Posts

Showing posts from April, 2023

अनास्था आणि निरुत्साह

Image
  अनास्था आणि निरुत्साह यंदा म्हणजेच २०२३ साली कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट ( अंडरग्रज्युएट ) -सीयूइटी-यूजी या परीक्षेसाठी देशभरातून १४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ६.५१ लाख विद्यार्थीनींचा समावेश आहे. या परीक्षेव्दारे देशातील २४२ संस्थांमध्ये पदवीस्तरीय अभ्याससक्रमासाठी प्रवेश दिला जाईल. यामध्ये सर्व केंद्रिय विद्यापीठे, राज्यातील विद्यापीठे आणि इच्छूक खाजगी शैक्षणिक संस्था आणि स्वायत्त संस्थांचा समावेश आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या ९० ने अधिक आहे. ही परीक्षा १३ भाषांमध्ये घेतली जाते. दिल्ली युनिव्हर्सिटीतील ७३ अभ्यासक्रमांसाठी सर्वाधिक २८ लाख अर्ज करण्यात आले. सरासरीने हा आकडा प्रत्येक अभ्यासक्रमासाठी ३८ हजार असा निघतो. बनारस हिंदू विद्यापीठातील २३ अभ्यासक्रमांसाठी साडे आठ लाख अर्जांची नोंदणी झाली आहे. या परीक्षेव्दारे प्रत्येक विद्यार्थी कमाल १० पदवीस्तरीय विषयांसाठी अर्ज करु शकतो आणि त्याला बहुवीध संस्था आणि अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करता येणे शक्य आहे. या परीक्षेतील सर्वसाधारण चाचणी ( जनरल टेस्ट ) च्या पेपरसाठी सर्वाधिक ८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केल...

संकल्प आणि सिध्दी

Image
  संकल्प आणि  सिध्दी सध्याच्या आत्यंतिक स्पर्धेच्या काळात मनाजोगत करिअर करणे दिवसेंदिवस कठीण   होत चालले असले तरी त्यासाठी निर्धारपूर्वक प्रयत्न करायला हवा. खूप हुषार की किमान बुध्दीमत्तेचा असो, कुणाचीही स्पर्धेपासून सुटका नाही. ही बाब एकदा पक्की लक्षात घेतली की मग सर्व बुध्दिमत्ता आणि कौशल्य पणाला लावून प्रयत्न केल्यास ठरवलेले उद्दिष्ट गाठता येणे शक्य होऊ शकतं. करिअरची निवड क रिअरची निवड, हा प्रत्येक तरुणाचा अत्यंत महत्वाचा निर्णय असतो. हा निर्णय त्यांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पाडत असतो. आपण कुठे राहणार, काय करणार, किती उत्पन्न मिळणार, जीवनशैली कोणती राहणार या सर्वबाबी कोणते करिअर निवडू किंवा नोकरी- व्यवसाय करु याच्याशी निगडित असतात. दोन तीन दशकांपूर्वी करिअरसंबंधी जी स्थिती अवतीभवती होती, तशी आता राहिलेली नाही. कारण जगातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. यासाठी तंत्रज्ञान, दळणवळण आणि संपर्क साधनात झपाट्याने झालेल्या व दरदिवशी होत असलेल्या प्रगतीचा मोठा हातभार लागत आहे. त्याचे प्रतिबिंब करिअच्या बदलत्या स्वरुपात झालेले दिसते. हे बदल आजच्या तरुणा...

दर्जेदार संस्था आणि सुवर्ण संधी

Image
  दर्जेदार संस्था आणि सुवर्ण संधी     नेमक्या कोणत्या संस्थांमध्ये प्रवेश मिळाल्यास उत्तम करिअर घडू शकते, असा प्रश्न बऱ्याच पालकांना पडत असतो. आपल्या देशात 10 वी आणि 12 वी नंतर दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण - देणाऱ्या उत्तमोत्तम शासकीय शिक्षण संस्थ ा असून, त्यात प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थी चांगल्या करिअरच्या दिशेने झेप घेऊ शकतो.   १२ वीनंतर प्रवेशासाठीचा " रोडमॅप " तयार करताना अशा काही संस्थांचा विद्यार्थी आणि पालकांन ी आवर्जून विचार करायला हवा . या शिक्षण संस्थांचे वैशिष्ट म्हणजे त्यांना केंद्र आणि राज्य शासनाचं आर्थिक सहकार्य मिळालं आहे . यातील बहुतेक संस्थांना सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून मान्यता देण्यात आली आहे . या संस्थांमध्ये उत्तम दर्जाच्या प्रयोगशाळा , वाचनालये व अनुभवी प्राध्यापक आहेत . विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात या संस्था आघाडीवर असतात . या संस्थांमध्ये असणाऱ्या प्लेसमेंट सेलद्वारे विद्यार्थ्यांना इंटर्नशीप आणि करिअरच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्या...