प्रवेश घ्या,करिअर घडवा


 

प्रवेश घ्या,करिअर घडवा

उत्तम करिअर घडवू शकणाऱ्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अजुनही सुरु आहेत.अशा काही संस्था पुढील प्रमाणे आहेत-

(१) सामान्य परिचर्या आणि प्रसविका

 गोकूळदास तेजपाल रुग्णालय मुंबईच्या अंतर्गत येणाऱ्या परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयात  सामान्य परिचर्या आणि प्रसविका हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम चालवला जातो. हा अभ्यासक्रम केल्यावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी सुलभतेने उपलब्ध होऊ शकतात. या अभ्यासक्रमाच्या २५ जागा असून यातील ५० टक्के जागा ठाणे, पालघर, रत्नागिरी,रायगड आणि पालघर या जिल्ह्यांसाठी राखीव आहे. याचा अर्थ अर्ध्या जागा या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाच केवळ मिळू शकतात. १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात. अर्ज केलेल्या इच्छूक विद्यार्थ्यांची गुणानुक्रमे व आरक्षणनिहाय गुणवत्ता यादीतयार केली जाते. त्यानुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाते. ५ सप्टेंबर २०२३ ला मुलाखती घेण्यात येतील. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी ६ सप्टेंबर २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात येईल. १३ सप्टेंबर पासून प्रत्यक्ष प्रशिक्षणास सुरुवात होईल. यावेळी अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करुन प्रतिक्षा यादीतील गुणवत्ता यादीतील पुढील क्रमांकाच्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाईल.

संपर्क-तळ मजला,ओपिडी इमारतीच्या समोर, गोकुळदास तेजपाल रुग्णालय, ग्रँट वैद्यकीय महाविद्दालय, लोकमान्य टिळक मार्ग मुंबई ४००००१, दूरध्वनी-०२२-२२६२१४६४

०००

(२) सेंट्रल टूल रुम आणि ट्रेनिंग सेंटर

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता (एसएसएमई)मंत्रालयाच्या अंतर्गत देशात अनेक ठिकाणी कौशल्य निर्मिती प्रदान करणाऱ्या शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये देशातील कोणत्याही भागातील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. साधारणत: सहा महिने ते एक वर्षं कालावधीचे हे अभ्यासक्रम केल्यास रोजगार आणि स्वयंरोजगाच्या संधी मिळू शकतात.या अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जातो.

भूवनेश्वरस्थित सेंट्रल टूल रुम आणि ट्रेनिंग सेंटर या अशाच एका संस्थेच्या वेगवेगळया तांत्रिक अभ्यासक्रमांच्याप्रवेशाची प्रकिया सुरु झाली आहे. या संस्थेमार्फत पुढील अभ्यासक्रम चालविले जातात. (कंसातील माहिती ही नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनआरक्यूएफ) म्हणजे राष्ट्रीय कौशल्य अर्हता स्तराची आहे. या स्तर किंवा लेव्हलनुसार रोजगारची संधी उपलब्ध होत असते.)

(१) ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन मशिन मेंटनन्स ॲण्ड ऑटोमेशन,अर्हता- इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंस्ट्रुमेंटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स या अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा पदविका,  कालावधी- सहा महिने, (एनआरक्यूफ लेव्हल-सहा ), (२)ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन सीएनसी प्रोग्रॅमिंग टेक्निक्स ॲण्ड प्रॅक्टिस, अर्हता- मेकॅनिकल किंवा प्राडॅक्शन किंवा ऑटोमोबाइल किंवा मोल्ड मेकिंग किंवा टूल डिझाइन या अभियांत्रिकी विषयातील पदविका,  कालावधी-  सहा महिने, (एनआरक्यूफ लेव्हल-सहा),(३)ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन स्ट्रक्चरल डिझाइन ॲण्ड ॲनॅलिसीस,अर्हता- सिव्हिल या अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा पदविका,  कालावधी- सहा महिने, (एनआरक्यूफ लेव्हल-सहा),(४) ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन कॉम्प्युटर हार्डवेअर ॲण्ड नेटवर्क मॅनेजमेंट,अर्हता- बी.एस्सी किंवा कोणत्याही विषयातील पदवी किंवा पदविका.,  कालावधी- सहा महिने, (एनआरक्यूफ लेव्हल-सहा), (५) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन  ऑटोमेशन ॲण्ड प्रोसेस कंट्रोल,अर्हता- इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंस्ट्रुमेंटेशन या अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा पदविका,  कालावधी- सहा महिने, (एनआरक्यूफ लेव्हल-सात),(६) सर्टिफिकेट कोर्स इन मशिनिंग,अर्हता- फिटर विषयातील आयटीआय,  कालावधी- सहा महिने, (एनआरक्यूफ लेव्हल-सहा), (७) सर्टिफिकेट कोर्स इन इलेक्ट्रिकल इक्पिमेंट रिपेअर ॲण्ड मेंटनन्स,अर्हता- इलेक्ट्रिकल या अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा पदविका,  कालावधी- सहा महिने, (एनआरक्यूफ लेव्हल-सहा), (८) ॲडव्हान्स्ड ॲडव्हान्स्ड एम्बेडेड टेक्नॉलॉजी ,अर्हता- इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंस्ट्रुमेंटेशन किंवा बायोमेकिडकल या अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा पदविका किंवा आयटी/इलेक्ट्रॉनिक्स/फिजिक्स विषयातील बीएस्सी किंवा एमएस्सी,  कालावधी-  सहा महिने, (एनआरक्यूफ लेव्हल-सहा),(८) पोस्ट डिप्लोमा कॉम्प्युटर एडेड डिझाइन/ कॉम्प्युटर एडेड मेंटनंस, अर्हता- मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाइल,प्रॉडक्शन किंवा टूल ॲण्ड डाय मेकिंग या अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा पदविका,  कालावधी- एक वर्षं/ , (एनआरक्यूफ लेव्हल-सहा), (९) पोस्ट डिप्लोमा  टूल ॲण्ड डाय मॅन्युफॅक्चुरिंग, अर्हता- मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाइल, प्रॉडक्शन किंवा टूल ॲण्ड डाय मेकिंग या अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा पदविका,  कालावधी- एक वर्षं/ , (एनआरक्यूफ लेव्हल-सहा)

या सर्व अभ्यासकमांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वावर प्रवेश दिला जातो. प्लेसमेंटसाठी एमएसएमई पोर्टलव्दारे सहाय्य केले जाते.

अनुसूचित जाती आणि जमातींच्या उमेदवारांना शिक्षण शुल्कातून सूट दिली जाते.

संपर्क-सेंट्रल रुम ॲण्ड ट्रेनिंग सेंटर,बी-३६,चांडका इंडस्ट्रिअल एरिआ, भूवनेश्वर-७५१०२४,दूरध्वनी-०६७४-२६५४७७०,संकेतस्‍थळ-cttc.gov.in,ईमेल- cttc@cttc.gov.in

०००

(३) राजीव गांधी नॅशनल एविशन युनिव्हर्सिटी

या संस्थेने पुढील दोन अभ्यासक्रम सुरु केले आहेत- (१)         पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एअरपोर्ट ऑपरेशन्स .हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारास करता येतो. या विद्यार्थ्याला पदवी परीक्षेत ५० टक्के गुण मिळायला हवेत. राखीव संवर्गासाठी गुणांमध्ये ५ टक्के सुट दिली जाते. विमानतळाचे प्रत्यक्ष कामकाज कसे चालते, याविषयी या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम जीएमआर एविएशन ॲकॅडेमी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी दीड वर्षे आहे. यातील सहा महिने प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा आहे. हे प्रशिक्षण हे जीएमआरच्या दिल्ली आणि हैदराबाद विमानतळावर दिले जाते. या अभ्यासक्रमाची पहिली तुकडी २०१९ साली बाहेर पडली. यातील बहुतेक सर्व विद्यार्थ्यांना इंडिगो, अदानी एअरपोर्ट, जीएमआर एअरपोर्ट, फेडएक्स, कतार एअर, डी.बी शेंकर या कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळाली आहे. दुसऱ्या तुकडीला उपरोक्त नमूद कंपन्यासोबत यूडीएस आणि विस्तारा कंपनीमध्ये संधी मिळाली. सध्या या अभ्यासक्रमाची तिसरी तुकडी प्रशिक्षण घेत आहे.

 () बॅचलर ऑ मॅनेजमेंट स्टडीज इन एव्हिएशन सर्व्हिसेस ॲण्ड कार्गो - या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षाचा आहे. या तीन वर्षापैकी दोन वर्षे सैध्दांतिक अभ्यासक्रम शिकवला जातो. एक वर्षं प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण इंटर्नशीपच्या स्वरुपात दिले जाते.  हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करता येतो. या विद्यार्थ्याला १२वीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत.राखीव संवर्गासाठी गुणांमध्ये ५ टक्के सुट दिली जाते. हा अभ्यासक्रम भारत सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळातील हवाईवाहतुक तज्ज्ञांच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे.

या दोन्ही अभ्यासाक्रमांच्या रिक्त जागा भरण्याची प्रवेश प्रकिया सध्या सुरु आहे.हा अर्ज ऑन लाइन भरता येतो.

संपर्क-संकेतस्थळ-www.rgnau.ac.in,ईमेल- admissions-2023@rgnau.ac.in

000

(४) वास्तुकला शास्त्र पदवी

 देशातील वास्तुकला व्यावसायिक आणि  शिक्षण यांचे संनियंत्रण करणाऱ्या काउंसिल ऑफ आर्किटेक्चर या संस्थेने नुकतेच वास्तुकलाशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दोन नव्या सुधारणा  केल्या आहेत. त्यापुढील प्रमाणे आहेत-(१) वास्तुकलाशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (नाटा) ही चाळणी परीक्षा देणे आवश्यक आहे.किंवा जॉईंट एन्ट्रस एक्झामिनेशन (जेईई मेन)देणे गरजेचे आहे. या दोन पैकी एका परीक्षेतील गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील. (२) १२वीमध्ये विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र आणि गणित या दोन आवश्यक विषयांसह रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा तांत्रिक व्यवसाय (व्‍होकेशल)अभ्यासक्रम किंवा बिझिनेस स्टडीज किंवा कॉम्प्युटर सायंस किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इंजिनीअरिंग ग्रॅफिक्स किंवा इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस या पैकी कोणताही एक विषय घेतलेला असावा. १२ वीमध्ये त्याला सरासरीने ४५ टक्के गुण मिळायला हवेत किंवा गणित  या आवश्यक‍ विषयासह १० वी नंतरच्या  ३ वर्षे कालावधीच्या पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. या उमेदवारास सरासरीने किमा ४५ टक्के गुण मिळायला हवेत.

या सुधारणांच्या अनुषंगाने यंदा वास्तुकला शास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या  प्रवेशासाठी आणखी एक संधी देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार १७ सप्टेंबर २०२३ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर नाटा टेस्ट घेतली जाईल. या परीक्षेव्दारे देशभरातील वास्तुकलाशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या रिक्त राहिलेल्या जागा भरल्या जातील.

संपर्क-www.nata.in

सुरेश वांदिले

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी