Posts

Showing posts from October, 2022

आयआयटीतलं डिझाईन-सर्व ज्ञानशाखांना संधी

Image
  आयआयटीतलं डिझाईन-सर्व ज्ञानशाखांना संधी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईच्या अंतर्गत इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर कार्यरत असून, या विभागामार्फत बॅचलर ऑफ डिझाइन ( अभिकल्प ) आणि मास्टर ऑफ डिझाइन हे अभ्यासक्रम चालवले जातात. या अभ्यासक्रमाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या कोणत्याही ज्ञानशाखेतील ( कला, वाणिज्य किंवा विज्ञान ) १२वी उत्तीर्ण विद्यार्थी या प्रवेशासाठी पात्र ठरतात. १२ वीमध्ये केवळ उत्तीर्ण श्रेणी असली तरी पुरे. १२ वी विज्ञान शाखेचे विद्यार्थी जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन ( ॲडव्हान्स्ड ) व्दारे आयआयटी मुंबईमध्ये विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये प्रवेश मिळवू शकतात. मात्र कला आणि वाणिज्य शाखेतील मुले इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटरच्या मार्फत आयआयटी- मुंबईमध्ये अप्रत्यक्षपणे प्रवेश मिळवू शकतात. चाळणी परीक्षा बॅचलर ऑफ डिझाइन ( अभिकल्प ) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रस एक्झामिनेशन फॉर डिझाइन म्हणजेच यूसीड (UCEED) , ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेला विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसोबतच कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनाही बसता येते. या ...

"पंचकर्म"तंत्रकौशल्य आणि संधी

Image
  " पंचकर्म " तंत्रकौशल्य आणि संधी शरीरातील अनावश्यक कचरा, विषारी द्रव्य/ पदार्थ बाहेर काढून शरीराच्या शुध्दीकरणाची प्रक्रिया पंचकर्म तंत्राव्दारे राबवली जाते. शरीरात खोलवर रुजलेला तणाव आणि आजारावर मात करण्यासाठी पंचकर्म उपयुक्त ठरु शकते. पंचकर्म हे आयुर्वेदातील एक   महत्वाची उपचार पध्दती समजली जाते. सध्याच्या काळात धावपळीमध्ये विविध ताण- तणाव आणि जीवनशैलिशी निगडित शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यावरील उत्तम उपाय म्हणून पंचकर्म तंत्राकडे बघितलं जातं. ही बाब लक्षात आल्यानं देश-विदेशात पंचकर्म प्रकिया करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांचा ओढा वाढत चालल्याचे दिसून येतं. त्यामुळे पुढील काळात या विषयातील जाणकार किंवा तंत्रकौशल्य हस्तगत केलेल्या मनुष्यबळाला आयुर्वेद रुग्णालये, पंचकर्म केंद्रे, आरोग्य केंद्रे ( हेल्थ रिसॉर्ट ) , वेलनेस सेंटर, पुनर्वसन केंद्रे या ठिकाणी करिअरच्या विविध संधी मिळू शकतात. हे पंचकर्म पाच पध्दतीचे असल्याने त्याला पंच म्हणजे पाच आणि कर्म म्हणजे पध्दती किंवा प्रकिया असं संबोधलं जातं. शरीरास वेगवेगळया प्रकारचे आजार होऊ नये म्हणून या उपचार पध्दतीत, प्रत...

अभियांत्रिकीतील संधी- ४

Image
  अभियांत्रिकीतील संधी- ४ युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम ॲण्ड एनर्जी स्टडीज - या संस्थेची स्थापना 2003 साली करण्यात आली. स्थापनेपासूनच या संस्थेने औद्योगिक जगताला आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळ निर्मितीचे अभ्यासक्रम सुरु केले. सध्याच्या काळात महत्वाचे ठरु पाहणारे बिग डेटा ॲनालिटिक्स, क्लॉउड कॉम्प्युटिंग, मशिन लर्निंग ,आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशिन डिझाइन,मशिन लर्निंग, मेकॅट्रॉनिक्स, ग्रॅफिक आणि गेमिंग, एरोस्पेस अभियांत्रिकी या सारखे अभ्यासक्रम सुरु करण्यात आघाडी घेतली. स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम - कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन (1) ब्लॉकचेन , (2) इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर , (3) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग , (4) कॉम्प्युटेशनल सस्टेनॅबिलिटी , बी.टेक इन (1) एरोस्पेस इंजिनीअरिंग , (2) एरोस्पेस इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन एव्हिऑनिक्स , (3) केमिकल इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन रिफायनिंग ॲण्ड पेट्रोकेमिकल्स , (4) ॲप्लाइड पेट्रोलियम इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन गॅस स्ट्रिम , (5) सिव्हिल इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन इन...