१२ वी नंतर टॉप १०(भाग दोन)


 

१२ वी नंतर टॉप १०(भाग दोन)

नवी दिल्ली स्थित नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून या ज्ञानशाखेतील शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधन क्षेत्रात देशात प्रथम क्रमांकावर आहे. संस्थेने डिझाइन (अभिकल्प), व्यवस्थापन (मॅनेजमेंट) आणि टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान) या तीन बाबींचा विद्यार्थ्यांचा पाया मजबूत आणि भक्कम व्हावा, यासाठी प्रारंभापासूनच लक्ष पुरवले आहे.देशातील ७०  टक्क्यांहून अधिक फॅशन डिझायनर्स हे या संस्थेतून प्रशिक्षित झालेले असतात.

अभ्यासक्रम- बॅचलर ऑफ डिझाइन इन (फॅशन/ लेदर/ ॲक्सेसरी/ टेक्सटाइल/ निटवेअर आणि फॅशन कम्युनिकेशन)

अर्हता - कला/ वाणिज्य/ विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण, किंवा केंद्रीय तंत्रशिक्षण मंडळाने अथवा राज्याच्या तंत्रशिक्षण मंडळाने मान्यता प्रदान केलेली ३ किंवा ४ वर्षे कालावधीची पदविका.

प्रवेश प्रक्रिया- या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दोन टप्प्यातील, एनआयएफटी ॲडमिशन टेस्ट, ही परीक्षा घेण्यात येते. संपर्क- एनआयएफटी कॅम्पस,हौज खास,गुलमोहर पार्क,नवी दिल्ली-110016,दूरध्वनी- 011-26867704,director.delhi@nift.ac.in, संकेतस्थळ- nift.ac.in

(७) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन - केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रिअल रिसर्च या संस्थेने एनआयडीला डिझाइन क्षेत्रातील संशोधन संस्था म्हणून मान्यता प्रदान केली आहे. सध्या अहमदाबाद, कुरुक्षेत्र, विजयवाडा आणि भोपाळ येथे या संस्थेचे कॅम्पस आहेत.

या संस्थेतील अभ्यासक्रम बॅचलर ऑफ डिझाइन (बी.डिझाइन) या नावाने ओळखला जातो. या अभ्याक्रमांतर्गत ॲनिमेशन फिल्म डिझाइन  , एक्झिबिशन डिझाइन, फिल्म ॲण्ड व्हिडिओ कम्युनिकेशन डिझाइन (जागा १०) , ग्रॅफिक डिझाइन, सेरॅमिक ॲण्ड ग्लास डिझाइन), फर्निचर ॲण्ड इंटेरिअर डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन, टेक्सटाइल डिझाइन या क्षेत्रांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. कालावधी- चार वर्षे.

प्रवेश- अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी संस्थेमार्फत, डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. ही परीक्षा प्राथमिक आणि मुख्य अशा दोन स्तराची आहे. प्राथमिक परीक्षा देशातील अनेक केंद्रावर घेतली जाते. (महाराष्ट्रातील केंद्रे- नागपूर / मुंबई) त्याद्वारे मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. मुख्य परीक्षा अहमदाबाद केंद्रावर घेतली जाते. अर्हता - कोणत्याही ज्ञान शाखेतील १२ वी उत्तीर्ण. विजयवाडा, कुरुक्षेत्र आणि भोपाळ येथील कॅम्पसमधील अभ्यासक्रम हा ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम इन डिझाइन, या नावाने ओळखला जातो. या ठिकाणी इंडस्ट्रिअल डिझाइन, कम्युनिकेशन डिझाइन  आणि टेक्सटाइल ॲण्ड ॲपेरल डिझाइन या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. कालावधी- चार वर्षे.

संपर्क - नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन, पाल्डी, अहमदाबाद - ३८०००७, दूरध्वनी-०७९-२६६२९५००, ईमेल - academic@nid.edu आणि admission@nid.edu, संकेतस्थळ- www.nid.edu

 (८) इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर (आयआयटी मुंबई)

देशात अनेक ठिकाणी आयआयटी असल्यातरी मुंबई आयआयटीमध्ये प्रवेश मिळावा असे स्वप्न पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे असते. विज्ञान शाखेतील १२ वी झालेल्या विद्यार्थ्यांचे हे स्वप्न पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी या तिनही स्तरावर साकार होऊ शकते. पण वाणिज्य आणि कला शाखेतील १२ वी विद्यार्थ्यांची आयआयटी मुंबईत शिकण्याची स्वप्नपूर्ती, इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर मधील , बॅचलर ऑफ डिझाइन (अभिकल्प) च्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाव्दारे होऊ शकते.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या, अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रस एक्झामिनेशन फॉर डिझाइन म्हणजेच यूसीड (UCEED),या परीक्षेला विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसोबतच कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनाही या परीक्षेला बसता येते.

या परीक्षेच्या गुणांवर,इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर, मुंबई सोबतच आयआयटीडीएम (इंडियन इं‍‍स्टिटयूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग) जबलपूर येथील पदवीस्तरीय डिझाइन (अभिकल्प) अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे-  नागपूर, पुणे आणि मुंबई. संपर्क-इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर,आयआयटी मुंबई-४०००७६,दूरध्वनी- ०२२-२५७६८०१,ईमेल-office.idc@iitb.ac.in किंवा admission.idc@iitb.ac.in,संकेतस्थळ- www.idc.iitb.ac.in

 (९) नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनव्हर्सिटी बेंगळुरु-

अभियांत्रिकीसाठी बहुतेक विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे आयआयटी मुंबई येथे प्रवेश हवा असतो, त्याचप्रमाणे विधि शाखेचे शिक्षण घ्यावयाचे असल्यास पहिले प्राधान्य नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनव्हर्सिटीला दिले जाते. या संस्थेने गेल्या काही वर्षात विधि शिक्षणात देशात पहिला क्रमांक टिकवून ठेवला आहे.

संस्थेने विधि शिक्षणप्रकियेत उच्च दर्जा आणि गुणवत्ता स्थापित केली आहे. संस्थेच्या अभ्यासक्रमात जागतिक स्तरावरील मान्य झालेले आधुनिक प्रवाह तातडिने समाविष्ट केले जातात. या संस्थेमार्फत अभ्यासक्रमात सातत्याने नावीन्यता आणली जाते. विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे विचार करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे त्यांच्या वैचारिक सर्जनशीलतेला उंच झेप घेता येणे शक्य होते.

विधि विषयाशी संबधित मुख्य अभ्यासक्रमांसोबत इतर वेगळे विषय उदाहरणार्थ - निवडणूक सुधारणा, सायबर सुरक्षा, अंतराळ कायदे, स्पर्धात्मक कायदे, कृत्रिम बुध्दिमत्ता, आरोग्य काळजी असे विषय शिकण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाते.

या संस्थेत बीए-एलएलबी (ऑनर्स) हा अभ्यासक्रम शिकवला जातो. कालावधी- पाच वर्षे. प्रवेशासाठी कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (क्लॅट) द्यावी लागते. या परीक्षेत पहिल्या ७५ ते १०० क्रमांकात येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणे सुलभ जाउु शकते.

संपर्क- नॅशनल लॉ स्कूल युनिव्हर्सिटी,नागरभावी,बेंगरुळु- ५६०२४२,दूरध्वनी-०८०-२३२१३१६०,फॅक्स-२३१६०५३५,ईमेल-contact@nls.ac.in,संकेतस्थळ-nls.ac.in

(१०) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटेरिंग ॲण्ड न्युट्रिशन

दिल्ली येथे असणारी द इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटेरिंग ॲण्ड न्युट्रिशन ही संस्था १९६२ साली भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालायामार्फत, आतिथ्यशीलता उद्योगाला लागणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यबळाच्या गरजांची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट्य ठेऊन स्थापन करण्यात आली. गेल्या ५९ वर्षात या संस्थेने या क्षेत्रातील शिक्षण - प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास चालना देणारी आपल्या देशातील क्रमांक एकची संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. या संस्थेचे विद्यार्थी सध्या देश-विदेशात मोठ्या पदांवर आहेत. अनेकांनी स्वत:चा व्यवसाय यशस्वी केला आहे. अशा विद्यार्थ्यांची मोठी साखळी या संस्थेकडे आहे.

अभ्यासक्रम- बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन. कालावधी तीन वर्षे. आतिथ्यशीलता उद्योगासाठी आवश्यक असणारे आधुनिक ज्ञान आणि तंत्र, व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठीचे कौशल्य या अभ्यासक्रमाद्वारे उमेदवारांना प्राप्त करुन दिले जाते.

अर्हता - कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण किंवा १२ वीची परीक्षा देणारे उमेदवार या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात . उमेदवारांच्या निवडीसाठी जॉईंट एन्ट्रन्स टेस्ट घेतली जाते. ही परीक्षा ऑनलाइन आहे. ही परीक्षा देशातील विविध शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि पुणे या केंद्रांचा समावेश आहे.

संपर्क -  इंस्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, लायब्ररी पुसा कॉम्पलेक्स, नवी दिल्ली 110012, दूरध्वनी-  011- 25841411, फॅक्स-25840147 संकेतस्थळ- www.ihmpusa.net आणि www.nchm.nic.in, ईमेल- ihmpusa@rediffmail.com आणि  jeenchm@gmail.com

(११) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रॉफ्ट ॲण्ड डिझाइन-    पारंपरिक हस्तकौशल्याला समकालीन तंत्रज्ञानाची जोड दिल्यास हस्तकौशल्य व्यवसाय अधिक स्पर्धात्मक आणि गुणवत्तापूर्ण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन या संस्थेची स्थापना राजस्थान सरकारमार्फत करण्यात आली.

संस्थेच्या वतीने बॅचलर इन क्रॉफ्ट डिझाइन,हा चार वर्षे कालावधीचा आणि आठ  सत्रांमध्ये विभाजित करण्यात आलेला अभ्यासक्रम शिकवला जातो. या अभ्यासक्रमांतर्गत (१) सॉफ्ट मटेरिअल ॲप्लिकेशन- एकूण जागा २०, (२) हार्ड मटेरिअल ॲप्लिकेशन-एकूण जागा २०, (३) फायर मटेरिअल ॲप्लिकेशन-एकूण जागा २०, अशा तीन क्षेत्रात स्पेशलायझेशन करता येते.

    अर्हता - कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण उमेदवार. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी क्रिएटिव्ह ॲबिलिटी टेस्ट जयपूर ,दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू, कोलकता मुंबई, लखनौ अशा काही शहरांमध्ये घेतली जाते.

   संपर्क- इंडियन इन्स्टिट्यूट  ऑफ क्रॉफ्ट आणि डिझाइन, जे-८, झालना इन्स्टिट्यूशनल एरिया,जयपूर ३०२००४, राजस्थान, दूरध्वनी:०१४१ -,२७०१२०३,फॅक्स:२७००१६०, ई-मेल-info@iicd.ac.in/admissions@iicd.ac.in

संकेतस्थळ -www.iicd.ac.in.

 

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी