१० वी नंतरचे तंत्र कौशल्य


 

१० वी नंतरचे तंत्र कौशल्य

खरं तर १२ वी नंतरच  मुलांच्या करिअरचा मार्ग स्पष्ट होतो. दिशा बऱ्यापैकी निश्चित होऊ शकतात. मात्र बऱ्याच पालकांना १० वीनंतरच मुलांच्या करिअरची दिशा स्पष्ट व्हावी असे वाटत असते. त्यात काहीही वावगे नाही. तथापि ही त्यांची स्वत:ची इच्छा असते की मुलालाही तसे वाटते हे समजून घेणे आवश्यक ठरते.

१० वीनंतर मुलांचा सर्वसाधारण कल, आवड याची बऱ्यापैकी कल्पना आल्यास व त्याबाबत पालक आणि मुलांच्या मनात कोणताही गोंधळ नसल्यास मुलांनी १० वीनंतरही आपला मार्ग निवडायला हरकत नाही. विशेषत: तांत्रिक विषयात रस आणि गती असल्याचे लक्षात आल्यास अशा मुलांनी कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम करायला हरकत नाही.

भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेझरिंग इंस्ट्रुमेंट्स या संस्थेने असे कौशल्य निर्मितीचे बरेच अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण सुरु केले आहेत. हे अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या करिअर संधी मिळाल्या आहेत. हे अभ्यासक्रम प्रात्यक्षिकावर भर देणारे आणि सैध्दांतिक पाया मजबूत करणारे आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाल्यावर वेळकाढूपणा करुन चालणार नाही. विषयघटकांचे परिपूर्ण ज्ञान मिळवणे, सगळया संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आणि मिळवलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष प्रभावीरीत्या उपयोग करणे, हे जमायलाच हवे. अन्यथा प्रगतीची व्दारे प्रारंभापासून उघडायला कठीण जाऊ शकतात.

या संस्थेने १० नंतरचे पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाची मान्यता मिळाली आहे. संस्थेमार्फत सर्व विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळवून देण्यासाठी साहाय्य केले जाते.

() डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स ॲण्ड रोबोटिक्स- हा अभ्यासक्रम मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या समकक्ष समजला जातो.

काय शिकाल?

 या अभ्यासक्रमात व्यावसायिक इंग्रजी आणि संवाद कौशल्य, ॲप्लाइड फिजिक्स, इलेक्ट्रिक ॲण्ड इलेक्ट्रॉनिक मेझमेंट्स सिस्टिम, औद्योगिक संस्था आणि व्यवस्थापन, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर एडेड डिझाइन आणि कॉम्प्युटर एडेड मशिन ,स्ट्रेंग्थ ऑफ मटेरिअल, थिअरी ऑफ मेकॅनिक्स, ॲप्लाइड मेकॅनिक्स, रोबोटिक्स टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी चित्रकला, मेकॅट्रॉनिक्स, अभियांत्रिकी गणित, आधुनिक अभियांत्रिकी साहित्य, हे विषय शिकवले जातात. हा अभ्यासक्रम केल्यावर नाविण्यपूर्ण स्वयंचलित यांत्रिकी वस्तूंच्या निर्मिती व्यवसायात करिअरची संधी मिळू शकते. इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा एकात्मिक वापर करुन स्मार्ट आणि स्वयंचलित वस्तू निर्मिती करणारे उद्योग यामध्ये संधी मिळू शकते. अशी संधी सध्या अन्नप्रक्रिया उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मिती, औषधी निर्मिती उद्योग, रासायनिक आणि हवाई वाहतूक उद्योगांमध्ये उपलब्ध झाली आहे. रोबो व स्वयंचलित वस्तू व साहित्य निर्मितीचे नियोजन, विक्री, विपणन या क्षेत्रात करिअरच्या संधी मिळू शकतात.

सध्या रोबोटिक्स किंवा स्वयंचलित तंत्रज्ञानाचा उपयोग सर्व उद्योगांमध्ये वाढत असल्याने या क्षेत्रात तंत्रकौशल्य प्राप्त केलेल्या तज्ज्ञांचीही गरज वाढली आहे.

 () डिप्लोमा इन थ्रीडी ॲनिमेशन ॲण्ड ग्रॅफिक्स- हा अभ्यासक्रम माहिती तंत्रज्ञान (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) पदविका अभियांत्रिकीशी समकक्ष समजला जातो. हा अभ्यासक्रम केल्यावर ॲनिमेशन आणि चित्रपट निर्मिती स्टुडिओ, टेलिव्हिजन चॅनेल आणि निर्मिती संस्था, जाहिराती आणि मुद्रित माध्यमे, ई-लर्निंग ॲण्ड इंटरॲक्टिव्ह कंपन्या, मेडिकल ॲनिमेशन स्टुडिओ, ॲनिमेशन कॉलेज ॲण्ड इंस्टिट्यूट, इंजिनीअरिंग ॲण्ड व्हर्च्युअल रिॲलिटी इन डिफेन्स, ग्रॅफिक्स ॲण्ड वेब स्टुडिओज, इंटरनेट ॲडव्हर्टायजिंग, फॅशन आणि इंटेरिअर डिझायनिंग, डेव्हलपमेंट ऑफ कॉम्पुटर ॲण्ड मोबाइल गेम, आर्किटेक्चर ॲण्ड लॅण्ड स्केपिंग, आयटी इंडस्ट्री या क्षेत्रात करिअरच्या संधी मिळू शकतात.

या अभ्यासक्रमात टू डी डिजिटल ॲनिमिेशन, कथा संकल्पना, ग्रॅफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्टस्, ॲनिमेशनच्या संकल्पना आणि उपयोजिता, ॲनिमेशनसाठी लागणाऱ्या साहित्याचा प्रत्यक्ष उपयोग आणि थ्री डी ॲनिमेशनच्या संकल्पना, ॲनिमेशनचे अभिकल्प (डिझायनिंग) आणि व्हिज्युलायझेशन (कल्पना करणे), चित्रकला आणि पेंटिंग, शरीर/अवयव आरेखनाचा अभ्यास, प्रकाश आणि छाया यांचा अभ्यास, या बाबींचा समावेश करण्यात येतो.

या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखतीसोबतच क्रिएटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्टसुध्दा घेतली जाते.एकूण २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम केल्यावर टू डी किंवा थ्री डी ॲनिमेशनसाठी आवश्यक असणाऱ्या चित्र संकल्पनांची निर्मिती, त्यासाठी आवश्यक असणारे तांत्रिक कौशल्य प्राप्त होतं. वेब डिझाइनसाठी आवश्यक बाबी तंत्र आणि संपादनाचं कौशल्य अवगत होतं. व्हिज्युअल इफेक्ट्स आणि व्यक्तिरेखा आधारित ॲनिमेशनपटाची निर्मिती करता येऊ शकतं. टीव्ही व मोबालमध्ये असणाऱ्या खेळांची निर्मिती, शैक्षणिक साहित्याची निर्मिती, जाहिरातींची निर्मिती,धावत्या प्रतिमांची निर्मिती, आभासी वास्तव आणि अभियांत्रिकीचे कौशल्य प्राप्त होतं. थ्री डी ॲनिमिशेन तंत्रकौशल्याचा वापर फॅशन डिझायनिंगमध्ये करता येऊ शकतो.

या अभ्यासक्रमाच्या कालावधीत ॲबॉड वर्कशॉप, ॲबॉड फोटोशॉप, ॲबॉड इलुस्ट्रेटर, ॲबॉड इन-डिझायनिंग, ॲबॉड साऊंडबूथ, ॲबॉड साऊंड फोर्ज, ड्रिमवेव्हर, ऑटोडेस्क माया, ऑटोडेस्क थ्रीडी मॅक्स, पिक्सॉलॉजिक झेड ब्रश, टूनबूम स्टुडिओ, टूनबूम स्टोरी बोर्ड, कोरल ड्रॉ, फायनल कट-प्रो, मंकी जॅम, ॲबॉड ऑफ्टर इफेक्ट्स या सॉफ्टवेअरवर काम करायला मिळतं. प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येत असल्यांनं या सॉफ्टवेअरमध्ये तज्ज्ञता मिळवणं शक्य होऊ शकतं.

000

 () डिप्लोमा इन टूल ॲण्ड डाय मेकिंग- हा अभ्यासक्रम डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या समकक्ष आहे.  ऑटोमोबाल, ॲरोनॉटिकल, मेडिकल आणि इलेक्ट्रिकल क्षेत्राशी निगडित विविध उपकरणे आणि साहित्याचे डिझान करणाऱ्या कंपन्या व उद्योगांमध्ये हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते.टूल (उपकरणे) आणि डाय (साचे) बनवणाऱ्या कंपन्या/उद्योग, प्रकल्प व्यवस्थापन, तांत्रिक विक्री आणि विपणन, गुणवत्ता नियंत्रण क्षेत्रात तपासणी व परीक्षण, यांत्रिकी सॉफ्टवेअरचे डिझायनिंग, विकास, प्रशिक्षण या क्षेत्रातही संधी मिळू शकते.

या अभ्यासक्रमात कच्च्या मालाचे ज्ञान आणि निर्मिती प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण ,मूल्य ,प्रभावी उत्पादनासाठी विविध तांत्रिक कौशल्ये, साहित्य /उपकरणे/वस्तूंचे वितरण, अभियांत्रिकी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर, गणित, संख्याशास्त्र,भूमिती यांचे ज्ञान व त्यांचे उपयोजन, कॉम्प्युटर एडेड डिझाइन, कॉम्प्युटर एडेड मशिनचा अभ्यास, डिझाइन तंत्राची माहिती, मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या आवश्यक बाबी या शिकवल्या जातात. शिवाय ॲप्लाइड (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, मेकॅनिक्स), इंडस्ट्रिअल मॅनेजमेंट आणि इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, वर्कशॉप प्रॅक्टिस आणि टेक्नॉलॉजी, ॲडव्हास्न्ड मशिन टूल टेक्नॉलॉजी,मटेरिअल टेक्नॉलॉजी, हिट ट्रिटमेंट, संवाद कौशल्ये, उद्योजकता विकास, अभियांत्रिकी चित्रकला, विद्दूत आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी,हे विषय सुध्दा शिकवले जातात.

सर्व अभ्यासक्रमांसाठी अर्हता- १० वी उत्तीर्ण कोणताही विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरतो.(वीमध्ये खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याला ५० टक्के गुण आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुण मिळायला हवेत.) या अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी मुंबई येथे लेखी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतील गुणांवर आधारित निवडक विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जातं. या मुलाखतीही मुंबईतच होतात. अंतिम निवड यादी ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांवर आधारित तयार केली जाते. प्रवेश प्रक्रिया जून महिन्यात सुरु होईल.

भारत सकारच्या राखीव जागांच्या नियमानुसार नॉन-क्रिमी लेअर इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संवर्गासाठी जागा राखीव असात. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातून सूट देण्यात येते.

संपर्क - इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन फॉर इलेक्ट्रिकल मेझरिंग इंस्ट्रुमेंट्स, स्वातंत्र्यवीर तात्या टोपे मार्ग, चुनाभट्टी, सायन, मुंबई-४०००२२, दूरध्वनी- ०२२-२४०५ ०३०१,संकेतस्थळ- http://www.idemi.org, ईमेल- training@idemi.org

000

नवं शिका

गांधीग्राम रुरल युनिर्व्हसिटी- या संस्थेने कौशल्य निर्मितीचे पुढील दोन अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

() डिप्लोमा इन टू व्हीलर मेकॅनिझम ॲण्ड मेंटनन्स. हा अभ्यासक्रम दोन सत्रांमध्ये शिकवला जातो. यास विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळाली आहे.

 () सर्टिफिकेट इन टू व्हीलर टेक्निशिअन- हा अभ्यासक्रम जीआरआय-यामाहा या दोन कंपन्यांच्या सहकार्याने सुरु केला आहे.

() बीव्होक - फार्म इक्विपमेंट्स ऑपेरेशन ॲण्ड मेंटनन्स. कालावधी- तीन वर्षे. अर्हता- १२ वी.

संपर्क - गांधीग्राम- ६२४ ३०२ दिंडीगुल - तामीळनाडू, दूरध्वनी-०४५१-२४५२३७१ संकेतस्थळ-ruraluni.ac.in, ,ईमेल-grucc@ruraluni.ac.in

 

 

                                           

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी