विषाणूशास्त्राचा अभ्यास
मास्टर ऑफ सायन्स इन व्हायरॉलॉजी विषाणूशास्त्राचा अभ्यास करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग भांबावून गेले आहे. या विषाणूंचा विविध अंगाने अभ्यास केला जात आहे. करोनाच्या वेगवेगळ्या प्रकारातील भाऊबंदकांचा अभ्यास या आधीही केला जात होता. मात्र करोनामुळे विषाणूशास्त्राच्या अभ्यासाला विलक्षण गती आली आहे. या पुढच्या काळामध्ये विषाणूशास्त्राचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम करिअर संधी मिळू शकतात. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेने दोन वर्षे कालावधीचा मास्टर ऑफ सायन्स इन व्हायरॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. संगसर्गजन्य आजाराचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास करण्यासाठी संस्थेकडे स्वत:ची अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे. हा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. अभ्यासक्रमाच्या काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनात्मक कल्पना साकारण्यासाठी उत्तेजन दिले जाते. त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाते व सुविधा पुरविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सैध्दांतिक ज्ञान पक्के होते. नित्य नव्याने उदयास येणाऱ्या विषाणूंचा सामना करण्याच्या अनुषंगाने या ...