स्वयंपूर्णतेची दिशा
स्वयंपूर्णतेची दिशा तंत्र कौशल्याचे महत्व वादातीत आहे.कोणत्याही प्रकारचे एखादे जरी कौशल्य मुलांकडे असल्यास त्याला स्वत:च्या पायावर उभं राहणं सुलभ जातं. अशी मुलं इतरांपेक्षा लवकर आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होतात. असे काही अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत- इंडो जर्मन टूल रुम सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयाच्या प्रशिक्षण केंद्रामार्फत औरंगाबाद येथील इंडो जर्मन टूल रुम येथे १० वी नंतरचे कौशल्य निर्मितीचे पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत-(१) ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन टूल ॲण्ड डाय मेकिंग. या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता मिळाली आहे. कालावधी- चार वर्षे. (२) सर्टिफिकेट कोर्स इन मशिनिस्ट- कालावधी दोन वर्षे. (३) डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स-कालावधी तीन वर्षे. हे अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट साठी साहाय्य केले जाते. या तिनही अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना दहावीमध्ये किमान साठ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अनुसुचित जाती आाणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये...