महाज्योती"चे कौशल्यनिर्मितीस साहाय्य

महाज्योती"चे कौशल्यनिर्मितीस साहाय्य

महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या संस्थेच्या मार्फत नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या संवर्गातील तरुण-तरुणींच्या रोजगार-स्वयंरोजगार आणि शिक्षण-प्रशिक्षणासाठी विविध योजना राबवत असते. या संस्थेने एमएसएमई (मायक्रो, स्माल, मीडियम एंटरप्रायइज- सूक्ष्म-लघू आणि मध्य उद्योजकता), इंडो जर्मन टूल (आयजीटीआर) औरंगाबाद, या संस्थेशी सहकार्याचा करार केला असून, त्यानुसार उपरोक्त नमूद संवर्गातील तरुण-तरुणींना विविध कौशल्य निर्मितीचे प्रशिक्षण संपूर्णपणे नि:शुल्क दिले जाते. हे प्रशिक्षण १० वी, १२ वी, अभियांत्रिकी पदवी/ पदविका धारकांना करता येतात. हे सर्व अभ्यासक्रम रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरणारे आहेत.

असे आहेत अभ्यासक्रम

एकूण १३ अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो. ते पुढील प्रमाणे आहेत. () सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी(कॉम्प्युटराइज्ड न्युमरिकल कंट्रोल) टर्निंग ॲण्ड मिलिंग, () सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी टर्निंग, () सर्टिफिकेट कोर्स इन मिलिंग, () कंडेन्स्ड कोर्स इन टूल ॲण्ड डाय मेकिंग. (अभ्यासक्रमांक १ ते ४ यासाठी शैक्षणिक अर्हता १० वी उत्तीर्ण आहे.)

() ॲडव्हासन्ड सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी मशिनिंग, () ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन मशिन मेंटनन्स, (अभ्यास क्रमांक ५ आणि ६ यासाठी शैक्षणिक अर्हता - आयटीआय (टर्नर/फिटर/मेकॅनिस्ट/ग्रायंडर/टूल अँड डायमेकर)

() पोस्ट डिप्लोमा इन टूल डिझाइन ॲण्ड कॉम्प्युटर एडेड डिझाइन/ कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅच्युरिंग, () पोस्ट डिप्लोमा इन टूल ॲण्ड डाय मॅन्युफॅक्चुरिंग, () मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर एडेड डिझाइन/ कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅच्युरिंग (अभ्यास क्रमांक ७, ८ आणि ९ यासाठी शैक्षणिक अर्हता- अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका-मेकॅनिकल/प्रॉडक्शन/ऑटोमोबाइल)

(१०) पोस्ट डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स, (११) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन ऑटोमेशन ॲण्ड प्रोसेस कंट्रोल, (१२) ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन मशिन मेंटनन्स ॲण्ड ऑटोमेशन, (अभ्यास क्रमांक १०, ११ आणि १२ यासाठी शैक्षणिक अर्हता- अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका-मेकॅनिकल/प्रॉडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल)

(१३) ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन स्ट्रक्चरल डिझाइन ॲण्ड ॲनॅलिसीस (शैक्षणिक अर्हता- अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका-सिव्हिल)

अर्ज प्रकिया

हे अभ्यासक्रम/ प्रशिक्षण हे निवासी स्वरुपाचे आहे. भोजन/निवास आणि प्रशिक्षणाचा खर्च "महाज्योती"मार्फत केला जातो. उपरोक्त नमूद अर्हताप्राप्त १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणी या प्रशिक्षणासाठी अर्ज करु शकतात. या प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी करुन गुणवत्ता यादी तयार केली जाते. निवडक उमेदवारांना पात्रता प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीसाठी बोलवण्यात येते. उमेदवारांना यंदाच्या आर्थिक वर्षाचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांना ऑनलाईनच अर्ज करावा लागतो. संपर्क- पी ३१, एमआयडीसी, चिखलठाणा, इंडस्ट्रियल एरिआ, औरंगाबाद-४३१००६, दूरध्वनी-०२४०-२६१०१००, संकेतस्थळ-www.igtr-aur.org, ईमेल- info@igtr-aur.org

००००


 

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी