सारे काही मुलींसाठी
सारे काही मुलींसाठी
मोदी युनिव्हर्सिटी ही आपल्या देशातील फक्त मुलींसाठी चालवण्यात येणारी सर्वात मोठी खाजगी युनिव्हर्सिटी आहे. उद्योगपती आर. पी. मोदी यांनी तीस वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना केली. उच्च शिक्षणाद्वारे महिलांच्या सक्षमीकरणात या संस्थेने गेल्या तीन दशकात लक्षणीय भूमिका बजावली आहे. विविध ज्ञानशाखेतून १० हजार विद्यार्थींनींनी या संस्थेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. या संस्थेने देश आणि विदेशातील अनेक शैक्षणिक संस्थांशी शैक्षणिक सहकार्य केले आहे. त्यामुळे आधुनिक काळाशी सुसंगत ज्ञानप्रवाहांची विद्यार्थींनिंना सातत्याने माहिती होत असते.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सर्व क्षेत्रात भारतीय महिलांना विविध क्षेत्रात उत्तम आणि प्रभावी कामगिरी बजावता यावी, त्या सक्षम आणि समर्थ व्हाव्यात, यासाठी संस्थेमार्फत सातत्याने प्रयत्न केले जातात. उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल या संस्थेस ॲसोचाम या संस्थेच्या वतिने २०१९ साली महिलांची उत्कृष्ट शिक्षण संस्था म्हणून गौरविण्यात आले आहे. केवळ महिलांसाठी म्हणून चालवण्यात येणारी ही आशिया खंडातील आघाडीची शैक्षणिक संस्था समजली जाते.
या संस्थेतील विविध स्कूल्समार्फत (विभाग) कृषी, फिजिओथेरपी, आर्किटेक्चर, इंटेरिअर डिझाइन, फॅशन, लॉ, मॅनेजमेंट, इंजिनीअरिंग, कॉमर्स, सायन्स, आर्ट अशा विविध ज्ञानशाखांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात. संशोधनाचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते.शैक्षणिक कामगिरी उत्तम राहण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच या विद्यापीठामार्फत विद्यार्थींनींच्या चौफेर व्यक्तिमत्व विकासासाठी सर्व प्रकारचे सहाय्य केले जाते.
स्कूल ऑफ बिझिनेस विभागाचे अभ्यासक्रम
पदवी अभ्यासक्रम- बी.ए (ऑनर्स) इन इकॉनॉमिक्स, बी.कॉम (ऑनर्स) वुईथ स्पेशलायझेशन इन टॅक्सेशन किंवा अकाउंटन्सी, बीबीए आणि बीबीए इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट किंवा मार्केटिंग किंवा फायनान्स किंवा ह्युमन रिसोर्स किंवा टुरिझम मॅनेजमेंट, बी.ए (ऑनर्स) इन इकॉनॉमिक्स, ड्युएल डिग्री बीबीए ॲण्ड एमबीए. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम- एमबीए ड्युएल- स्पेशलायझेशन इन मार्केटिंग किंवा फायनान्स किंवा ह्युमन रिसोर्स किंवा टुरिझम मॅनेजमेंट. पीएचडी इन मॅनेजमेंट किंवा पीएचडी इन कॉमर्स किंवा पीएचडी इन इकॉनॉमिक्स.
या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी कॅट किंवा मॅट किंवा एनमॅट किंवा झॅट किंवा जीमॅट किंवा मोदी युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट मधील गुण ग्राह्य धरले जातात. कोणत्याही विद्याशाखेतील मुलगी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकते.
स्कूल ऑफ लिबरल आर्टस ॲण्ड सायन्स
बी.ए (ऑनर्स) इन सोशिऑलॉजी किंवा पोलिटिकल सायन्स किंवा फ्रेंच किंवा सायकॉलॉजी, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, बी.एस्सी (ऑनर्स) इन फूड ॲण्ड न्युट्रिशन, बॅचलर ऑफ जर्न्यालिझम ॲण्ड मास कम्युनिकेशन
स्कूल ऑफ लॉचे अभ्यासक्रम
बी.ए - एलएलबी (ऑनर्स), बीबीए - एलएलबी (ऑनर्स), बीकॉम - एलएलबी (ऑनर्स), पीएचडी इन लॉ, एलएलबी -तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम
स्कूल ऑफ इंजिनीअरिंग
बी.टेक इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग, बी.टेक इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग वुईथ स्पेशलायझेशन इन (इन्फॉर्मेशन सेक्युरिटी, किंवा इंटरनेट ऑफ थिंग्ज किंवा क्लॉउड कॉम्प्युटिंग किंवा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड डीप लर्निंग किंवा बिग डेटा ॲनालिटिक्स) बी.टेक इन इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, बी.टेक इन बायोइंजिनीअरिंग
स्कूल ऑफ डिझाइन
बी. डिझाइन इन फॅशन ॲण्ड लाइफस्टाइल ॲक्सेसरीज डिझाइन, बी.डिझाइन इन फॅशन ॲण्ड मर्कंडायजिंग,बी.डिझाइन इन फॅशन डिझाइन, बी.डिझाइन इन टेक्सटाइल डिझाइन, बी.डिझाइन इन इंटेरिअर डिझाइन, बी.डिझाइन इन युझर एक्सपिरियन्स, बॅचलर ऑफ व्हिज्यूअल आर्टस, एम.डिझाइन इन फॅशन डिझाइन, एम.डिझाइन इन फॅशन मर्कंडायजिंग, एम.डिझाइन इन युजर एक्सपिरिअंस
स्कूल ऑफ आर्किटेक्चर - या विभागाचे अभ्यासक्रम-बॅचलर ऑफ आर्किटेक्चर , मास्टर ऑफ टाऊन प्लॅनिंग.
००
स्कूल ऑफ एटिकेट ॲण्ड फिनिशिंग स्किल्स
ही एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना असून शैक्षणिक गुणवत्तेच्या पलिकडे, जीवनात आवश्यक ठरणारे कौशल्य आणि तंत्र, या स्कूल मार्फत शिकवले जातात. स्वीत्ज्ञर्लंड येथील फिनिशिंग स्कूलच्या धर्तीवर मोदी युनिव्हर्सिटीने ही स्कूल सुरु केली आहे. यामध्ये भारतीय परंपरा, मूल्ये आणि संस्कृतीचा सुयोग्य संगम साधण्यात येतो. स्वत:मध्ये असलेल्या सुप्त गुणांचा विकास करण्याची संधी या स्कूलमधील विविध प्रशिक्षणांमार्फत विद्यार्थींनींना उपलब्ध करुन देण्यात येते. या स्कूलमार्फत तीन महिने, सहा …

Comments
Post a Comment