स्टायलिंग आणि प्रतिमा निर्मिती


स्टायलिंग आणि प्रतिमा निर्मिती

फॅशन  विषयातील विविध पैलुंचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी पर्ल ॲकॅडेमी ही आपल्या देशातील महत्वाची खाजगी शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेने फॅशन विषय घटकांशी निगडित पदवी, पदव्युत्तर पदवी आणि व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केले आहेत. हे सर्व अभ्यासक्रम रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरणारे आहेत.असाच एक अभ्यासक्रम आहे- फॅशन स्टायलिंग ॲण्ड इमेज डिझाइन

चैतन्यदायी प्रक्रिया

फॅशन स्टायलिंग ही अतिशय चैतन्यदायी प्रक्रिया आहे. यामध्ये व्यक्तीचे दिसणे, सौंदर्य आणि प्रसंग  यांचा एकत्रित विचार करुन पोषाखाचे डिझाइन किंवा स्टायलिंग केले जाते. प्रतिमा निर्मिती किंवा डिझाइन हे फॅशन क्षेत्रातील उपघटक समजले जाते. यामध्ये सध्याच्या काळात आवश्यक असणारे संवाद कौशल्य आणि तंत्र, प्रात्यक्षिके आणि प्रतिमा निर्मिती  क्षेत्रातील माहिती यांचा समावेश केला जातो. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना आवश्यक ज्ञान प्रदान केले जाते.

या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार २०२७ पर्यंत फॅशन स्टायलिंग आणि इमेज डिझाइन या क्षेत्रातील वार्षिक उलाढाल ३५.०३ बिलियन डॉलर्स पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. फॅशन उद्योगाची भारतातील वार्षिक विकास वाढ ही ९.७. टक्के आहे. जागतिक फॅशन उद्योग अर्थकारणातील भारताचा वाटा हा १३.५ टक्के इतका आहे. २००० सालानंतर यामध्ये जवळपास दुप्पट वाढ

झाली असून हा वेग आणखी वाढलेला दिसून येतो.

जागतिक स्तरावर भारतीय फॅशनक्षेत्राने आपला स्वत:चा आगळावेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या उत्तमोत्तम सर्जनशील  आणि भरघोस वेतनाच्या संधी प्रतिभावंत उमेदवारांना सुलभतेने मिळू शकतात. हा अभ्यासक्रम केल्‍यावर फॅशन क्षेत्रातील "ट्रेंडसेटर", बणने शक्य होऊ शकते.

इतर व्यक्ती कोणत्या प्रकारचा-पध्दतीचा पेहराव घालतात याकडे लोकांचे लक्ष असते. ही मानवी प्रवृत्ती फॅशन स्टायलिस्टला विविध करिअरसंधी मिळवून देऊ शकते. फॅशनच्या विविध पैलुंबद्दल उत्सुकता, प्रेम, रंग ,आकार आणि स्टाइल बद्दलच्या प्रयोगाबाबतची आवड, कल्पनाशक्ती, सर्जनशीलतेला वाव आणि फॅशन डिझाइनची आवड असणाऱ्या उमेदवारांना प्रतिमा निर्मितीचा हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. २५ टक्के फॅशेन डिझायनर्स हे स्वयंरोजगार करणारे असतात. त्यामुळे हा अभ्यासक्रम केल्यावर स्वत:चा उद्योग किंवा स्टार्टअप सुरु करण्यासाठी तंत्र, कौशल्य आणि आत्मविश्वास मिळतो. मोठी संपर्क साखळी सुलभतेने उपलब्ध होऊ शकते.

काय करु शकाल?

(१) प्रतिमा, चलतचित्र आणि अक्षरांचा सुयोग्य मेळ घालून इमेज डिझायनर सर्जनशील डिझाइन तयार करु शकतो. (२) हेअर स्टायलिस्ट हा केसांच्या फॅशन आणि उपचारांचे तंत्र हस्तगत केलेला असतो. (३) प्रतिमा निर्मिती सल्लागार हा एखाद्या व्यक्तिची व्यक्तिगत ‍किंवा व्यावसायिक प्रतिमेची निर्मिती आणि त्या प्रतिमेचे सतत उन्नतीकरण करतो. व्यावसायिक‍ सादरीकरणाच्या  वेळेस संबंधित व्यक्तीचा उत्कृष्ट प्रभाव कसा पडेल, याकडे हा स्टायलिस्ट लक्ष पुरवतो. (४) फॅशन स्टायलिस्ट हा सेलिब्रिटी स्टायलिस्ट म्हणून ओळखला जातो. संबंधित सेलिब्रिटीच्या केसांच्या रचने पासून तर पोषांखाच्या डिझाइनपर्यंतच्या सर्व उत्कृष्ट बाबींची निवड हा स्टायलिस्ट करतो. संबंधित व्यक्ती अतिशय प्रभाविरीत्या लोकांसमोर सादर झाली पाहिजे याकडे हा स्टायलिस्ट लक्ष पुरवतो. (५)  जनसंपर्क सल्लागार हा विविध डिझाइनच्या पोषांख आणि पेहरावर लावायच्या इतर वस्तू/साधने (ॲक्सेसरीज) यांची प्रसिध्दी आणि प्रचार करतो. त्यासाठी मुद्रित माध्यमे, समाज माध्यमे,ऑनलाइन, प्रसारण अशा विविध मार्केटिंग/विपणन आणि माध्यम प्रकारांचा वापर करतो. एखाद्या ब्रँडची सकारात्मक प्रतिमा निर्मिती करण्यासाठी जनसंपर्क कंपन्या अशा उमेदवारांची सेवा घेत असतात.

करिअर संधी

या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा असून कोणत्याही विषातील १२वी उत्तीर्ण विद्यार्थी हा अभ्यासक्रम करु शकतो. हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी मिळू शकतात- (१) फॅशन लेबल्स ॲण्ड ब्रँड्स, (२) रिटेल क्लॉथिंग ब्रँड, (३) प्रिंट मीडिया, (४) इलेक्ट्रॉनिक मीडिया, (५) कॉर्पोरेट ॲण्ड ऑर्गनायझेशन, (६) ‍ट्रेन्ड फॉरकॉस्टिंग मॅगेझिन, (७) फॅशन ऑर एंटरटेनमेंट मीडिया, (८) फॅशन मॅगेझिन, (९) ई कॉमर्स पोर्टल, (१०) कॉस्चुम डिझाइन (११) कर्मशिअल स्टायलिस्ट, (१२) फॅशन ॲण्ड लाइफस्टाइल ब्लॉगर्स, (१३) कॉर्पोरेट ट्रेनर्स, (१४) इमेज डिझायनर्स, (१५) सोशल मीडिया मॅनेजर, (१६) पब्लिक रिलेशन्स फर्म्स, (१७) पर्सनल शॉपर्स, (१८) फॅशन शो स्टायलिस्ट, (१९) सेलिब्रिटी स्टायलिस्ट, (२०) इमेज कंसलटंट.

या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना छायाचित्रण, व्हिडियो निर्मिती,हेअर ॲण्ड मेकअप, ग्रॅफिक डिझाइन अशा सारखे बाबींचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे फॅशन उद्योगासाठी लागणारी सगळी अस्त्रे विद्यार्थ्यांना मिळतात. अभ्यासक्रमाच्या कालावधीतील विद्यार्थ्याची आवड आणि गती लक्षात घेऊन ते व्यक्तिगत स्टायलिंग, संपादकीय स्टायलिंग, पोषाख डिझाइन आणि स्टायलिंग,वाणिज्यिक स्टायलिंग या पैकी कोणत्याही एका क्षेत्रात  स्वत:चा करिअर मार्ग निश्चित करु शकतात. यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत होण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे संवाद कौशल्य आणि फॅशन स्टाइल कौशल्य हस्तगत करु शकतात. हा अभ्यासक्रम आंतरज्ञानशाखीय असून यामध्ये ब्रँडिंग, रिटेल क्लॉथिंग ब्रँड्स, मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, कॉर्पोरेट आणि संस्था, फॅशन निदान संस्था, फॅशन आणि मनोरंजन उद्योजकता आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. निवडलेल्या स्पेशलयाझेशनमध्ये तज्ज्ञता प्राप्त करता यावी अनुषंगाने विषय घटकांची संरचना केली असते.

संपर्क- https://pearlacademy.com/academics/courses/undergraduate/fashion-styling-image-design/

सुरेश वांदिले

 


Comments

Popular posts from this blog

उच्च शिक्षणाचे प्रवेशव्दार!

महिला किसान सशक्तीकरण

वेगळे पर्याय