पादत्राणे : निर्मिती ते विक्री
पादत्राणे : निर्मिती ते विक्री पादत्राणे निर्मिती तंत्रज्ञान , चामडी वस्त्रप्रावरणे व आभूषण आणि वस्तुनिर्मिती या क्षेत्राची देशात व परदेशातही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. कौशल्यविकास अभियानांतर्गत केलेल्या सर्वेक्षणानुसार या क्षेत्रात पुढील काही वर्षात रोजगार आणि स्वंयरोजगाराच्या विपुल संधी मिळू शकतात. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरणारी संस्था म्हणजे फूटवेअर डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट इंस्टिट्यूट. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेस स्वायतत्ता प्रदान करण्यात आली आहे. संस्थेने पादत्राणे उद्योगास आवश्यक असणारे तज्ज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मिती करण्यासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी स्तरावरील अभ्यासक्रम सुरु केले आहेत. विविध चामडी वस्तू , वस्त्रप्रावरणे , हँड बॅग्ज , प्रवासी बॅग वा आधुनिक जीवनशैलीस लागणाऱ्या चामडी वस्तू यांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे कार्य ही संस्था करते. या संस्थेला २०१७ साली इंस्टिट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा देण्यात आला. पादत्राणे निर्मिती क्षेत्रात असा दर्जा...