आयएएससाठी नि:शुल्क प्रशिक्षण


 

आयएएससाठी नि:शुल्क प्रशिक्षण

 

संघ लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएसस्सी) घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा (सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन) परीक्षेत, विशेषत: भारतीय प्रशासनिक सेवा (इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस -आयएएस) आणि भारतीय पोलीस सेवा (इंडियन पोलीस सर्व्हिस- आयएएस) मध्ये  महाराष्ट्रातील अधिकाधिक मुला-मुलींना यश मिळावे, यासाठी राज्य शासनामार्फत इच्छूक मुला-मुलींसाठी बरेच उपक्रम राबवले जातात. आणि सोई-सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. पूर्वी केवळ मुंबई येथे असणा-या अशा प्रशिक्षण केंद्रामध्ये वर्षभराचे नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाई. आता गेल्या काही वषांपासून इतर शहरांमध्येही ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या केंद्रासोबत शासनाच्या अखत्यारितील काही संस्था व महानगरपालिकांनीही असे प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहेत. या सर्व केद्रांमधील प्रवेशासाठी आता सामायिक परीक्षा घेतली जाते.

नागरी सेवा पूर्व परीक्षा- २०२४ साठीच्या प्रशिक्षण प्रवेशासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेमार्फत (एसआयएसी) घेतली जाईल. या संस्थेचे प्रशिक्षण केंद्र मुंबई, नासिक , कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती येथे आहेत. त्याचबरोबर यशदा (यशंवतराव चव्हाण विकास प्रबोधनी) च्या अंतर्गत येणारे डॉ.आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, पिंपरी-चिंचवड महागनगर (पीसीएमसी) पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सावित्रीबाई फुले ॲकॅडेमी पुणे, अंबरनाथ नगरपालिका संचालित यूपीएस्सी स्पर्धा परीक्षा केंद्र, ठाणे महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या चिंतामणी देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था (सीडीआयएसी) येथेही या परीक्षेव्दारे उमेदवांराना प्रवेश दिला जातो. या सर्व ठिकाणी विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण वेळेचे आहे. यापैकी काही ठिकाणी राहण्याची व्यवस्था संबंधित संस्थेमार्फत केली जाते. मुलींना प्राध्यान्य दिले जाते.

निवड प्रकिया

कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त उमेदवार या सामायिक परीक्षेसाठी अर्ज करु शकतो. या परीक्षेसाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करावा लागतो. सर्व संस्थामधील उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा, मुलाखत आणि संबंधिताने दिलेला संस्थेचा पर्याय यावर केली जाते. (बहुसंख्य विद्यार्थी मुंबई केंद्रांचा पर्याय देतात. त्यांची निवड ही गुणवत्ता यादी व राखीव जागांच्या निकषानुसार केली जाते.)

सुविधा आणि सोई पुढील सुविधा उपलब्ध करुन दिले जातात- () तज्ज्ञांचे नियमित मार्गदर्शक, () तज्ज्ञांचे प्रेरणादायी वाख्यान, () नियमित सराव चाचणी, () ग्रंथालय सुविधा, () वाचन कक्ष, () वायफाय आणि इंटरनेट सुविधा, () उपलब्धतेनुसार संगणक केंद्र आणि व्यायामशाळा

या प्रशिक्षासाठी निवडलेल्या गेलेल्या उमेदवारांना वेगवेगळया संस्थांमार्फत विद्यावतेतनही दिले जाते. उदा-एसआयएसी आणि पीआयटीसी- दरमहा ४ हजार रुपये, बार्टी -७ हजार रुपये, यशदा आणि पीसीएमसी- २५००रुपये,

 

सामायिक प्रवेश परीक्षेचा दर्जा हा यूपीएस्सीमार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथिमिक परीक्षेच्या दर्जासारखा असतो. अभ्यासक्रमसुध्दा जवळपास तोच असतो. त्यामुळे या अभ्यासक्रमातील विषय घटकांनुसार तयारी केल्यास या सामायिक परीक्षेत उत्तम यश मिळू शकते. खाजगी प्रशिक्षण संस्थांमध्ये भरमसाठ शुल्क भरुन प्रवेश घेण्याऐवजी शासनाच्या या केंद्रांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अधिकाधिक मुला-मुलींनी प्रयत्न करायला हवे. या संस्थेतून उत्तीर्ण झालेले आणि सध्या वेगवेगळया पदांवर असलेले उमेदवार, नियमितपणे मार्गदर्शनासाठी येतात. परीक्षेत यश कसे मिळवायचे, यासोबतच प्रशासक झाल्यानंतर कोणत्या पध्दतीने कार्यकरावे लागते याचीही माहिती या अधिकाऱ्यांकडून मिळत असते.

अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२३. लेखी परीक्षा २७ ऑगस्ट २०२३.

संपर्क- राज्य प्रशासकीय व्यवसाय सेवा प्रशिक्षण संस्था, हजारीमल सोमाणी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर,मुंबई ४००००१, दूरध्वनी- ०२२- २२७०९४२ संकेतस्थळ- saic.org.in

००००

राजर्षी शाहून महाराज शिष्यवृत्ती

आयआयटी, आयआयएम, एनआयटी, एम्स, आयआयआयटी सारख्या देशस्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौध्द प्रवर्गातील उमेदवारांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च राज्य शासन,"राजर्षी शाहून महाराज शिष्यवृत्ती "योजनेंतर्गत करत असते.

मिळणाऱ्या सुविधा-

() संपूर्ण शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी शुल्क, जिमखाना, ग्रंथालय संगणक आणि विकास शुल्क दिले जाते. () संस्थेच्या वसतिगृह आणि भोजनाचा प्रत्यक्ष खर्च दिला जातो. () या वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही तर संस्थेच्या निवास व भोजनशुल्काएवढी रक्कम उमेदवारांना दिली जाते. () वसतिगृहात जे उमेदवार राहणार नाहीत त्यांना भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेनुसार निवार्हभत्ता दिला जाईल. () प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी ५ हजार रुपये आणि पुस्तक खरेदीसाठी ५ हजार रुपये असे एकूण १० हजार रुपये दरवर्षी दिले जातील.

अटी व शर्ती

() संबंधित उमेदवाराच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा कमी असावे. () पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याला १२ वीमध्ये किमान ५५ टक्के गुण व पदव्युत्त पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याला पदवी परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळायला हवेत. () थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश मिळवणाऱ्या पदविकाधारक विद्यार्थ्यांना किमान ५५ टक्के गुण‍ मिळणे आवश्यक आहे. () या योजनेमध्ये शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.

संपर्क- आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड-पुणे-४११००१, संकेतस्थळ-www.maharashtra.gov.in.अर्ज करण्याची शेवटची तारीख- १४ ऑगस्ट २०२३

०००

मत्समारी क्षेत्रासाठी कौशल्य विकास

सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज नॉटिकल ॲण्ड इंजिनीअरिंग ट्रेनिंग  यां संस्थेमार्फत १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कौशल्यनिर्मितीचे व हमखास रोजगार मिळवून देणारे पुढील दोन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत- () व्हेसल नेव्हिगेटर कोर्स () मरिन फिटर कोर्स

दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी हा प्रत्येकी दोन वर्षाचा आहे. हे अभ्यासक्रम प्रात्यक्षिकांवर अधिक भर देणारे आहेत. विद्यार्थ्यांना खोल समुद्रात मत्स्यमारी जहाजांवर प्रत्यक्ष कार्य करावे लागते. कौशल्य प्रशिक्षण योजनेंतर्गत हे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम संस्थेच्या  कोची, चेन्नई आणि विशाखापट्टणम या कॅम्पसमध्ये शिकवले जातील.

दहावी मध्ये गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयात प्रत्येकी ४० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात.१ ऑगस्ट रोजी उमेदवाराचे वय १५ ते २० वर्षे या दरमम्यान असावे. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी वयामध्ये ५ वर्षाची सूट दिली जाते. दोन्ही अभ्यासक्रमाला प्रत्येक २० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांची निवड अखिल भारतीय सामायिक प्रवेश परीक्षेव्दारे केली जाते. ही परीक्षा ५ ऑगस्ट २०२३ रोजी विजाग, कोची, चेन्नई, कोलकता या  केंद्रांवर घेतली जाईल. ११ ऑगस्ट रोजी निकाल घोषित केला जाईल.

अभ्यासक्रमाच्या कालावधीत प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा १५०० रुपये विद्यावेतन दिलं जाईल. अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीपच्या कालावधीत दरमहा २०,५०० रुपये मानधन दिले जाईल. त्याचबरोबर एकाचवेळेला गणवेष खरेदीसाठी अडीच हजार रुयये दिले जातील.,

संपर्क-cifnet.gov.in

सुरेश वांदिले

०००

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी