दर्जेदार संस्था आणि सुवर्ण संधी


 दर्जेदार संस्था आणि सुवर्ण संधी

    नेमक्या कोणत्या संस्थांमध्ये प्रवेश मिळाल्यास उत्तम करिअर घडू शकते, असा प्रश्न बऱ्याच पालकांना पडत असतो. आपल्या देशात 10 वी आणि 12 वी नंतर दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण - देणाऱ्या उत्तमोत्तम शासकीय शिक्षण संस्था असून, त्यात प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थी चांगल्या करिअरच्या दिशेने झेप घेऊ शकतो.

 १२ वीनंतर प्रवेशासाठीचा "रोडमॅप" तयार करताना अशा काही संस्थांचा विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून विचार करायला हवा. या शिक्षण संस्थांचे वैशिष्ट म्हणजे त्यांना केंद्र आणि राज्य शासनाचं आर्थिक सहकार्य मिळालं आहे. यातील बहुतेक संस्थांना सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या संस्थांमध्ये उत्तम दर्जाच्या प्रयोगशाळा, वाचनालये अनुभवी प्राध्यापक आहेत. विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात या संस्था आघाडीवर असतात.या संस्थांमध्ये असणाऱ्या प्लेसमेंट सेलद्वारे विद्यार्थ्यांना इंटर्नशीप आणि करिअरच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातात.या संस्थांमधील शुल्क साधारणत: सर्वांनाच परवडणारे असते. ज्यांना शक्य नसेल, त्यांच्यासाठी या संस्था शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक बँकांशी सहकार्य करतात. मुला-मुलींसाठी राहण्यासाठी वसतिगृहाची सुविधाही बऱ्याच संस्था उपलब्ध करुन देतात. बऱ्याच संस्था शिष्यवृत्तीही देतात. मुला-मुलींचा चौफेर व्यक्तीमत्व विकास व्हावा यादृष्टिने सातत्याने प्रयत्न केले जातात. कौशल्य विकास आणि उद्योजकतेवरही भर दिला जातो

अशा काही संस्था पुढीलप्रमाणे नोंदवता येतील..

1) वैद्यकीय शिक्षण - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स- नवी दिल्ली व इतर कॅम्पस, जवाहरलाल नेहरु इन्स्टिटट्यूट ऑफ मेडिकल सायन्स-पुडिचेरी, सेवाग्राम मेडिकल कॉलेज, सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये

 2) अभियांत्रिकी शिक्षण- सर्व इंडियन इंस्टिट्‌यूट ऑफ टेक्नॉलॉजी, (आयआयटी), सर्व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), इंडियन इंस्टिट्‌यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी(आयआयआयटी), राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये, शासनाची तंत्रनिकेतने (पॉलिटेक्निक कॉलेज),

3) डिझायनिंग - नॅशनल स्कूल ऑफ डिझायनिंग - पाल्डी अहमदाबाद/ गांधीनगर / बेंगळुरु/ कुरुक्षेत्र/ जोरहट/ भोपाळ/ विजयवाडा, इंडस्ट्रियल डिझाइन इंस्टिट्यूट,आयआयटी- मुंबई,

4) फॅशन तंत्रज्ञान - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी-नवी दिल्ली/नवी मुंबई/अहमदाबाद, गांधीनगर,जोधपूर, कांग्रा, भोपाळ, बेंगळुरु, भुवनेश्वर, पाटणा, रायबरेली, शिलाँग, हैदराबाद, जोधपूर, कानपूर, कोलकता

5) पत्रकारिता/मास कम्युनिकेशन- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन- नवी दिल्ली/ झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन-मुंबई,

6) योग शिक्षण- मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा- नवी दिल्ली ,

7) विधी - नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी/ विद्यापीठातील विधी महाविद्यालये, नॅशनल लॉ स्कूल्स ,

8) हॉटेल मॅनेजमेंट- नॅशनल हॉटेल ण्ड कॅटेरिंग मॅनेजमेंट कौन्सिलच्या अंतर्गत येणारी शासनाची महाविद्यालये, डॉ.वाय.एस.आर. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम ऍ़ण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट- हैदराबाद ,

9) लष्करी शिक्षण- नॅशनल डिफेन्स कॅडमी-खडकवासला, इंडियन मिलिटरी स्कूल -चेन्नई ,

10) पायलट ट्रेनिंग- इंदिरा गांधी नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ एव्हिएशन-रायबरेली,

11) कथ्थक नृत्य- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कथ्थक- नवी दिल्ली,

12) खेळ प्रशिक्षण- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स-पतियाळा, राणी लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन - ग्वाल्हेर, नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी- इंफाल(मनिपूर),

13) चित्रपट/टीव्ही प्रशिक्षण- फिल्म ण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे/ सत्यजित रे फिल्म ण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट,कोलकता,

14) स्टॅटिस्टिक्स-इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कोलकता,

15) मॅथेमॅटिक्स - चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट-चेन्नई,

16) ग्रामीण व्यवस्थापन- रुरल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-आनंद,

17) अध्यापन - रिजनल एज्युकेशन इन्स्टिट्यूट-भोपाळ/ म्हैसूर/ अजमेर/ कुरुक्षेत्र/ शिलाँग ,

18) पादत्राणे निर्मिती- सेंट्रल फूटवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट-चेन्नई,फूटवेअर डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट इंस्टिट्यूट- पाटणा, जोधपूर ,गुणा, नॉयडा, हैदराबाद, चैन्नई, रायबरेली, रोहतक, चंदिगढ, छिंदवाडा, अंकलेश्वर, कोलकता, 19) मरीन अभियांत्रिकी- इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी -नवी मुंबई, मुंबई बंदर, कोची, चेन्नई, कोलकता, विशाखापट्टणम

 20) संशोधन- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरूइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च पुणे/भोपाळ/थिरुवनंतपूरम/ कोलकता, तिरुपती, बेहरामपूर, डिपार्टमेन्ट ऑफ टोमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक  सायन्सेस - मुंबई,नॅशनल ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च- भुवनेश्वर,

21) पर्यटन- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल ऍ़ण्ड टुरिझम मॅनेजमेंट-ग्वाल्हेर,नॉयडा, गोवा, भुवनेश्वर

22) माहिती तंत्रज्ञान- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नालॉजी- ग्वाल्हेर, कोटा, गौहाटी, कल्याणी, सोनपत, वडोदरा, पुणे, नागपूर, बेंगळुरु

23) इंटिग्रेटेड अभ्यासक्रम- वेगवेगळ्या सेंट्रल युनिव्हर्सिटी,

24) व्यवस्थापन- सर्व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट,

25) सामाजिक शास्त्रे- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स,

26) पेट्रोलिअम टेक्नॉलॉजी-राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम टेक्नालॉजी-रायबरेली,

27) फॉरेस्ट्री- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट-भोपाळ

28) वित्त-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स-नवी दिल्ली/नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनांशिअल मॅनेजमेंट-नवी दिल्ली ,29) हेल्थ ऍ़ण्ड हॉस्पिटल मॅनेजमेंट- इंडियन इंस्टिटयूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट - बेंगळुरु,

30) अपंग शिक्षण/प्रशिक्षण- अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हिअरिंग हँडिकॅप्ड-मुंबई, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच ऍ़ण्ड हिअरिंग म्हैसूर,

31) फिशरी सायंस- सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशर नॉटिकल अँड इंजिनियरिंग-कोची,

32)जेम्स ऍ़ण्ड ज्वेलरी - इंडियन इंस्टिट्यूट इंस्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी-मुंबई

33) औषधी निर्माण- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फार्मा‍स्यिुटिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च-अहमदाबाद, हाजीपूर ,हैदराबाद, कोलकता, मोहाली

 

प्रवेश प्रक्रिया

    बहुतेक या संस्थांमध्ये अखिल भारतीय चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. या संस्थांमधील शैक्षणिक अभ्यासक्रम हे जून-जुलै या महिन्यात सुरु होतात. तथापि प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रिया किमान तीन चार महिने वा त्याआधीच सुरु होते. या महत्वाच्या बाबीकडे बहुतेकांचं दुर्लक्ष होतं. 12 वीची परीक्षा झाल्यावर अथवा 12 वीचा निकाल लागल्यावर अनेक पालक आणि विद्यार्थी वेगवेगळ्या संस्थांच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची माहिती घ्यायला सुरुवात करतात. या शोध मोहिमेतून त्यांच्या लक्षात येतं की काहिंच्या चाळणी परीक्षा एप्रिल-मे महिन्यात असल्या तरी अर्ज भरण्याची तारीख ही डिसेंबर-जानेवारी महिन्यातच संपलेली आहे. त्यामुळे या संस्थांच्या परीक्षांना विद्यार्थ्यांना मुकावं लागतं. आयआयटीच्या प्रवेशासाठी होणाऱ्या JEE-MAIN या परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेविषयी जशी शंभर टक्के जागृती असते तशी ती इतर परीक्षांविषयी असत नाहीत. शाळा-महाविद्यालयांमधूनही याविषयी वेळोवेळी माहिती देणे आवश्यक असते. अपवाद वगळता ही महाविद्यालये याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.

     नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन या महत्वाच्या संस्थेच्या बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमाच्या २०२३ च्या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश परीक्षा  जानेवारी २०२३ रोजी पार पडली. २२ ते २५ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज  सादर करण्याची अंतिम तारीख होती.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नालॉजीच्या २०२३ च्या शैक्षणिक सत्रासाठी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करण आवश्यक होतं.  ५ फेब्रुवारी २०२३ रोजी परीक्षा पार पडली. ही उदाहरणं यासाठी देण्यात आलीत की पालकांना वा विद्यार्थ्यांनी वेळेवर अर्ज भरला नसेल तर या परीक्षा विद्यार्थी देऊ शकणार नाहीत. याचाच अर्थ या दर्जेदार संस्थांधील अभ्यासक्रमांना हे विद्यार्थी मुकणार.संधी स्वत:हून गमावण्याचा हा प्रकार झाला.यामुळे या संस्थांमध्ये अल्पसंख्येने हुषार मराठीमुले निवडली जातात.ही बाब गेल्या वर्षीसुध्दा निदर्शनास आणली होती. यंदा 12 वी दिलेल्या विद्यार्थ्यांची जरी संधी हुकली असेल तरी पुढील शैक्षणिक वर्षात 12 वी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या संस्थांच्या परीक्षांच्या घोषणेकडे लक्ष ठेवावे.या संस्थांच्या प्रवेश प्रकियांची सर्वसाधारण माहिती सर्वच प्रमुख वृत्तपत्रांमधून जाहीर केली जाते. याच बरोबर डिसेंबर - जानेवारीच्या सुमारास स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटिस, नॅशनल डिफेन्स कॅडेमी, नौदलातील  10+2 बीटेक एन्ट्री स्कीम, अशा काही प्रवेश प्रकियांचीही माहिती वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजगार समाचार या माध्यमांमधून ठळकरित्या प्रकाशित केली जाते. त्याकडे लक्ष ठेवणे गरजेचं आहे. शाळा/महाविद्यालयांनी या नुषंगाने पुढाकार घेऊन वेळावेळी आपल्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणायला हवी.

सुरेश वांदिले

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी