अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट
अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट अग्निवीर ( अग्निपथ ) योजनेंतर्गत तिनही दल स्वतंत्रपणे भरती प्रक्रिया राबवतील. मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन निवड करावयाच्या उमेदवारांची संख्या निर्धारित केली जाईल. तसा उल्लेख, प्रत्येक दलाच्या अग्निवीर जाहिरातीमध्ये केला जाईल. ( वायुसेना अग्निवीर महिलांची संख्या ही सेवेच्या गरजेनुसार ठरवली जाईल. ) वायुसेना अग्निवीर फक्त अविवाहित मुले आणि मुलीच या योजनेसाठी पात्र ठरतात. या योजनेच्या कालावधीत संबंधितांना लग्नबंधनात अडकता येणार नाही. पुरुष उमेदवाराची उंची किमान १५२.५ सेमी तर महिला उमेदवारांची उंची १५२ सेमी असावी. वय आणि उंचीच्या योग्य प्रमाणात वजन असावे. छाती, वय आणि उंचीच्या योग्य प्रमाणात असावी. इतर शारीरिक आरोग्याची ( कान- नाक- डोळे ) मानके जाहिरातींमध्ये नमूद करण्यात येतात. उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. या अग्निवीरांच्या निवडीसाठी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता निर्धारित करण्यात आली आहे. ( १ ) विज्ञान विषय- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजीचा ...