आर्ट्स,कॉमर्सच्या मुलांनो चला आयआयटीत!


 

आर्ट्स,कॉमर्सच्या मुलांनो चला आयआयटीत!

१२ वीनंतर विविध ज्ञानशाखेतील संबधित शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रकिया संपत नाही, तोच दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात आयआयटी मुंबईच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर स्कूल ऑफ ‍डिझाइनच्या, बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेची घोषणा केली जाते.

२०२४ च्या शैषणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ आहे.२१ जानेवारी २०२४ रोजी चाळणी परीक्षा घेण्यात येईल. २३ जानेवारी २०२४ रोजी उत्तरे घोषित केली जातील. या उत्तरांच्या अनुषंगाने काही आक्षेप असल्यास २५ जानेवारीपर्यंत नोंदवता येतील. ८ मार्च २०२४ रोजी अंतिम निकाल घोषित केला जाईल.

 ही परीक्षा, अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रस एक्झामिनेशन फॉर डिझाइन म्हणजे यूसीड (UCEED) यानावाने ओळखली जाते.

या परीक्षेच्या गुणांवर आधारित इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर-स्कूल ऑफ डिझाइन मुंबई, सोबतच आयआयटी गौहाटी (डिपार्टमेंट ऑफ डिझाइन) आयआयटी दिल्ली(डिपार्टमेंट ऑफ डिझाइन), आयआयटी हैदराबाद(डिपार्टमेंट ऑफ डिझाइन)  आणि आयआयटीडीएम (इंडियन इं‍‍स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग) जबलपूर येथील पदवीस्तरीय डिझाइन (अभिकल्प) अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.

पुढील काही खाजगी संस्था सुध्दा यूसीडमधील गुण ग्राह्य धरतात - () सृष्टी स्कूल ऑफ आर्ट ॲण्ड डिझाइन- बेंगळुरु, () व्हीआयटी युनिव्हर्सिटी-वेल्लोर, () लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी- फगवाडा (पंजाब), () सीईपीट युनिव्हर्सिटी अहमदाबाद,() डिपार्टमेंट ऑफ डिझाइन,नेताजी सुभाष युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी – दिल्ली, (६) जे.के.लक्ष्मीपती युनिव्हर्सिटी - जयपूर, () वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ डिझाइन- सोनपत,दिल्ली एनसीआर, () एमआयटी इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन पुणे,() निरमा इंस्टिट्यूट  डिझाइन अहमदाबाद,(१०)शिव नादर युनिव्हर्सिटी, (११)फूटवेअर डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट इंस्टिट्यूट, (१२)फ्लेम युनिर्व्हसिटी, (१३)प्रेसिडेंसी युनिव्हर्सिटी(१४)सिम्बॉयसीस युनिव्हर्सिटी ऑफ प्लॅनिंग ॲण्ड आर्किटेक्चर ॲण्ड डिझाइन, (१५)डी.वाय.पाटील स्कूल आफ डिझाइन पुणे (१६) अलायन्स युनिव्हर्सिटी बेंगळुरु

स्वप्नपूर्तीची संधी

देशात अनेक ठिकाणी आयआयटी असल्यातरी मुंबई आयआयटीमध्ये प्रवेश मिळावा असे स्वप्न पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे असते. विज्ञान शाखेतील १२ वी झालेल्या विद्यार्थ्यांचे हे स्वप्न पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी या तिनही स्तरावर साकार होऊ शकते. पण वाणिज्य आणि कला शाखेतील १२ वी विद्यार्थ्यांची आयआयटी मुंबईत शिकण्याची स्वप्नपूर्ती होण्याची संधी यूसीड या परीक्षेद्वारे मिळू शकते. कारण या शाखेतील विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येते.

अर्हता-

() या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या खुल्या आणि नॉन क्रिमी लेअर इतर मागास वर्ग संवर्गातील विद्यार्थ्याचा जन्म १ ऑक्टोबर १९९९ रोजी किंवा त्यानंतर झाला असावा. अनुसूचित जाती, जमाती, आणि दिव्यांग संवर्गातील विद्यार्थ्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९९४ रोजी वा त्यानंतर झालेला झालेला असावा. ()  गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयासह १२ वी विज्ञान परीक्षा देणारे वा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तिनही संस्थांमधील अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात. मात्र गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय न घेता १२ वी विज्ञान, वाणिज्य, कला आणि मानव्यशाखेतील विद्थ्यार्थी हे आयआयटी- मुंबई आणि आयआयआयटीडीएम- जबलपूर या संस्थेतील अभ्यासक्रमांसाठी अर्ज करु शकतात. ()   १२ वीपरीक्षेत किमान गुणांसह उत्तीर्ण.

प्रवेश प्रकिया

परीक्षा केंद्रे-  महाराष्ट्रातील नागपूर, पुणे आणि मुंबई या केद्रांचा समावेश आहे.

अशी असते परीक्षा-

या परीक्षेमध्ये तीन तास कालावधीचा एक पेपर असतो. एकूण पेपर ३०० गुणांचा असतो.यामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी असे दोन भाग असतात. पार्ट ए चा कालावधी दोन तासांचा असतो. पार्ट बी चा कालावधी एक तासाचा असतो. या पेपरची भाषा इंग्रजी असून ही परीक्षा पूर्णपणे संगणक आधारित म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड आहे.

पार्ट एच्या या पेपरमध्ये पुढील तीन भाग (सेक्शन ए,बी आणि सी) असतात. (सेक्शन ए) - न्युमरिकल म्हणजेच संख्यात्मक प्रश्न. यात प्रश्नाचे उत्तर एखादी संख्या असते. या प्रश्नांसाठी कोणतेही पर्यायी उत्तरे दर्शवली जात नाहीत. संगणक पडद्यावरील व्हर्च्युअल (आभासी) कीबोर्डाचा (कळफलक) उपयोग करुन अचुक उत्तराची संख्या नोंदवावी लागते. (सेक्शन बी) - मल्टिपल सिलेक्ट म्हणजे बहुपर्यायी प्रश्न. याभागात प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय दिले जातात. यापैकी एक किंवा अधिक अचुक उत्तर राहू शकते. (सेक्शन सी) - मल्टिपल चॉईस पश्न. याभागातही प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय दिले जातात. मात्र यामध्ये एकच अचुक उत्तर असते.

पार्ट बीमध्ये प्रत्येकी ५० गुणांचे स्केचिंग आणि डिझाइन ॲप्टिट्यूडवर प्रत्येकी एक प्रश्न विचारला जातो.

अभ्यासक्रम

सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येत असल्याने पेपरची रचनासुध्दा तशीच केली जाते. परीक्षेमध्ये ढोबळमानाने पुढील घटकांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.

दृष्यात्मक संकल्पना समजण्याची क्षमता- यामध्ये चित्र, आकृती यावर आधारित प्रश्न विचारले जातात. टूडी आकार किंवा थ्रीडी वस्तुंमधील बदल, सुधारणा किंवा परस्परसंबंध याविषयी विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेची चाचपणी अशा प्रश्नांद्वारे केली जाते. दैनंदिन जीवनातील यांत्रिकी आणि शास्त्रीय संकल्पना यांचे ज्ञान

निरीक्षण आणि अभिकल्प संवेदनशीलता- सामान्य वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती यामध्ये दडलेल्या गुणांचा शोध घेणे, त्याविषयी विश्लेषाणात्मक विचारमंथन व निरीक्षण कौशल्य आणि संवदेनशीलतेची क्षमता. काही विशिष्ट बाबींकडे विशेष लक्ष पुरवून त्यांचे विश्लेषण, कारणमीमांसा, वर्गीकरण आणि भविष्यवाणी करण्याची क्षमता, दृष्यात्मक गुणधर्म आणि कलात्मक परिणाम यामधील सूक्ष्म फरक ओळखण्याची क्षमता.

पर्यावरण आणि सामाजिक जाणिव- हवामान, लोकसंख्या, पाणी, प्रदूषण, वनस्पती , नैसर्गिक संसाधने यासारख्या पर्यावरणीय घटकांबाबत सर्वसाधारण समज किंवा आकलन. या सर्व घटकांचे वस्तू, प्रतिमा आणि  पायाभूत सुविधा यांच्या अभिकल्पावर  होणारे परिणाम, अभिकल्पासंदर्भात सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांबाबत जाणिवजागृती, अभिकल्पित कलाकृतींचा इतिहास, पर्यावरणदृष्ट्या टिकावू आणि सामाजिक जबाबदारीची जाणिव असलेले अभिकल्प. कला, साहित्य आणि शिल्पकलेचा इतिहास.

विश्लेषणात्मक आणि तार्किक कारणमीमांसा - दिलेल्या  गुणात्मक आणि संख्यात्मक माहितीचे विश्लेषण आणि तार्किक विश्लेषणाची क्षमता, दिलेल्या माहितीतील अभिकल्प नमूने ओळखण्याचे कौशल्य. मत प्रदर्शित करणे, वादविवाद करणे किंवा सुयोग्य निकषांच्या बाजूने उपाययोजना करण्याचे कौशल्य, दडवलेल्या बाबी वा कल्पनांचा शोध घेण्याची क्षमता, त्यासंदर्भातील निष्कर्षसाठीचे पुरावे किंवा युक्तिवाद शोधण्याची क्षमता. छोट्या उताऱ्यातील माहितीचा उपयोग करुन दिलेल्या उत्तरांमधून सर्वाधिक अचूक उत्तर शोधण्याची तार्किक क्षमता. माहिती विश्लेषण .

 भाषा आणि सर्जनशीलता - इंग्रजी भाषेचा उपयोग व आकलनाच्या अनुषंगाने भाषा आणि सर्जनशीलक्षमता, वाचन कौशल्य, इंग्रजी व्याक्रणाचे ज्ञान, वेगळया व नाविण्यपूर्ण सर्जनशील पर्यायांचा शोध घेण्याची व विचार करण्याची क्षमता,

अभिकल्प विचारप्रणाली आणि समस्या निर्धारण- दृष्यात्मक साम्य, रुपके, चिन्हे आणि प्रतिके यांचा उपयोग करण्याची क्षमता, व्यामिश्रता समजून घेण्याची क्षमता, समस्यांची ओळख, पर्यायांचा शोध, पर्यायांचे विश्लेषण आणि उपयांची निवड.

यूसीड परीक्षा ही अभिकल्प कलचाचणी आहे. या चाचणीमध्ये विद्यार्थ्यांचा अभिकल्प अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने कल, क्षमता, कौशल्य आणि कमकुवत बाजू समजून घेण्यासाठी प्रश्नांची संरचना केली जाते. चित्रकलेतील कौशल्य असल्यास उत्तम पण नसेल तरी तो या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तितकासा महत्वाचा पैलू गणला जात नाही.

संपर्क- इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - बॉम्बे, मुंबई-४०००७६, दूरध्वनी- ०२२-२५७६ ४०६३, ,संकेतस्थळ-www.uceed.iitb.ac, ईमेल- uceed@iitb.ac.in

ही परीक्षा लागोपाठ दोन वर्षे देता येते. प्रत्येक परीक्षेतील गुण त्याच शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातात. २०२३ साली १२ची परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. २०२२ साली या परीक्षेला बसलेले विद्यार्थी यंदा ही परीक्षा देऊ शकत नाहीत.

सुरेश वांदिले

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी