उच्च शिक्षणाचे प्रवेशव्दार!
उच्च
शिक्षणाचे प्रवेशव्दार!
चंद्रयान
३ चे यशस्वी उड्डाण झाल्यावर विज्ञान शाखेतील उच्च शिक्षण आणि संशोधन कार्यात
तरुणांचे आकर्षण निर्माण झाल्याचे बऱ्याच जणांचे निरीक्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी केलेल्या भाषणात या
बाबीचा आवर्जून उल्लेख केला. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील उच्च शिक्षण आणि
संशोधन अभ्यासक्रमांसाठी भारत सरकारमार्फत प्रोत्साहन दिले जाते. या
अभ्यासक्रमांसाठी शासकीय संस्थांमध्ये प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना चांगली
शिष्यवृत्तीही दिली जाते.
विज्ञान,
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेतील दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण हे आयआयटी, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन
टेक्नॉलॉजी (आयआयआटी), नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), इंडियन इंस्टिट्यूट
ऑफ सायंस एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (आयसर), इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस-बेंगळुरु, कॉलेज
ऑफ इंजिनीअरिंग-पुणे सारखे काही महत्वाचे शासकीय महाविद्यालये यांमध्ये दिले जाते.
या संस्थांमध्ये प्रवेशासाठी हुषार आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला
हवे.
उच्चशिक्षणाचे "प्रवेशव्दार"
ग्रॅज्युएट
ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग-गेट (अभियांत्रिकी स्नातक अभिक्षमता),या
परीक्षेव्दारे देशातील उपरोक्त नमूद महत्वाच्या संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो. या
अर्थाने या संस्थांमधील प्रवेशासाठी ही परीक्षा प्रवेशव्दार असल्याचे म्हंटल्यास
वावगे ठरु नये. गेट-२०२४ या परीक्षेची घोषणा झाली आहे. अभियांत्रिकी
आणि विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासोबतच कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील डॉक्टोरल अभ्यासक्रमांसाठी "गेट"चे गुण ग्राह्य धरले जातात.
मिळणारी
संधी-
गेट
मधील गुणांच्या आधारे (१)
अभियांत्रिकी/तंत्रज्ञान/वास्तुकला या शाखांमधील-पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टोरल
अभ्यासक्रम आणि (२) कला आणि विज्ञान
शाखेतील संबंधित विषयाचे डॉक्टोरल अभ्यासक्रम, यांना प्रवेश मिळतो. या
अभ्यासक्रमांना भारत सरकारचे किंवा इतर शासकीय संस्थांचे मिळालेले साहाय्य असावे. इतर
काही संस्था गेट गुणांवर प्रवेश देतात. मात्र अशा विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्ती मिळत नाही.
(३) या परीक्षेतील गुणांचा आधार पुढील सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या कंपन्या
नियुक्ती देण्यासाठी करु करतात.
(१) भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड-
भेल, (२) भारत संचार निगम
लिमिटेड-बीएसनल, (३)कोल इंडिया लिमिटेड-सीआयएल, (४) सेंट्रल फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स,
(५) चेनाब व्हॅली पॉवर लिमिटेड, (६) दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, (७) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, (८) इंजिनीअर्स इंडिया लिमिटेड, (९) गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडिया-गेल, (१०) इंडियन ऑईल कॉर्पोरशन लिमिटेड-आयओसीएल, (११) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड,(१२) नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया,(१३) एनएलसी-इंडिया लिमिटेड, (१४) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (१५) न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
लिमिटेड, (१६) नॅशनल थर्मल पॉवर
कॉर्पोरेशन-एनटीपीसी, (१७) आईल ॲण्ड नॅचरल गॅस
कॉर्पोरेशन-ओएनजीसी, (१८) पॉवर ग्रिड कॉर्पोरेश ऑफ
इंडिया-पीजीसीएल. (१९) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन
ऑफ इंडिया, (२०) पॉवर सिस्टिम ऑपरेशन
कॉर्पोरेशन लिमिटेड, (२१) राष्ट्रीय इस्पात
निगम लिमिटेड (२२) हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड- हाल, इत्यादी
केंद्र सरकारातील सिनिअर फिल्ड ऑफिसर-टेलिकम्युनिकेशन,सिनिअर रिसर्च
ऑफिसर-क्रिप्टो सिनिअर रिसर्च ऑफिसर-सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी ,अशी गट अ श्रेणितील
पदे थेट गेट परीक्षेच्या गुणांवर भरली जातात.
(४) गेट गुणांच्या आधारावर शासकीय
संस्थेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
गेट
अर्हता-
अभियांत्रिकी
पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला असलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. किंवा
ज्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान/ वास्तुकला/ विज्ञान/ वाणिज्य/ कला
याशाखेतील पदवी प्राप्त केली असेल,ते सुध्दा या परीक्षेला बसू शकतात. या
परीक्षेसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. कला/ वाणिज्य/ विज्ञान शाखा- पदव्युत्तर
पदवी किंवा या पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विदयार्थी.
गेट
मधील पेपर्स-
एकूण ३१ विषयांमध्ये ही परीक्षा
देता येते. २०२४ पासून डाटा सायंस ॲण्ड
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या पेपरचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
(१) एरोस्पेस
इंजिनीअरिंग, (२) ॲग्रिकल्चरल
इंजिनीअरिंग, (३) आर्किटेक्चर
ॲण्ड प्लॅनिंग, (४) (५) बायोमेडिकल इंजिनीअरिंग, (६) सिव्हिल
इंजिनीअरिंग, (७) केमिकल
इंजिनीअरिंग, (८) कॉम्प्युटर
सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी,
(९)
केमिस्ट्री, (१०)
इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, (११) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, (१२)
एनव्हिरॉन्मेंटल सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग, (१३) इकॉलॉजी ॲण्ड इव्होल्युशन, (१४) जिओमॅटिक्स
इंजिनीअरिंग, (१५) जिऑलॉजी ॲण्ड
जिओफिजिक्स, (१७)
इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग, (१८) मॅथेमॅटिकस, (१९) मेकॅनिकल इंजिनीअरिंग, (२०) मायनिंग
इंजिनीअरिंग, (२१) मेटॅलर्जिकल
इंजिनीअरिंग, (२२) नॅव्हल
आर्किटेक्चर ॲण्ड मरिन इंजिनीअरिंग, (२३) पेट्रोलियम इंजिनीअरिंग, (२४) फिजिक्स, (२५) प्रॉडक्शन
ॲण्ड इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग, (२६) स्टॅटिस्टिक्स, (२७) टेक्सटाइल इंजिनीअरिंग ॲण्ड फायबर
सायंस, (२८) इंजिनीअरिंग
सायन्स, (२९) ह्युमॅनीटिज
ॲण्ड सोशल सायन्स, (३०) लाइफ सायंस
परीक्षा
पध्दती
प्रत्येक
पेपरचे गुण १००. निगेटिव्ह मार्किंग आहे. या पेपरमध्ये तीन
प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ पध्दतीचे असतात.- (१) मल्टीपल चॉइस -बहुपर्यायी. (एमसीक्यू)-
१ किंवा
२ गुण. हे प्रश्न वस्तुनिष्ठ पध्दतीचे असतात.दिलेल्या चार पर्यांमधून
एक पर्याय बरोबर उत्तराचा असेल. १ गुण असलेल्या प्रश्नाचे उत्तर
चुकीचे लिहिल्यास एक तृतियांश गुण कपात केले जातील. २ गुण असलेल्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे लिहिल्यास २ तृतियांश
गुण कपात केले जातील.
(२) मल्टीपल
सिलेक्ट प्रश्न, (एमएसक्यू)- सर्व पेपरमध्ये १ किंवा २ गुणांचे प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न वस्तुनिष्ठ पध्दतीचे असतात. उत्तरांमध्ये
चार पर्याय असतात.यापैकी एक किंवा त्यापेक्षा अधिक उत्तर बरोबर
राहू शकतात. या सेक्शनमधील प्रश्नांसाठी निगेटिव्ह गुण नाहीत.
मात्र, एकापेक्षा अधिक अचूक उत्तरे असताना एकच
नमूद केल्यास गुण दिले जात नाही. एक चूक आणि एक अचूक उत्तर
नमूद केल्यासही गुण दिले जात नाही. आणि
किंवा (३) संख्यात्मक उत्तर पध्दत- म्हणजे
(न्युमरिकल ॲन्सर्स टाईप- नॅट) प्रश्न - या सेक्शनमधील प्रश्नांना १ किंवा २ गुण असतात. हे उत्तर
संख्यात्मक असेल. यामध्ये कोणतेही पर्याय दिले जात नाहीत. उत्तर अपूर्णांकात सुध्दा राहू शकते.
विद्यार्थ्यांना
एक किंवा दोन विषयांच्या पेपरला बसण्याची संधी दिली जाते. दोन पेपरचा पर्याय
दिलेल्या यादीप्रमाणे स्वीकारावा लागतो. मात्र पायाभूत सुविधा आणि उपलब्ध तारखा
लक्षात घेऊनच दोन पेपरर्सना बसण्याची संधी दिली जाऊ शकते.
प्रत्येक पेपरमध्ये
१०० गुणांचे ६५ प्रश्न विचारले जातील.यापैकी १० प्रश्न हे
सामान्य कलचालणी-जनरल ॲप्टिट्यूड पध्दतीचे असतील. हे प्रश्न विद्यार्थ्यांची भाषा आणि विश्लेषण कौशल्याची चाचणी करणारे असतील. ८५ टक्के गुण हे विषयावर आधारित असतील. गेट परीक्षा
कितीही वेळ देता येते.
अर्ज
फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारला जातो. दोन पेपर्ससाठी अर्ज करणाऱ्या
विद्यार्थ्यांना एकच अर्ज करावा लागता. गेट २०२४ चे गुण पुढील तीन वर्षातील प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील.
परीक्षा
केंद्रे
अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बारामती, चंद्रपूर,धुळे,जळगाव,कोल्हापूर,लातूर, मुंबई,नागपूर, नांदेड,नासिक - नवी मुंबई- ठाणे, पनवेल-रायगड, पुणे,रत्नागिरी,संगमनेर-लोनी-शिर्डी,सांगली,सातारा,सोलापूर,वसई-पालघर,वर्धा,यवतमाळ सांगली.सातारा,सोलापूर,वसई-पालघर.यापैकी कोणत्याही तीन केंद्राचा पर्याय विद्यार्थी देऊ शकतात.
वित्तीय साहाय्य-
एम टेक अभ्यासक्रमाला
प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा १२,४०० रुपयांची विद्यावेतन २२
महिन्यांसाठी दिले जाते. बीई/बीटेक/एमएस्सीनंतर थेट पीएचडीला प्रवेश घेणाऱ्या
विद्यार्थ्यांना पहिल्या दोन वर्षासाठी दरमहा ३७ हजार रुपये आणि पुढील तीन
वर्षासाठी दरमहा ४२ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते.( संपर्क साखळी-
https://www.aicte-india.org/schemes/students-development-schemes/PG-Scholarship-Scheme)
संपर्क- चेअरपर्सन,गेट(GATE)-जॅम(JAM),आयआयएस्सी,बेंगळुरु-५६००१२,दूरध्वनी-०८०-२५७६७०६८,ईमेल- gate2024.iisc.ac.in

Comments
Post a Comment