वेगळे पर्याय
वेगळे पर्याय (१) मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रामध्ये बीएमएस (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज)-एमबीए, हा पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन ॲडमिशन टेस्ट घेतली जाते. कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम करता येतो. त्याला सरासरीने ४५ टक्के गुण मिळायला हवेत. राखीव संवर्गासाठी गुणांमध्ये ५ टक्क्यांची सूट देण्यात येते. या अभ्यासक्रमाच्या ८५ टक्के जागा महाराष्ट्राचा अधिवास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. हा अभ्यासक्रम केल्यावर वेगवेगळया उद्योग ,व्यवसाय आणि कंपन्या यामध्ये व्यवस्थापकीय जबाबदारी पार पाडण्यासाठीच्या संधी मिळू शकतात. संपर्क- mu.ac.in/thane-sub-campus (२) सिम्बॉयसीस सेंटर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेचा बीबीए (बॅचलर ऑफ बिझीनेस ॲडमीनिस्ट्रेशन) हा अभ्यासक्रम देशातील सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रमांपैकी एक समजला जातो. कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या चार वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम ...

Comments
Post a Comment