उड्डाण
उड्डाण इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये आणि बीटस पिलाणी सारख्या देशातील नामवंत आणि दर्जेदार अभियांत्रिकी शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांमध्ये मुलींची प्रवेश संख्या समाधानकारक नाही. याचं महत्वाच कारण या संस्थांच्या प्रवेश परीक्षांमध्ये विद्यार्थींनींची कामगिरी ही समाधानकारक होत नाही. विशेषत: आर्थिकदृष्ट्या कमकुवत सवंर्गातील विद्यार्थींना या अभियांत्रिकी संस्थांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या चाळणी परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक आणि दर्जेदार प्रशिक्षण किंवा शिकवणी उपलब्ध होत नाही. या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा आणि शालेय अभ्यासक्रमाचं अध्ययन यामध्ये मोठी दरी पडल्याचं दिसून आलं आहे. या दोन्ही समस्यांचा मोठा फटका विद्यार्थींनींना बसत आलाय. त्यामुळेच ही योजना सुरु करण्यात आली. या समस्या सुटल्या तर मुलांसमेवतच हुषार आणि प्रज्ञावंत मुलीही राष्ट्र निर्मितीच्या कार्यात आपला महत्वाचा सहभाग देऊ शकतील, असा विश्वास केंद्र सरकारला वाटतो. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएस...