Posts

Showing posts from October, 2023

इलेक्ट्रिकल व्हेईकल:नवी संधी

Image
  इलेक्ट्रिकल व्हेईकल:नवी संधी भारत सरकारने शुध्द आणि हरीत पर्याववरणासाठी वातावरणातील कर्ब उत्सर्जन कमी करण्याच्या अनुषंगाने विविध धोरणे आखली आहेत. त्याचाचा एक भाग म्हणजे इलेक्ट्रिकल वाहनांना अधिकाधिक प्रोत्साहन देणे हे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा यावर विशेष भर आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर काही सुट आणि सवलती देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. अशी वाहन खरेदी करण्याची कर्ज प्रकिया सुलभ करण्यात आली आहे शिवाय आयकरातही काही सुट देण्याचे प्रयोजन आहे. भारतात इलेक्ट्रिकल चार चाकी, दुचाकी, मोठ्या बसेस,ऑटो रिक्शा यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २०२२ मध्ये हिरो इलेक्ट्रिक या कंपनीने अशी १ लाखापेखा अधिक दुचाकी वाहने उत्पादित केली. २०२३ मध्ये सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कर्ब उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टिने पडलेले हे महत्वाचे पाऊल ठरत आहे. अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावायला लागणे याचा अर्थ भारताचा खनिज तेलाच्या आयातीवरचा खर्च कमी होणे असा होतो. कर्ब उत्सर्जनात घट आणि परकीय चलन...

आर्ट्स,कॉमर्सच्या मुलांनो चला आयआयटीत!

Image
  आर्ट्स,कॉमर्सच्या मुलांनो चला आयआयटीत! १२ वीनंतर विविध ज्ञानशाखेतील संबधित शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रकिया संपत नाही, तोच दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात आयआयटी मुंबईच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर स्कूल ऑफ ‍डिझाइनच्या, बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेची घोषणा केली जाते. २०२४ च्या शैषणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ आहे.२१ जानेवारी २०२४ रोजी चाळणी परीक्षा घेण्यात येईल. २३ जानेवारी २०२४ रोजी उत्तरे घोषित केली जातील. या उत्तरांच्या अनुषंगाने काही आक्षेप असल्यास २५ जानेवारीपर्यंत नोंदवता येतील. ८ मार्च २०२४ रोजी अंतिम निकाल घोषित केला जाईल.   ही परीक्षा, अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रस एक्झामिनेशन फॉर डिझाइन म्हणजे यूसीड (UCEED) यानावाने ओळखली जाते. या परीक्षेच्या गुणांवर आधारित इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर-स्कूल ऑफ डिझाइन मुंबई, सोबतच आयआयटी गौहाटी ( डिपार्टमेंट ऑफ डिझाइन ) आयआयटी दिल्ली ( डिपार्टमेंट ऑफ डिझाइन ) , आयआयटी हैदराबाद ( डिपार्टमेंट ऑफ डिझाइन ) ...

महाज्योती"चे कौशल्यनिर्मितीस साहाय्य

महाज्योती " चे कौशल्यनिर्मितीस साहाय्य महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती ) या संस्थेच्या मार्फत नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या संवर्गातील तरुण-तरुणींच्या रोजगार-स्वयंरोजगार आणि शिक्षण-प्रशिक्षणासाठी विविध योजना राबवत असते. या संस्थेने एमएसएमई ( मायक्रो, स्माल, मीडियम एंटरप्रायइज- सूक्ष्म-लघू आणि मध्य उद्योजकता ) , इंडो जर्मन टूल ( आयजीटीआर ) औरंगाबाद, या संस्थेशी सहकार्याचा करार केला असून, त्यानुसार उपरोक्त नमूद संवर्गातील तरुण-तरुणींना विविध कौशल्य निर्मितीचे प्रशिक्षण संपूर्णपणे नि:शुल्क दिले जाते. हे प्रशिक्षण १० वी, १२ वी, अभियांत्रिकी पदवी/ पदविका धारकांना करता येतात. हे सर्व अभ्यासक्रम रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरणारे आहेत. असे आहेत अभ्यासक्रम एकूण १३ अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो. ते पुढील प्रमाणे आहेत. ( १ ) सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी ( कॉम्प्युटराइज्ड न्युमरिकल कंट्रोल ) टर्निंग ॲण्ड मिलिंग, ( २ ) सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी टर्निंग, ( ३ ) सर्टिफिकेट कोर्स इन मिलिंग, ( ...

चाय पे चर्चा

Image
  चाय पे चर्चा चाय पे चर्चा आणि चाय पे खर्चा, हे कधी शक्य होतं, तर चहाची चव उत्तम असेल तेव्हा. ही चव कोण बरं ठरवतं ? हे ठरवणाऱ्या व्यक्तिस टी टेस्टर असं म्हणतात. चहा उत्पादकांकडे या टेस्टर्सना करीअरची संधी मिळते. प्रत्यक्ष उत्पादन निर्मिती होण्याआधी चहाची चव, सुगंध यांचं परीक्षण केलं जातं. हे परीक्षण करण्याचं कौशल्य प्रशिक्षणानं प्राप्त करता येतं. मात्र त्याचबरोबर या वेगळया करीअरबाबत पॅशनही हवं. चहाची चव सांगण्याची कला अवगत केलेल्या उमेदवारांना चांगल्या संधी मिळू शकतात. काही संस्था १ ) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ प्लँटेशन मॅनेजमेंट ही संस्था भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेचा विकास सेंटर ऑफ एक्सलंस म्हणून करण्यात येत आहे. या संस्थेला टी बोर्ड, कॉफी बोर्ड, रबर बोर्ड, स्पाईसेस बोर्ड आणि प्लँटेशन इंडस्ट्रीनं पाठबळ दिलं आहे. टी टेस्टिंग या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन या संस्थेने, प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स इन  टी टेस्टिंग ॲण्ड मार्केटिंग, हा अल्पमुदतीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. सध्याच्या का...

फिट है तो हिट है!

Image
  फिट है तो हिट है ! युवकांमध्ये फिटनेसची आवड वाढत चाललीय ही अतिशय चांगली बाब ठरतेय. यामुळे आपला देश आ फिट है तो हिट है ! युवकांमध्ये फिटनेसची आवड वाढत चाललीय ही अतिशय चांगली बाब ठरतेय. यामुळे आपला देश आरोग्यदायी राहिलच पण प्रत्येक युवक वा व्यक्ती आरोग्यदायी राहून त्याची मानसिक व शारीरिकस्थिती उत्तम राहू शकते. यामुळे आत्मविश्वास वाढून त्याला कोणतेही आव्हान स्वीकारणे जड जात नाही. फिटनेसचे  अनेक फायदे असल्यानेच आता कार्पोरेट घराणी, विविध कंपन्या, संस्था या खास आपल्या कर्मचाऱ्यांसाठी व्यक्तिगत फिटेनेस ट्रेनर नेमायला लागले आहेत. ग्लॅमर आणि क्रीडा क्षेत्रात व्यक्तिगत फिटनेस ट्रेनर नेमले जातात. नव्या पिढीची क्रयशक्ती वाढली आहे. आरोग्यदायी जीवनशैलीबाबतही ते जागरुक असतात. ही पिढी अनेक वाईट सवयींच्या आहारी गेल्याचे बोलले जाते, त्याला छेद देणारे हे वास्तव आहे. फिटनेस क्लबवडे वळणारी तरुण- तरुणींची पावले वाढली आहेत. यामुळे फिटनेस ट्रेनिंग क्षेत्रात उत्तमोत्तम करीअरच्या संधी निर्माण होताहेत. या करीअरची सुरवात करण्याआधी संबधित युवक-युवतींना फिटनेस विषयी मनापासून तीव्र आवड म्हणजेच पॅ...