Posts

Showing posts from December, 2023

स्वयंपूर्णतेची दिशा

Image
  स्वयंपूर्णतेची दिशा तंत्र कौशल्याचे महत्व वादातीत आहे.कोणत्याही प्रकारचे एखादे जरी कौशल्य मुलांकडे असल्यास त्याला स्वत:च्या पायावर उभं राहणं सुलभ जातं. अशी मुलं इतरांपेक्षा लवकर आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण   होतात. असे काही अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत- इंडो जर्मन टूल रुम   सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयाच्या प्रशिक्षण केंद्रामार्फत औरंगाबाद येथील इंडो जर्मन टूल रुम   येथे १० वी नंतरचे कौशल्य निर्मितीचे पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत-(१) ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन टूल ॲण्ड डाय मेकिंग. या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता मिळाली आहे. कालावधी- चार वर्षे. (२) सर्टिफिकेट कोर्स इन मशिनिस्ट- कालावधी दोन   वर्षे. (३) डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स-कालावधी तीन वर्षे.   हे अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट साठी साहाय्य केले जाते. या तिनही अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना दहावीमध्ये किमान साठ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अनुसुचित जाती आाणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये...

पदवीचे की कौशल्याचे महत्व ?

Image
  पदवीचे की कौशल्याचे महत्व ? तज्जांच्या असे निदर्शनास आले आहे की, भारतातील कौशल्ययुक्त मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी दुरावत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात अंदाजे १,३५,००,००० कोटी रुपयांची करिअर संधी गमावली गेली आहे. सातत्याने वेगवेगळया संस्थांकडून सांगण्यात येत असते की, वाढते औद्योगिकरण आणि आर्थिक वृध्दी यामुळे भारतात २०३० पर्यंत विविध क्षेत्रात कौशल्ययुक्त मनुष्यबळाची गरज भासणाऱ्या २५० मिलियन रोजगार संधी निर्माण होणार आहेत. असे जर प्रत्यक्षात घडले तर भारत हा जगातील सर्वात मोठा कौशल्ययुक्त मनुष्यबळ पुरवणारा देश ठरु शकतो. कौशल्ययुक्त मनुष्यबळाचे हे महत्व लक्षात घेता पुढील काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांकडे असणाऱ्या पदवीपेक्षा इतर शैक्षणिक बाबींचा विचार रोजगार देताना केला जाऊ शकतो. अशी जाहिरात येऊ शकते की, संबंधित उमदेवारास डाटाबेस व्यवस्थापनाचे कौशल्य, क्वालिटी ॲश्यूरन्स, इंफॉर्मेशन सेक्युरिटीचे तंत्र आणि इंग्रजी भाषेतील संवाद व मौखिक कौशल्य हीच अत्यावश्यक गुणवत्ता असून संबंधित उमदेवाराने कोणतीही पदवी प्राप्त केलेली असली वा नसली तरी चालू शकेल. एख...

१२ वी नंतर टॉप १०(भाग दोन)

Image
  १२ वी नंतर टॉप १०(भाग दोन) नवी दिल्ली स्थित नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून या ज्ञानशाखेतील शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधन क्षेत्रात देशात प्रथम क्रमांकावर आहे. संस्थेने डिझाइन (अभिकल्प) , व्यवस्थापन (मॅनेजमेंट) आणि टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान) या तीन बाबींचा विद्यार्थ्यांचा पाया मजबूत आणि भक्कम व्हावा , यासाठी प्रारंभापासूनच लक्ष पुरवले आहे.देशातील ७०   टक्क्यांहून अधिक फॅशन डिझायनर्स हे या संस्थेतून प्रशिक्षित झालेले असतात. अभ्यासक्रम- बॅचलर ऑफ डिझाइन इन (फॅशन/ लेदर/ ॲक्सेसरी/ टेक्सटाइल/ निटवेअर आणि फॅशन कम्युनिकेशन) अर्हता - कला/ वाणिज्य/ विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण , किंवा केंद्रीय तंत्रशिक्षण मंडळाने अथवा राज्याच्या तंत्रशिक्षण मंडळाने मान्यता प्रदान केलेली ३ किंवा ४ वर्षे कालावधीची पदविका. प्रवेश प्रक्रिया- या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दोन टप्प्यातील , एनआयएफटी ॲडमिशन टेस्ट , ही परीक्षा घेण्यात येते. संपर्क- एनआयएफटी कॅम्पस , हौज खास , गुलमोहर पार्क , नवी दिल्ली- 110016, दूरध्वनी- 011-26867704,director.delhi...

12 वीनंतर टॉप टेन -भाग एक

Image
  12 वीनंतर टॉप टेन  -भाग एक 12 वी नंतर किंवा उत्तम करिअर करण्याची संधी केवळ विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांना मिळते, असा एक सोईचा समज आपल्याकडे बहुतांश पालकांनी करुन ठेवला आहे. तो त्यांनी दूर करणे गरजेचे ठरते. विज्ञान शाखे सोबतच कला आणि वाणिज्य शाखेतून 12 वी झालेले घेतलेले विद्यार्थीसुध्दा उत्तम करिअर घडवू शकतात. असे बारा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत. आयआयटीतली संधी १ ) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( आयआयटी ) मद्रासमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमासोबतच मानव्यशास्त्राचाही अभ्यास करता येतो. या संस्थेने २००६ साली १२ वी नंतरचा पाच वर्षे कालावधीचा एम.ए इन ( इंटिग्रेटेड अभ्यासक्रम ) इंग्लिश स्टडीज आणि डेव्हलपमेंट स्टडीज या दोन विषयांमध्ये केला. आयआयटी सारख्या दर्जेदार संस्थेतून हा अभ्यासक्रम केल्याने करिअरच्या  उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. एम . ए इन इंग्लिश स्ट डीज भाषा आणि साहित्याच्या विश्लेषणाबात संवेदनशील असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे . जागतिक पातळीवरील इंग्रजी साहित्याच्या अभ्यासासोबत , सध्या सुरु असलेल्या साहित्यिक सिध...