तम असा आहे. या सर्व संस्थांना गेल्या काही दशकांचा चांगला अनुभव आहे. अनुभवी उच्चशिक्षित प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, विस्तीर्ण असे कॅम्पस, ग्रंथालये, वसतिगृहे, व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम, संशोधनाची आवड निर्माण व्हावी अशी अभ्यासक्रमांची संरचना आणि परवडणारे शैक्षणिक शुल्क आणि इतर सुविधा ही या संस्थांची वैशिष्ट्ये आहेत.या विद्यापीठांमार्फत पुढील अभ्यासक्रम चालविले जातात.

 () डिप्लोमा इन ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी/ ॲग्रिकल्चरल पॉलिटेक्निक. अभ्यासक्रमाचा कालावधी- तीन वर्षे. () कृषी तंत्रकिनेतन पदविका. कालावधी- दोन वर्षे. () कृषी विज्ञान पदविका/ डिप्लोमा इन ॲग्रिकल्चरल सायन्स. कालावधी- दोन वर्षे. (उपरोक्त तिनही अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा नाही.)

व्यावसायिक‍ (प्रोफेशनल) अभ्यासक्रमांचा दर्जा असलेले अभ्यासक्रम- () बॅचलर ऑफ सायन्स (बी.एस्सी) (ॲग्रिकल्चर)/ बी.एस्सी (ऑनर्स) (ॲग्रिकल्चर), कालावधी- चार वर्षे. () बी.एस्सी (हॉर्टिकल्चर)/ बी.एस्सी (ऑनर्स) (हॉर्टिकल्चर), कालावधी- चार वर्षे. () बी.एस्सी (फॉरेस्ट्री)/ बी.एस्सी (ऑनर्स) फॉरेस्ट्री, कालावधी-चार वर्षे. () बी.एस्सी (होमसायन्स)/ बी.एस्सी (ऑनर्स) (कम्युनिटी सायन्स), कालावधी- चार वर्षे. () बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक) (फूड टेक्नॉलॉजी), कालावधी- चार वर्षे. () बी.एस्सी (ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी)/ बी.टेक (बायोटेक्नॉलॉजी), कालावधी-चार वर्षे. () बी.टेक (ॲग्रिकल्चरल इंजिनीअरिंग), कालावधी- चार वर्षे.

पुढील पदवी/पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा नाही.

() बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन (ॲग्रिकल्चर)-बीबीए/ बीबीए (ऑनर्स) (ॲग्रिकल्चर) कालावधी- चार वर्षे. () मास्टर ऑफ सायन्स (एम.एस्सी) (ॲग्रिकल्चर) कालावधी- दोन वर्षे () एम.एस्सी (हॉर्टिकल्चर), कालावधी- दोन वर्षे () एम.एस्सी (पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट)/ , कालावधी- दोन वर्षे, () मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी- एम.टेक (ॲग्रिक्ल्चरल बायोटेक्नॉलॉजी), कालावधी- दोन वर्षे, () एम.टेक (ॲग्रिक्ल्चरल इंजिनीअरिंग), कालावधी- दोन वर्षे, () मास्टर ऑफ बिझिनेस ॲडमिनीस्ट्रेशन-एमबीए

प्रवेश प्रक्रिया

पदवी अभ्यासक्रमांना दोन पध्दतीने प्रवेश दिला जातो - (1) राज्यशासनामार्फत घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी - या सामायिक परिक्षेद्वारे अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी विषयक अभ्यासक्रमांच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. (2) जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन-मेन/ नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट- नीट

 () बी.एस्सी (ऑनर्स)-कृषी आणि बी.एस्सी (ऑनर्स)-उद्यानविद्या- या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र किंवा  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह एमएचटी-सीईटी किंवा नीट (एनईईटी) किंवा जेईई, () बी.एस्सी (ऑनर्स)-वनविद्या आणि बी.एफएस्सी (मत्स्यशास्त्र)- या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी  भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र  आणि जीवशास्त्र या विषयांसह एमएचटी-सीईटी किंवा नीट (एनईईटी), () बी.टेक (अन्न तंत्रज्ञान) आणि बी.टेक (कृषी अभियांत्रिकी) - या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह एमएचटी-सीईटी किंवा किंवा जेईई, () बी.टेक (जैवतंत्रज्ञान) आणि बी.एस्सी (ऑनर्स)-सामुदायिक विज्ञान - या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र  आणि जीवशास्त्र या विषयांसह एमएचटी-सीईटी किंवा नीट (एनईईटी) किंवा जेईई, () बी.एस्सी (ऑनर्स) -कृषी व्यवस्थापन - या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी -भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र  आणि जीवशास्त्र या विषयांसह एमएचटी-सीईटी किंवा नीट (एनईईटी) किंवा जेईई.

संबंधित उमेदवाराने एकापेक्षा अधिक सामाईक परीक्षा दिल्या असल्यास, ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा असेल, त्यासाठी लागू असलेल्या विषयगटात, ज्या सामाईक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेले असतील ते प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील. (उदा.-एखाद्या उमेदवाराने नीट, जेईई आणि एमएचटी-सीईटी या तिनही परीक्षा दिल्या असतील व त्यास भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या गटात, समजा नीट परीक्षेत अधिक गुण मिळाले असतील तर ते गुण ग्राह्य धरले जातात. एखाद्या विद्यार्थ्यास जेईई मध्ये सर्वाधिक गुण मिळाले असतील तर ते गुण ग्राह्य धरले जातात.)

प्रवेश अर्हता-

() भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र यापैकी कोणताही गट घेऊन १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बीएस्सी (ऑनर्स) इन- () कृषी, () उद्यान विद्या, () सामाजिक विज्ञान, () जैवतंत्रज्ञान, () कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो.

() भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र हा गट घेतलेल्या विद्यार्थ्यांना, बीएस्सी (ऑनर्स) इन- () मत्स्यविज्ञान, () वनविद्या, () पशुसंवर्धन पदवी या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो.

() भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र हा गट घेतलेल्या विद्यार्थ्यांना, बीएस्सी (ऑनर्स) इन- () कृषी अभियांत्रिकी, () अन्नतंत्रज्ञान, या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो.

रोजगार देणाऱ्या काही कंपन्या- पुढील काही कंपन्या सातत्याने रोजगार संधी देत असतात- () ड्यू पॉईंट, () रॅलिज इंडिया, () न्युझिवीदू सीड्स, () लेमकर्न इंडिया ॲग्रो इक्विपमेंट, () ॲदवंता लिमिटेड, () मोनसॅन्टो इंडिया, () पॉॲब्स ऑर्ग्यनिक इस्टेट्स, () नॅशनल ॲग्रो इंडस्ट्री, () गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड, (१०) रासी सीडस (११) पार्ले, (१२) डाबर, (१३) पातंजली, (१४) हिंदुस्थान लिव्हर (१५) कृषी तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप (उदा.- रोग आणि किटक नियंत्रण, अचूक वेळेवर जलसिंचन आणि मृदा आरोग्य, पॅकेजिंग आणि वाहतूक, शेताची हवाई पाहणी करुन पिकासंदर्भात वा जमिनीसंदर्भात समस्यांचा शोध घेणे इत्यादी)

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे

() महात्मा फुले कृषी विद्यापीठ-राहुरी, संकेतस्थळ- mpkv.ac.in  () पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोला, संकेतस्थळ-
http://www.pdkv.ac.in/
() वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ- परभणी, संकेतस्थळ- www.mkvmah.nic.in , () डॉ बाळासाहेब्सावंत कोंकण कृषी विद्यापीठ- दापोली , संकेतस्थळ- www.dbskkv.org )

सुरेश वांदिले

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी