Posts

Showing posts from November, 2023

सारे काही मुलींसाठी

Image
 सारे काही मुलींसाठी मोदी युनिव्हर्सिटी ही आपल्या देशातील फक्त मुलींसाठी चालवण्यात येणारी सर्वात मोठी खाजगी युनिव्हर्सिटी आहे. उद्योगपती आर. पी. मोदी यांनी तीस वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना केली. उच्च शिक्षणाद्वारे महिलांच्या सक्षमीकरणात या संस्थेने गेल्या तीन दशकात लक्षणीय भूमिका बजावली आहे. विविध ज्ञानशाखेतून १० हजार विद्यार्थींनींनी या संस्थेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. या संस्थेने देश आणि विदेशातील अनेक शैक्षणिक संस्थांशी शैक्षणिक सहकार्य केले आहे. त्यामुळे आधुनिक काळाशी सुसंगत ज्ञानप्रवाहांची विद्यार्थींनिंना सातत्याने माहिती होत असते.  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सर्व क्षेत्रात भारतीय महिलांना विविध क्षेत्रात उत्तम आणि प्रभावी कामगिरी बजावता यावी, त्या सक्षम आणि समर्थ व्हाव्यात,  यासाठी संस्थेमार्फत सातत्याने प्रयत्न केले जातात. उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल या संस्थेस ॲसोचाम या संस्थेच्या वतिने २०१९ साली महिलांची उत्कृष्ट शिक्षण संस्था म्हणून गौरविण्यात आले आहे. केवळ महिलांसाठी म्हणून चालवण्यात येणारी ही आशिया खंडातील आघाडीची शैक्षणिक संस्था समजली जा...

घरापासून ते घागऱ्यापर्यंत

Image
  घरापासून ते घागऱ्यापर्यंत डिझाइन हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा समजला जातो . त्यामुळेच घरापासून ते घागऱ्यापर्यंत साऱ्याच गोष्टी डिझाइन केलेल्या मिळतात . दर्जा , गुणवत्ता आणि कलात्मकता या बाबी डिझाइनशी निगडीत आहेत . उच्चवर्गापुरतं मर्यादित असलेलं , डिझायनर्स जीवन जगण्याचं स्वप्न आता उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांना पडू लागल े आहे . डिझायनिंगच्या नव्या तंत्र आणि मंत्रामुळे हे स्वप्न   साकार होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत . त्यामुळेच विविध प्रकारच्या डिझायनर्सना करिअरच्या उत्तमोत्तम संधी मिळायला लागल्या आहेत. या डिझायनर्सनी आपला अभ्यासक्रम जर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन या संस्थेतून केलेला असल्यास त्या ंच्या करि अ रचा ग्रॉफ हा सदैव चढत राहतो .     डिझायनिंगच्या क्षेत्रात उत्कृष्ट करि अ र घडविणारी संस्था असा नावलौकिक इंडियन इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन या संस्थेन े निर्माण केला असला तरी या संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी मराठी मुल े विशेष प्रयत्न करीत नाहीत . त्यामुळे या...