Posts

Showing posts from September, 2023

विषाणूशास्त्राचा अभ्यास

Image
             विषाणूशास्त्राचा अभ्यास करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग भांबावून गेले आहे. या विषाणूंचा विविध अंगाने अभ्यास केला जात आहे. करोनाच्या वेगवेगळ्या प्रकारातील भाऊबंदकांचा अभ्यास या आधीही केला जात होता. मात्र करोनामुळे विषाणूशास्त्राच्या अभ्यासाला विलक्षण गती आली आहे. या पुढच्या काळामध्ये विषाणूशास्त्राचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम करिअर संधी मिळू शकतात. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेने दोन वर्षे कालावधीचा मास्टर ऑफ सायन्स इन व्हायरॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. संगसर्गजन्य आजाराचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास करण्यासाठी संस्थेकडे स्वत:ची अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे. हा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. अभ्यासक्रमाच्या काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनात्मक कल्पना साकारण्यासाठी उत्तेजन दिले जाते. त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाते व सुविधा पुरविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सैध्दांतिक ज्ञान पक्के होते. नित्य नव्याने उदयास येणाऱ्या विषाणूंचा साम...

रोगप्रतिकार शास्त्रातील संधी

Image
  रोगप्रतिकार शास्त्रातील संधी करोना विषाणू प्रादुर्भावानंतरच्या काळात इम्युनॉलॉजी म्हणजेच रोग प्रतिकारशक्तीबद्दल व्यापक चर्चा झाली आणि होत आहे. ही ज्ञानशाखा पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. या शाखेतील शिक्षण आणि संशोधनही सुरु आहे. त्याची गती मात्र सामान्य स्वरुपाची   होती. फारसे ग्लॅमर नसलेल्या या शाखेतील शिक्षण आणि संशोधन शांतपणे सुरु होते. गेल्या वर्षीच्या मार्चपासून धुमाकूळ घालत असलेला करोना विषाणू मार्च २०२१ मध्ये स्वत:मध्ये बदल करुन नव्याने भारतासह अनेक देशांना त्रस्त करीत आहे. त्यामुळे यापुढे इम्युनॉलॉजी शास्त्राचा अभ्यास आणि संशोधनास प्राधान्य मिळेल हे निश्चित. या शाखेकडे अभावाने वळणाऱ्या विद्यार्थ्यांनी करिअरचा एक महत्वाचा पर्याय म्हणून या शाखेचा विचार करायला हवा. पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमानंतर लगेच संधी मिळेल अशी शक्यता नसली तरी संशोधनाचा मार्ग स्वीकारल्यास देशात आणि परदेशातही विविधांगी संधी मिळू शकतात. पदवी ते संशोधनाचा हा कालावधी संयमाने अध्ययनात झोकून देणे गरजेचे आहे. हे दीर्घकालीन नियोजनाचे करिअर असल्याने यंदा १२ वी झालेल्या आणि जैविक विज्ञानात आवड आण...

निळ्या अर्थकारणास गती

Image
  निळ्या अर्थकारणास गती भारताला ७५०० किलोमीटरचा समृध्द किनारा लाभला आहे. या किनाऱ्यावर १२ मुख्य बंदरे आहेत आणि २५० हून अधिक इतर बंदरे आहेत. भारतातील जलवाहतुकीची साखळी अतिशय व्यापक अशी आहे. देशाच्या अर्थविकासात या घटकाचा मोठा वाटा आहे. देशातील ९५ टक्के मालवाहतूक सागरी मार्गाने होते. एकूण व्यापाऱ्याच्या ६५ टक्के व्यापार हा या मार्गाने होतो. सागरी व्यापार आणि वाहतुकीस निळ्या अर्थकारणाची उपमा दिली जाते. २०२० साली निती आयोगाने, या निळया अर्थकारणाला अधिक गती देण्यासाठी समुद्रीय संसाधानाचा अधिकाधिक वापर करण्याचे निर्धारित केले. निळया अर्थकारणास गती मिळाल्यावर विकासाचा पुढचा टप्पा गाठता येणे शक्य असल्याचे आयोगाने निदर्शनास आणले. त्याशिवाय नव्या प्रकारच्या रोजगार आणि स्वयंरोजगार संधीही निर्माण होऊ शकतात. या निळया अर्थकारणात खाजगी क्षेत्र आणि किनाऱ्यावर वास्तव्यास असणारे समुदाय यांचा सहभाग घेतला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, साहित्य आणि उपकरणे यांच्या सहाय्याने सागरीय व्यवस्थापन, किनारा आणि सागरीय क्षेत्राचा शास्वत वापर केला जाणार. त्याशिवाय सागरीय क्षेत्रातील संसाधानांच्या वापराची प्राथ...

कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिस परीक्षा

Image
    कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिस परीक्षा ल ष्काराच्या वेगवेगळया घटकांमध्ये सामील होण्यासाठी कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिस परीक्षा ( संयुक्त संरक्षण सेवा ) हा एक महत्वाचा मार्ग आहे . ही परीक्षा संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाते. या परीक्षेद्वारे देहरादू न स्थित इंडियन मिलिटरी अकॅडेमी , एजिमालास्थित इंडियन नॅव्हल अकॅडेमी , हैद्राबादस्थित एअरफोर्स अकॅडेमी , चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमीमध्ये प्रवेश दिला जातो .   विशेषत : ज्या तरुणिंना लष्करात जावून साहस गाजवायचं आहे , त्यांच्यासाठी ही परीक्षा उत्तम संधी प्रदान करतं . या तरुणिंना चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेनिंग ॲ केडमी येथील अतांत्रिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो .    अर्हता इंडियन मिलिटरी अकॅडेमीमधील काही जागा एनसीसी सी प्रमाणपत्र ( आर्मी ) धारकांसाठी राखीव असतात . इंडियन नॅव्हल अकॅडेमीमधील काही जागा एनसीसी सी प्रमाणपत्र ( नेव्ही ) धारकांसाठी राखीव असतात . या अकॅडेमित कार्यकारी - सामान्य सेवेसाठीचा अभ्यासक्रम चालविला जातो . ...