तंत्रनिकेतनाचे महत्व


 

तंत्रनिकेतनाचे महत्व

महाराष्ट्रातील शासकीय तंत्रनिकेतनांचा दर्जा आणि दर्जा आणि गुणवत्ता बऱ्याच खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांपेक्षा उत्तम आहे. कालानुरुप वेगवेगळे अभ्यासक्रम सुरु करण्याची लवचिकता सुध्दा या तंत्रनिकेतनांनी दाखवली आहे.

या शासकीय संस्थांची वैशिष्ट्‌ये पुढील प्रमाणे सांगता येतील-

() या संस्थांमध्ये प्लेसमेंट सेल उघडण्यात आले असून, त्याव्दारे विद्यार्थ्यांना विविध उद्योग आणि कारखान्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी साहाय्य केले जाते. () इंटर्नशीपची सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. () या संस्थांमध्ये उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा आणि उच्च प्रशिक्षित अध्यापक आहेत. () या संस्थांमध्ये १० वी, १२ वी (विज्ञान/ टेक्निकल/ व्होकेशनल उत्तीर्ण) आणि कोणत्याही ट्रेड माधून १० वी नंतर आयटीआय (इंडस्ट्रिअल टेक्निकल इंस्टिट्यूट) केलेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.

महत्वाच्या संस्था आणि अभ्यासक्रम

() शासकीय तंत्रनिकेतन मुंबई- या संस्थेला शासनाने स्वायतत्ता प्रदान केली आहे. या संस्थेतील सर्व अभ्यासक्रमांमध्ये उद्योगातील सहा महिने कालावधीचा, प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा समावेश आहे. दिव्यांगांना तंत्रशिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या संस्थेने लक्षणीय प्रयत्न केले आहेत.

सध्याच्या काळासाठी महत्वाचा ठरत असलेला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग, हा अभ्यासक्रम सुरु करुन या संस्थेने दूरदृष्टिचा परिचय दिला आहे. (या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता प्रदान केली असून त्याचा कालावधी तीन वर्षांचा आहे.)

इतर अभियांत्रिकी अभ्यासक्रम

() सिव्हिल, () कॉम्प्युटर, () इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, () इलेक्ट्रिकल, () इलेक्ट्रॉनिक्स, () इंस्ट्रुमेंटेशन () मेकॅनिकल, () लेदर टेक्नॉलॉजी, () लेदर गुड्स ॲण्ड फूटवेअर टेक्नॉलॉजी, (१०) रबर टेक्नॉलॉजी (हा अभ्यासक्रम रबर उद्योग संघटनेच्या सहकार्याने सुरु करण्यात आला असून, सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी प्लेसमेंट मिळत असते.)

संपर्क- gpmumbai.ac.in

() शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद - या संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. संस्थेतील अभ्यासक्रम- () आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग () ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग, () ड्रेस डिझायनिंग ॲण्ड गार्मेंट मॅन्युफॅक्चुरिंग, () सिव्हिल, इंजिनीअरिंग, () कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, () इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, () इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, () इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, () मेकॅनिकल इंजिनीअरिंग,

(या संस्थेने मर्सिडीज बेंझ या कंपनीच्या सहकार्याने ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन ऑटोमेटिव्ह मेकॅट्रॉनिक्स, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी एक वर्षं. अर्हता-मेकॅनिकल/ ऑटोमोबाइल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिक्युनिकेशन आणि इंस्ट्रुमेशन या विषयातील पदवी किंवा पदविका. प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.)

संपर्क- gpabad.ac.in

 () शासकीय तंत्रनिकेतन पुणे- या संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. संस्थेतील अभ्यासक्रम- () सिव्हिल इंजिनीअरिंग, () कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, () इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, () इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, () इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, () मेटॅलर्जी इंजिनीअरिंग, () मेकॅनिकल इंजिनीअरिंग, () ड्रेस डिझायनिंग ॲण्ड गार्मेंट मॅन्युफॅक्चुरिंग

संपर्क- gppune.ac.in

 () शासकीय तंत्रनिकेतन नागपूर- या संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. या संस्थेमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत पुढील नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत - () आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग, () ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम, () मेकॅट्रॉनिक्स, () पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, () टेक्सटाइल मॅन्युफॅक्चरर्स, () मायनिंग ॲण्ड माइन सर्व्हेईंग,

 इतर अभ्यासक्रम- () सिव्हिल, () कॉम्प्युटर, () इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, () इलेक्ट्रिकल, () इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन, () मेटॅलर्जी, () मेकॅनिकल, () ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग ,

संपर्क- gpnagpur.ac.in

() शासकीय तंत्रनिकेतन नासिक- या संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे.

संस्थेतील वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम- () ड्रेस डिझायनिंग ॲण्ड गार्मेंट मॅन्युफॅक्चुरिंग, () इंटेरिअर डेकोरेशन ॲण्ड डिझायनिंग, () मेकॅट्रॅानिक्स, () पॉलिमर टेक्नॉलॉजी

इतर अभ्यासक्रम- () सिव्हिल, () कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, () इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, () इलेक्ट्रिकल, () इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन, () ऑटोमोबाइल, () मेकॅनिकल इंजिनीअरिंग

संपर्क- gpnashik.ac.in

तंत्रनिकेतनाचे फायदे

() अभियांत्रिकी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश मिळू शकतो. याचा अर्थ विद्यार्थ्यांना जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेइइ) किंवा एमएच - सीइटी/अभियांत्रिकी परीक्षा देण्याचा ताणतणाव सहन करण्याची आवश्यकता नाही. १२ वीनंतर अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थ्याला १२ वी विज्ञानशाखेत भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये किमान ४५/५० टक्के गुण मिळवावे लागतात. या बाबीपासून पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास मुक्तता मिळते.

() अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात पदवी  अभ्यासक्रमाचे बरेच विषयघटक शिकवले जातात. त्यामुळे पदवी अभ्यासक्रम तुलनेने इतरांपेक्षा सुलभ जाऊ शकतो.

() विद्यार्थ्यांना पदविका आणि पदवी अशा दोन अर्हता/पात्रता प्राप्त होतात. अशा उमेदवारांना खाजगी किंवा शासकीय आस्थापनांच्या भरती प्रकियेत अधिक संधी मिळू शकते,किंवा प्राधान्य मिळू शकते.

() खाजगी किंवा शासकीय क्षेत्रात  कनिष्ट अभियंता अथवा निरीक्षक/पर्यवेक्षक म्हणून रोजगार संधी मिळू शकते. स्वयंरोजगारही सुरु करता येतो.

आरक्षण लाभ

या अभ्यासक्रमांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नॉन क्रिमी लेअर इतर मागास वर्ग या घटकांच्या आरक्षणासोबतच पुढील आरक्षण ठेवण्यात येते. () महिला - ३० टक्के, () अनाथ संवर्ग- १ टक्के, (या संदर्भातील शासन निर्णय २ एप्रिल २०१८ प्रसिध्द करण्यात आला. त्याचा क्रमांक- महिला व बाल विकास विभाग, अमुजा-२०११/प्र.क्र.२१२/का-३ असा आहे.) () दिव्यांग- ५ टक्के, () आर्थिक दृष्ट्यादुर्बल घटक संवर्ग- १० टक्के, () संरक्षण सेवा कर्मचारी यांच्या मुला-मुलींसाठी- ५ टक्के

एकूण जागा

शासकीय, अशासकीय अनुदानित आणि विनाअनुदानित एकूण ३७८ संस्था असून त्यामध्ये प्रथम वर्षाच्या १ लाखांपेक्षा अधिक जागा आहेत. दुसऱ्या वर्षाच्या थेट प्रवेशासाठी ८२ हजारांहून अधिक जागा आहे. औषधी निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या ३९४ संस्था जागा असून त्यात २४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी च्या ३ संस्थांमध्ये (गव्हर्नमेंट इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी नागपूर/ महात्मा गांधी विद्यामंदिर इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी नासिक/ महाराष्ट्र स्टेट इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी पुणे) १८० विद्यार्थी आणि सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजीच्या एका संस्थेत (डेक्कन एज्युकेशन सोसासटीची तांत्रिक संस्था पुणे) ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या सर्व जागांमध्ये वेळोवळी बदल होण्याची शक्यता असते, ही बाब लक्षात ठेवावी.

शैक्षणिक शुल्क

() शासकीय स्वायत्त आणि स्वायत्त नसलेल्या व अशासकीय अनुदानित तंत्रनिकेतन (२०२२- २३ या शैक्षणिक वर्षासाठी)- खुल्या सवंर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क - १० वीनंतर पहिल्या आणि थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश - दरवर्षी ७५५० रुपये. () १२ वीनंतर पहिल्या वर्षासाठी प्रवेश- दरवर्षी ९५५० रुपये.

अनुसूचित जाती/ जमाती संवर्ग, व्हीजे (विमुक्त जाती)/ डीटी (डिनोटिफाइड ट्राइब- विमुक्त-भटक्या जमाती) एनटी (भटक्या जमाती)-ए/ एनटी-बी/ एनटी-सी/ एनटी-डी आणि विशेष मागास प्रवर्ग आणि ट्यूशन फी वेव्हर स्किम योजनेंतर्गत प्रवेश घेतलेल्यांसाठी शिक्षण शुल्क माफ. इतर मागास वर्ग संवर्ग-शिक्षण शुल्कात ५० टक्के सूट. (ट्यूशन फी वेव्हर स्किम योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. एकूण मंजूर जागांच्या ५ टक्के जागा या योजनेंतर्गत भरल्या जातात.) () विनाअनुदानित खाजगी संस्थांसाठीचे शैक्षणिक शुल्क- खुल्या संवर्गासाठी हे शुल्क नियामक प्राधिकरणामार्फत ठरवले जाते.

अनुसूचित जाती/जमाती संवर्ग, व्हीजे/ डीटी एनटी-ए/ एनटी-बी/ एनटी-सी/ एनटी - डी,विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) आणि ट्यूशन फी वेव्हर स्किम संवर्गासाठी शिक्षण शुल्क माफ. इतर मागास वर्ग संवर्ग (ओबीसी) आणि शिक्षण शुल्कात ५० टक्के सूट.

 शिक्षण शुल्कात सवलत मिळण्यासाठी-व्हीजे/ डीटी एनटी-ए/ एनटी-बी/ एनटी-सी/ एनटी - डी, एसबीसी, ओबीसी या संवर्गातील उमेदवारांना ३१ मार्च २०२४ पर्यंत वैध असणारे नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

सुरेश वांदिले

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी