12 वीनंतर टॉप टेन -भाग एक
12 वीनंतर टॉप टेन -भाग एक
12 वी नंतर किंवा उत्तम
करिअर करण्याची संधी केवळ विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांना मिळते, असा एक सोईचा
समज आपल्याकडे बहुतांश पालकांनी करुन ठेवला आहे. तो त्यांनी दूर करणे गरजेचे ठरते.
विज्ञान शाखे सोबतच कला आणि वाणिज्य शाखेतून 12 वी झालेले
घेतलेले विद्यार्थीसुध्दा उत्तम करिअर घडवू शकतात.
असे बारा अभ्यासक्रम पुढील
प्रमाणे आहेत.
आयआयटीतली संधी
१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रासमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमासोबतच मानव्यशास्त्राचाही अभ्यास करता येतो.
या संस्थेने २००६ साली १२ वी नंतरचा पाच वर्षे कालावधीचा एम.ए इन (इंटिग्रेटेड अभ्यासक्रम) इंग्लिश
स्टडीज आणि डेव्हलपमेंट स्टडीज या दोन विषयांमध्ये केला. आयआयटी सारख्या दर्जेदार
संस्थेतून हा अभ्यासक्रम केल्याने करिअरच्या
उत्तमोत्तम संधी मिळू शकतात.
एम.ए इन इंग्लिश स्टडीज
भाषा आणि साहित्याच्या
विश्लेषणाबात संवेदनशील असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमाची संरचना
करण्यात आली आहे.जागतिक पातळीवरील इंग्रजी साहित्याच्या अभ्यासासोबत,सध्या सुरु
असलेल्या साहित्यिक सिध्दांतावरील वादविवाद,अल्प
परिचयातले साहित्य आणि आंतरज्ञानशाखीय
दृष्टिकोन ठेवण्यात येतो.या अभ्यासक्रमासंदर्भातील विस्तृत माहिती https://hss.iitm.ac.in/english-studies/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात
आली आहे.
एम.ए
इन डेव्हलपमेंटल स्टडीज
हा अभ्यासक्रम
आंतरज्ञानशाखीय स्वरुपाचा असून यामध्ये
इंग्रजी, परकीय भाषा, आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थशास्त्र, सांस्कृतिक अभ्यास, नाट्यशास्त्र, सांख्यिकी आणि तर्कशास्त्र या विषयांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमासंदर्भातील विस्तृत
माहिती https://hss.iitm.ac.in/development-studies या संकेतस्थळावर
उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा
परीक्षेच्या तयारीसाठीसुध्दा हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो.
हा अभ्यासक्रम केल्यावर सल्लागार कंपन्या, संशोधन करणाऱ्या संस्था,
जागतिक संस्था, स्वयंसेवी संस्था ,बँका, अध्यापन, धोरणनिर्मितीत सहभागी असणाऱ्या
संस्था किंवा केंद्रे आणि पत्रकारिता या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी मिळू
शकतात. प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.
प्रवेश प्रक्रिया
एचएसईई(ह्युमॅनिटीज ॲण्ड सोशल सायंसेस एंट्रन्स
एक्झामिनेशन) या परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असून
पेपरमध्ये दोन भाग असतात.पहिल्या भागात बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीचे १५० प्रश्न
विचारले जातात.यासाठी अडीच तास दिला जातो.भाग दोन हा निबंध लेखनाचा किंवा
वर्णनात्मक स्वरुपाचा असून त्यासाठी ३० मिनिटे दिली जातात.पहिल्या भागात इंग्रजी
आणि आकलन कौशल्य,विश्लेषणात्मक आणि संख्यात्मक कौशल्य,सामान्य अध्ययन(वातावरण
आणि पर्यावरण शास्त्र,भारतीय अर्थशास्त्र,भारतीय समाज आणि संस्कृती,जागतिक घडामोडी)
संपर्क- डिपार्टमेंट ऑफ ह्युमॅनिटी ॲण्ड
सोशल सायंसेस, रुम नंबर- एचएसबी-३३३, आयआयटी-मद्रास, चेन्नई- ६०००३६, दूरध्वनी-
०४४-२२५७४५००, फॅक्स-२२५७४५०२, ईमेल- hsse@iitm.ac.in,संकेतस्थळ- https://hss.iitm.ac.in/
(२) फूटवेअर डिझाइन ॲण्ड
डेव्हलपमेंट इंस्टिट्यूट- पादत्राणे
निर्मिती तंत्रज्ञान, चामडी वस्त्रप्रावरणे
व आभूषण आणि वस्तुनिर्मिती या क्षेत्राची वाढ देशात व परदशेताही मोठ्या प्रमाणावर
होत असल्याने या क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज वाढली आहे. कौशल्यविकास
अभियानांतर्गत केलेल्या सर्वेक्षणानुसार या क्षेत्रात पुढील काही वर्षात रोजगार आणि
स्वंयरोजगाराच्या विपुल संधी मिळू शकतात.
या बाबी लक्षात घेऊन भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या
अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेची स्थापना १९८६ साली करण्यात आली.
भारतीय पादत्राणे उद्योगास आतंरराष्ट्रीय स्पर्धा करता येणे शक्य
व्हावे, हा हेतू ठेऊन अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे.या
संस्थेच्या अभ्यासक्रमांची गुणवत्ता लक्षात घेऊन संस्थेला २०१७ साली इंस्टिट्यूशन
ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा देण्यात आला.
देशातील सर्व भागातील विद्यार्थ्यांना संस्थेतील अभ्यासक्रमांना
प्रवेश घेणे सुलभ व्हावे यासाठी १२ शहरांमध्ये कॅम्पस सुरु करण्यात आले आहेत.
अभ्यासक्रम ३) बीबीए इन रिटेल आणि फॅशन
मर्कंडायजिंग(करिअर संधी- रिटेल स्टोअर व्हिज्युअल
मर्कंडायजिंग किंवा डिस्प्ले डिपार्टमेंट, व्हिज्युअल
मर्कंडायजिंग कंसलटंसी, सप्लाय कंपनी, रिटेल
मर्कंडायजिंग, बायर्स, कॅटेगरी
मॅनेजर्स, एरिआ मॅनेजर, रिटेल मॅनेजर,
फ्लोअर मॅनेजर, डिपार्टमेंट मॅनेजर, लक्झरी ब्रँड्स स्टोअर मॅनेजर, बिझिनेस मॅनेजर,
मर्चंट )
(१) बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन डिझायनिंग.(करिअर संधी- कंसलटंट, पर्सनल
स्टायलिस्ट, टेक्निकल डिझायनर, ग्रॅफिक
डिझायनर, फॅशन जर्न्यालिस्ट, फ्री
लान्स डिझायनर, फॅशन मर्कंडायझर, व्हिज्युअल
मर्कंडायजर, क्वालिटी कंट्रोलर, फॅशन
कूऑर्डिनेटर ),२) बॅचलर ऑफ डिझाइन इन
फूटवेअर डिझाइन आणि प्रॉडक्शन.(करिअर संधी- मार्केटिंग,
डिझाइन, मॅन्युफॅक्चुरिंग, रिटेलिंग, मर्कंडायजिंग, फॅशन फोरकास्टर, डेव्हलपर, कॉम्प्युटर एडेड स्पेशॅलिस्ट, डिझाइन कंसलटंट, स्ट्रॅटेजी प्लॅनर, व्हिज्युअल मर्कंडायझर),.४) बॅचलर ऑफ डिझाइन इन
लेदर गुड्स ॲण्ड ॲक्सेसरीज(करिअर संधी- डिझायनर, मर्कंडायजर आणि प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह )
अर्हता- कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण.
कालावधी ४ वर्षे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑल
इंडिया सिलेक्शन टेस्ट, घेतली जाते. ही
परीक्षा देशभरातील अनेक शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये मुंबईचा समावेश आहे.
संपर्क - फूटवेअर डिझाइन
ॲण्ड डेव्हलपमेंट इंस्टिट्यूट ,ए १०/ए, सेक्टर २४ नॉयडा-२०१३०१, गौतमबुध्द नगर, उत्तरप्रदेश,
दूरध्वनी- ०१२०-४५००१००/४५००२०३, फॅक्स- २४१२५५६, ईमेल- contact@fddiindia.com आणि admission@fddindia.com, संकेतस्थळ- www.fddiindia.com.
(३) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ
मॅनेजमेंट (रोहतक) या संस्थेने पाच वर्षे कालावधीचा
इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन लॉ (आयपीएल-लॉ). हा अभ्यासक्रम
सुरु केला आहे. कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना हा अभ्यासक्रम करता येतो. हा आंतरज्ञानशाखीय अभ्यासक्रम असून
यामध्ये व्यवसाय व्यवस्थापन (बिझिनेस मॅनेजमेंट) विधि आणि सुशासन यांचे सखोल ज्ञान
प्रज्ञान केले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, बीबीए -एलएलबी ही पदवी प्रदान केली जाते. या अभ्यासक्रमात १५ विषय घटकांचा समावेश
करण्यात आला आहे. प्रत्येक घटक ३ महिने शिकवला जातो. शिवाय विद्यार्थ्यांना वेगवेगळया
प्रकारच्या इंटर्नशीपची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.
अर्हता- खुला
संवर्ग, आर्थिकदृष्ट्या कमकुवत गट, आाणि एनसीएल ओबीसी ६० टक्के
आणि अनुसूचित जाती आाणि जमाती संवर्गासाठी ५५ टक्के गुण. उमेदवारांची निवड कॉमन लॉ
ॲडमिशन टेस्ट या परीक्षेतील गुणांच्या
आधारावर निवडक उमेदवारांची जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात संस्थेमार्फत ऑनलाईन मुलाखत
घेतली जाईल. गुणवत्ता यादी तयार करताना
१० वी आणि १२ वीतील गुणांना ४० टक्के, क्लॅटमधील गुणांना ४५ टक्के वेटेज मुलाखतीला १५
टक्के दिले जाते.
संपर्क- आयआयएम, मॅनेजमेंट
सिटी, सदर्न बायपास, एनएच १०, रोहतक- १२४०१०, दूरध्वनी- ०१२६२-२२८५०५, ईमेल-ipladmission@iimrohtak.ac.in, संकेतस्थळ- iimrohtak.ac.in
(४) इंडियन
इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (रोहतक) - या संस्थेने २०१९ च्या शैक्षणिक वर्षापासून पाच वर्षे
कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु केला आहे.हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर संस्थेमार्फत एमबीए ही पदवी प्रदान केली
जाते. एखाद्या विद्यार्थ्यास तीन वर्षानंतर हा अभ्यासक्रम सोडवासा वाटल्यास, बीबीए
- (बॅचलर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन) ही
पदवी प्रदान केली जाते.
हा अभ्यासक्रम दोन भागात विभाजित करण्यात आला
आहे. पहिल्या भागात पायाभूत विषयांमध्ये लक्ष केंद्रित केले जाते. दुसऱ्या भागात
व्यवस्थापन विषयावर लक्ष केंद्रित केले जाते. प्रत्येक वर्षाच्या शेवटी
विद्यार्थ्यांना इंटर्नशीप करावी लागते. १६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
हा अभ्यासक्रम गणित, अर्थशास्त्र, सांख्यिकी,
गणित, मानव्यशास्त्र या चार घटकांमध्ये विभाजित करण्यात आला आहे. कम्युनिकेशन
मॅनेजमेंट- व्यवसाय संवाद संप्रेषण, इन्फर्मेशन सिस्टिम - माहिती कार्यप्रणाली आणि
परदेशी भाषा यांचा अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. चौथ्या आणि
पाचव्या वर्षात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी जे विषय शिकवले जातात तेच विषय या
अभ्यासक्रमात शिकवले जातात.
या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी, आयपीएम ॲप्टिट्यूड टेस्ट,
द्यावी लागते. या परीक्षेत, विद्यार्थ्यांची तार्किक
विचार करण्याची क्षमता आणि कौशल्य, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व
आणि विद्यार्थ्यांचा कल तपासणाऱ्या प्रश्नांचा समावेश असतो. या चाळणी परीक्षेत विशिष्ट गुणांसह उत्तीर्ण निवडक
विद्यार्थ्यांना, लेखन कौशल्य चाळणी (रिटन ॲबिलिटी टेस्ट) आणि मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी,
सामान्य ज्ञान आणि संवाद कौशल्य याची चाचपणी केली जाते.
मुंबई, कोलकता, दिल्ली, चेन्नई आणि बेंगळुरु येथे लेखन कौशल्य चाचणी
आणि मुलाखती घेतल्या जातात. अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना कल चाचणी परीक्षेतील
गुणांना ५० टक्के वेटेज, मुलाखतीतील गुणांना ३० टक्के वेटेज, लेखन कौशल्य
चाचणीच्या गुणांना १० टक्के वेटेज आणि शैक्षणिक कामगिरीला १० टक्के वेटेज दिले
जाते. ऑनलाइन ॲप्टिटयूड टेस्ट देशभरातील विविध शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये
महाराष्ट्रातील पुणे,नागपूर मुंबई यांचा समावेश आहे.
संपर्क- ईमेल- ipmoffice@iimrohtak.ac.in
(५) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (इंदौर) या संस्थेत, इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या पाच वर्षांपैकी पहिल्या तीन वर्षात उमेदवारांचा विविध विषयातील पाया मजबूत केला जातो. पुढील दोन वर्षात त्यांना या संस्थेच्या दोन वर्ष कालावधीच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट/एमबीए, या अभ्यासक्रमासाठी असलेला अभ्यासक्रम शिकवला जातो. हा अभ्यासक्रम पूर्ण
केलेल्या विद्यार्थ्यांना पाचव्या वर्षी,बॅचलर ऑफ आर्टस (फाउंडेशन ऑफ मॅनेजमेंट) ॲण्ड
एमबीए,ही पदवी प्रदान केली जाते.
हा अभ्यासक्रम कला, वाणिज्य आणि विज्ञान या कोणत्याही शाखेतील १२ वीच्या विद्यार्थ्यांना करता येतो.
२०१६-१७ च्या शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमाला पाच
महत्वाच्या भागात विभाजित करण्यात आले. यामध्ये अर्थशास्त्र, गणित, सांख्यिकी,
समाजशास्त्र आणि मानव्यशास्त्र या घटकांचा समावेश आहे. बिझिनेस गव्हर्नमेंट आणि
सोसायटी, बिझिनेस हिस्ट्री, कम्युनिकेशन, इन्फर्मेशन सिस्टिम या विषयांचा नव्याने
समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा चौफेर व्यक्तिमत्व विकास व्हावा म्हणून,
भाषा- कला- संगीत- नाट्य- क्रीडा-योग यांचे शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्याची सोयही
उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ९ व्या
सत्रामध्ये विद्यार्थ्यांना परदेशातील व्यवस्थापन शिक्षणाचा अनुभव मिळण्यासाठी
एक्स्चेंज प्रोग्रॅम अंतर्गत पाठवण्यात येते.
प्रवेश- अर्जाची छाननी केल्यावर पात्र उमेदवारांना ॲप्टिट्यूड टेस्ट (कल चाचणी) साठी बोलावले जाते. वस्तुनिष्ठ पध्दतीच्या या प्रश्नपत्रिकेत दोन विभाग असतात. एका विभागात संख्यात्मक क्षमता (क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी- अलजेब्रा, मॉर्डन मॅथेमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग, जॉमेट्री,
डाटा ॲनॅलिसीस, अॅरिथमॅटिक यावरील प्रश्नांचा समावेश)
आणि दुसऱ्या विभागात भाषा किंवा भाषिक क्षमता (व्हर्बल ॲबिलिटी- व्हर्बल
रिझनिंग, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, एरर्स
इन युसेज) यावर प्रश्न विचारले जातात. अंतिम निवड ही ॲप्टिट्यूड टेस्ट आणि मुलाखतीमध्ये
मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाते. संख्यात्मक क्षमता आणि भाषा क्षमता या दोन्ही भागांसाठी विशिष्ट असा कटऑफ ठरवण्यात येतो. तो कटऑफ स्वतंत्ररीत्या प्राप्त करणे आवश्यक ठरते. अशा प्रकारे दोन्ही विभागासाठी निर्धारित कटऑफ प्राप्त उमेदवारांनाच पुढील टप्प्याच्या चाचणीसाठी निवडले जाते. यामधे विद्यार्थ्यांची लेखनक्षता चाचणी आणि व्यक्तिगत मुलाखतीचा समावेश असतो. हे कटऑफ गुण खुला संवर्ग व राखीव संवर्ग (अनुसूचित जाती,
अनुसूचित जमाती, नॉन क्रिमिलेअर इतर मागास वर्ग, शारीरिकदृष्ट्या अपंग) यांची एकूण संख्या लक्षात घेऊन निर्धारित केला जातो. लेखन क्षमता चाचणी आणि मुलाखती देशातील १० शहरांमध्ये घेतल्या जातात. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई केंद्राचा समावेश आहे. अंतिम निवड करताना ॲप्टिट्यूड टेस्टमधील गुणांना ५० टक्के वेटेज, मुलाखतीला ३५ टक्के वेटेज आणि लेखन कौशल्याला १५ टक्के वेटेज दिले जाते. अंतिम यादित ज्या उमेदवारांची निवड होत नाही, त्यांना कळवले जात नाही.
या अभ्यासक्रमाला १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशस्तरीय चाळणी परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे - मुंबई, पुणे आणि
नागपूर.
संपर्क - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर, प्रबंध शिखर,राऊ -पितमपूर रोड,
इंदोर- ४५३५५६, दूरध्वनी-०७३१-२४३९६६६,२४३९६८९,फॅक्स-२४३९८००,ईमेल-ipmadmissions@iimid.ac.in,संकेतस्थळ
-www.iimidr.ac.in.
.jpg)
Comments
Post a Comment