Posts

Showing posts from February, 2023

आतिथ्यसेवेची उंच भरारी

Image
  आतिथ्यसेवेची उंच भरारी कोरोनोत्तर काळात आतिथ्य सेवा क्षेत्राने ( हॉस्पिटॅलिटी ) उंचच उडी घेतली आहे. आता कसलाही धोका अथवा संकट नाही, याची जवळपास खात्री पटल्याने जगभरातील पर्यटक भ्रंमतीला निघाले आहे. या सर्वांना उत्तम दर्जाच्या आतिथ्य सेवेची गरज भासते. ही गरज याक्षेत्रात असणारी पंचतारांकित हॉटेल्स, निवासगृहे, रिसॉर्टस, अतिथीगृह आदी   भागवत असतात.उत्तम निवासासोबतच उत्कृष्ट खानपानालाही प्राथमिकता दिली जाते. याबाबींसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते. ही गरज भागवण्याचे काम, नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल ॲण्ड कॅटरिंग मॅनेजमेंट ही वर्षानुवर्षे भागवीत आहे. ही संस्था भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेने हॉटेल उद्योगाशी संबंधित प्रमाणपत्र,पदविका,पदवी आणि पदव्युत्तर पदवी पर्यंतचे विविध कालावधीचे रोजगारक्षम   व उत्तम करिअर घडवण्याची क्षमता असलेले अभ्यासक्रम सुरु केले आहेत. यामध्ये बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन , हा महत्वाचा अभ्यासक्रम आहे.तो जागतिक स्तरावरील अभ्यासक्रमाशी सुसंगत असल्याने या क्षेत्रात येण्यासाठी उमेदवारांची संपूर्ण ...

स्मार्ट पॅकेजिंग मधील करिअर संधी

Image
  स्मार्ट पॅकेजिंग मधील करिअर संधी- आजच्या स्मार्ट काळात एखाद्या वस्तुची गुणवत्ता आणि दर्जा महत्वाची असतेच . त्याशिवाय त्या वस्तुचे आकर्षक पॅकिंग सुध्दा तितकेच महत्वाचे असते . त्यामुळे पॅकेजिंगकडे अधिकाधिक लक्ष दिले जाते . पॅकेजिंगच्या नवनवीन डिझाइन्स शोधल्या जातात . त्याच्या विविध रंगसंगती विकसित केल्या जातात . वस्तुंकडे आकर्षित करण्यासाठी पॅकेज ( कव्हर ) महत्वाची भूमिका बजावत असते . आपल्या देशातील विविध वस्तुंच्या बाजारपेठेचा आकार बघता पॅकेजिंग क्षेत्राचे महत्व लक्षात यावे .   या क्षेत्रात   करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तिंना चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात . कोरोनोत्तर काळात ग्राहकांचा कल हा ऑनलाइन खरेदीकडे असल्याने,होम डिलिव्हरीच्या पॅकेजिंगची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.त्यासाठी अशा कौशल्यप्राप्त उमेदवारांची गरजही वाढणार आहे.ही बाब लक्षात घेता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग या संस्थेने सुरु केलेले विविध अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात . यातील काही अभ्यासक्रम हे दीर्घ कालावधीचे आहेत . तर काही अभ्यासक्र म लघु मुदतीचे आहे त . या लघुमुदतीच्या अभ्यासक्...

फॅशन उद्योजकता : अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

Image
फॅशन उद्योजकता : अल्पमुदतीचे अभ्यासक्रम     कौशल्याधारित अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणामुळे रोजगार आणि स्वंयरोजगाराच्या संधी सुलभतेने मिळू शकतात, ही बाब लक्षात घेऊन नवी मुंबई येथील कॅम्पसमध्ये निरंतर शिक्षण पध्दतीचा अवलंब करुन अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम पदव्युत्तर पदविका, पदविका आणि प्रमाणपत्र या पातळीचे आहेत. या अभ्यासक्रमांना स्थानिक पातळीवर प्रवेश दिला जातो. २०२२ मध्ये पुढील अभ्यासक्रम करता येऊ शकतात. ( १ ) पदविका अभ्यासक्रम- ( १ ) फॅशन ॲड फिट स्टाइल, कालावधी एक वर्षं, अर्हता- कोणत्याही ज्ञान शाखेतील १२ वी , ( २ ) फॅशन आंत्र्यप्रिन्युरशीप , कालावधी एक वर्षं, अर्हता- कोणत्याही ज्ञान शाखेतील पदवी किंवा तीन वर्षे कालावधीची पदिविका, ( ३ ) ॲपेरल प्रॉडक्शन ॲण्ड मर्कंडायजिंग कालावधी एक वर्षं, अर्हता-कोणत्याही ज्ञान शाखेतील पदवी किंवा तीन वर्षे कालावधीची पदिविका, ( ४ ) ॲडव्हान्स्ड युझर स्टडीज, कालावधी एक वर्षं, अर्हता - कोणत्याही ज्ञान शाखेतील पदवी किंवा तीन वर्षे कालावधीची पदविका. ( २ ) निरंतर शिक्षण अ भ्यासक्रम- ( १ ) फॅशन क्...