फॅशन उद्योजकता : अल्पमुदतीचे अभ्यासक्रम
फॅशन उद्योजकता : अल्पमुदतीचे अभ्यासक्रम
कौशल्याधारित
अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणामुळे रोजगार आणि स्वंयरोजगाराच्या संधी सुलभतेने मिळू
शकतात, ही बाब लक्षात घेऊन नवी मुंबई येथील कॅम्पसमध्ये निरंतर शिक्षण पध्दतीचा
अवलंब करुन अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम
पदव्युत्तर पदविका, पदविका आणि प्रमाणपत्र या पातळीचे आहेत. या अभ्यासक्रमांना
स्थानिक पातळीवर प्रवेश दिला जातो.
२०२२ मध्ये
पुढील अभ्यासक्रम करता येऊ शकतात.
(१) पदविका
अभ्यासक्रम- (१) फॅशन ॲड फिट स्टाइल, कालावधी एक वर्षं,
अर्हता- कोणत्याही ज्ञान शाखेतील १२ वी, (२)
फॅशन
आंत्र्यप्रिन्युरशीप,
कालावधी एक वर्षं, अर्हता- कोणत्याही ज्ञान शाखेतील पदवी किंवा तीन वर्षे कालावधीची पदिविका, (३) ॲपेरल
प्रॉडक्शन ॲण्ड मर्कंडायजिंग कालावधी एक वर्षं, अर्हता-कोणत्याही ज्ञान शाखेतील पदवी किंवा तीन वर्षे कालावधीची पदिविका, (४)
ॲडव्हान्स्ड युझर स्टडीज, कालावधी एक वर्षं, अर्हता - कोणत्याही ज्ञान शाखेतील पदवी किंवा तीन वर्षे कालावधीची पदविका.
(२) निरंतर शिक्षण अ भ्यासक्रम- (१) फॅशन
क्लोदिंग टेक्नॉलॉजी,
कालावधी एक वर्षं, अर्हता- कोणत्याही ज्ञान शाखेतील १२वी, (२) फॅशन रिटेल मॅनेजमेंट कालावधी एक वर्षं,
अर्हता - कोणत्याही ज्ञान शाखेतील १२वी, (३) लक्झरी
प्रॉडक्ट डिझाइन- कालावधी एक वर्षं, अर्हता - कोणत्याही ज्ञान शाखेतील १२वी, (४) ॲपेरल
कॉस्टिंग ॲण्ड फॅशन मर्कंडायजिंग मॅनेजमेंट कालावधी एक वर्षं, अर्हता - कोणत्याही
ज्ञान शाखेतील १२वी, (५) ॲपेरल
डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट कालावधी- सहा महिने, अर्हता- कोणत्याही ज्ञान शाखेतील
१२वी, (६)
क्रिएटिव्ह फॅशन स्टायलिंग,
कालावधी सहा महिने, अर्हता-कोणत्याही ज्ञान शाखेतील १२ वी, (७) क्रिएटिव्ह पॅटर्न मेकिंग कालावधी सहा महिने,
अर्हता - कोणत्याही ज्ञान शाखेतील १२वी, (८)
व्हिज्युअल मर्कंडायजिंग, कालावधी सहा महिने, अर्हता-कोणत्याही ज्ञान शाखेतील १२वी, (९)
ईकॉमर्स फॉर फॅशन बिझिनेस, (१०)यूआय/यूएक्स
डिझाइन.
०००
गांधीनगर कॅम्पस
एनआयएफटीच्या गांधीनगर कॅम्पसमध्ये निरंतर शिक्षण
कार्यक्रमांतर्गत पुढील अल्पमुदतीचे अभ्यासक्रम करता येतात.
(१) फॅशन ॲण्ड मीडिया कम्युनिकेशन- या अभ्यासक्रमाचा
कालावधी- एक वर्षं असून कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास करता
येतो. १२ वीनंतर एक दोन किंवा वर्षाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाते.
हा अभ्यासक्रम गांधीनगर कॅम्पसच्या उपकेंद्र असलेल्या सुरत येथे शिकवला जातो. या
अभ्यासक्रमात फॅशनचा आढावा, व्हिज्युअल स्टडीज, एलिमेंट्स ऑफ डिझाइन या विषय घटकांचा
समावेश आहे.
या अभ्यासक्रमामध्ये
संगणकीय सॉफ्टवेअरच्या मदतीने डिझाइन तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते. तसेच
ॲनिमेशनचे तंत्र अवगत करुन दिले जाते. डिझाइन, व्हिज्युअल मर्कंडायजिंग,
फोटोग्रॅफी, स्टायलिंग, इलुस्ट्रेशन, अडॉब फ्लॅश फोटोशॉप, अडॉब फ्लॅश प्रोफेशनल, ॲडॉब
ऑफ्टर इफेक्ट्स, ॲडॉब मीडिया एनकोडर, फिल्ड व्हिजिट्स, ट्रेनिंग या विषय घटकांचा
समावेश आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर कॅटलॉग डिझायनिंग, नियतकालिकांचे संपादन,
वृत्तपत्रातील सदर, संपादकीय कार्य, फॅशन कम्युनिकेशन, ग्रॅफिक डिझायन,
स्टायलिस्ट, शूट कुऑर्डिनेटर, फॅशन फोटोग्रॅफर, मोशन ग्रॅफिक्स ,जाहिरात, चित्रपट
आदी क्षेत्रात करिअर संधी मिळू शकतात.
(२) फॅशन डिझाइन ॲण्ड
ॲपेरल टेक्नॉलॉजी.
कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी हा अभ्यासक्रम करु
शकतो. एक किंवा दोन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाते. कालावधी - एक
वर्षं. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र प्रदान केले जाते. सुरत येथील
वस्त्रोद्योगाच्या विविध गरजा लक्षात घेऊन या अभ्यासक्रमांची संरचना करण्यात आली
आहे. या अभ्यासक्रमात डिझाइन ॲण्ड फॅशन स्टडीज, एलिमेंट्स ऑफ डिझाइन, हिस्ट्री ऑफ
डिझाइन, इलुस्ट्रेशन, पॅटर्न डेव्हलपमेंट, ड्रेपिंग, गार्मेंट कंस्ट्रक्शन,
टेक्स्टाईल सायन्स, ट्रॅडिशनल इंडियन टेक्सटाइल,
प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी, सर्फेस ऑर्नामेंटेशन, हॅण्ड एम्ब्रॉयडेरी, मशिन
एम्ब्रॉयडेरी टेक्निक्स, ॲप्लिकेशन ऑफ कॉम्प्युटर्स,
मार्केटिंग ॲण्ड मर्कंडायजिंग आदी विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. हा
अभ्यासक्रम केल्यावर संबंधित उद्योगातील सॅम्पलिंग, डिझायनिंग, एम्ब्रॉयडेरी
प्रॉडक्शन कुऑर्डिनेटर आदी क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळू शकतात.
(३) या संस्थेने चार
महिने कालावधीचा डिझायनिंग फॉर होम फर्निशिंग हा अल्पमुदतीचा अभ्यासक्रमही सुरु
केला आहे.
संपर्क - नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
एसव्हीएनआयटी कॅम्पस, अबॉव्ह कँटिन इच्छानाथ सर्कल, सुरत ३९०००५,
संपर्कध्वनी-९३७४७६६६०३, ईमेल-kalpana.kabra@nift.ac.in
००००
.jpg)
Comments
Post a Comment