कौशल्यातून रोजगार संधी - भाग दोन
कौशल्यातून रोजगार संधी - भाग दोन
कौशल्यनिर्मितीसाठी उपयुक्त ठरणारे पुढील अभ्यासक्रम केल्यास विविध
करिअर संधी मिळू शकतात.
(१)
श्रिष्टी मनिपाल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन ॲण्ड टेक्नॉलॉजी (बेंगळुरु)
या संस्थेने कौशल्य निर्मितीसाठी उपयुक्त ठरु शकतील असे बॅचलर ऑफ
व्होकेशनल अभ्यासक्रम पुढील विषयांमध्ये सुरु केले आहेत. नॅशनल स्किल क्वालिफिकेशन
फ्रेमवर्कने ठरवलेल्या निकषांनुसार या अभ्यासक्रमांची संरचना करण्यात आली आहे. (१) क्रिएटिव्ह मॅन्युफॅक्चुरिंग- प्रॉडक्ट ॲण्ड ॲक्सेसरीज आणि टेक्सटाइल ॲपेरल्स ॲण्ड मेडअप्स या
क्षेत्रांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. करिअर संधी-हँडिक्रॅफ्टस आणि कार्पेट व ॲपरेल मेडअपस् आणि होम फर्निशिंग. (२) डिजिटल फिल्ममेकिंग -डायरेक्शन आणि एडिटिंग
किंवा सिनेमाटोग्रॅफी या क्षेत्रांमध्ये स्पशेलायझेशन करता येते. करिअर
संधी-माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्र. (३) डिजिटल मीडिया प्रॉडक्शन- यामध्ये ॲनिमेशन किंवा व्हिज्युअल इफेक्ट्स या क्षेत्रात स्पेशलायझेशन
करता येते. करिअर संधी-माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्र. (४) ग्रॅफिक आर्ट्स ॲण्ड डिझाइन
प्रॅक्टिसेस- इलुस्टेशन किंवा ग्रॅफिक डिझाइन या
क्षेत्रात स्पेशलायझेशन करता येते. करिअर संधी-माध्यमे आणि मनोरंजन
क्षेत्र. (५) इंटेरिअर
डिझाइन ॲण्ड बिल्ड-करिअर संधी-
बांधकाम, पर्यटन, आतिथ्यसेवा, रिटेल, माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्र.(६) युझर इंटरफेस ॲण्ड इंटरॲक्शन
इंजिनीअरिंग करिअर संधी- माहिती तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा आणि
माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्र. (७) क्रिएटिव्ह कोडिंग-करिअर संधी - माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा क्षेत्र. या
सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी - प्रत्येकी तीन वर्षे. अर्हता - कोणत्याही विषयातील
१२ वी उत्तीर्ण.
संपर्क-www.srishtimanipalinstitute.in/www.manipal.edu/ srishtimanipalinstitute ईमेल- admissions@
srishtimanipalinstitute.in,दूरध्वनी- ०८०-४९०००८००
०००
(२)
इंस्टिट्यूट फॉर डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेझरिंग इंस्ट्रुमेंट्स
भारत सरकारच्या सूक्ष्म - लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (एमएसएमई) अंतर्गत मुंबई येथे कार्यरत
असणाऱ्या इंस्टिट्यूट फॉर डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेझरिंग इंस्ट्रुमेंट्स या
संस्थेने पुढील कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
(१) रिपेरिंग ऑफ हँड हेल्ड
प्रॉडक्टस- टॅबलेट्स/ स्मार्ट फोन/ मोबाईल फोन / कालावधी - ३ महिने, (२) रिपेरिंग ऑफ रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग ॲण्ड होम
अप्लायंसेस /कालावधी-४ महिने. प्लेसमेंटसाठी साहाय्य केले जाते. प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यावर समॅसंग सेवा
केंद्रांमध्ये एक महिन्याचे ऑन द जॉब प्रशिक्षण दिले जाते.
अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी/ आयटीआय/ कोणत्याही
विषयातील पदवी किंवा पदविका
(३) दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण
कौशल्य योजनेंतर्गत पुढील कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. या
अभ्यासक्रमांना नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कची मान्यता मिळाली आहे.
(१)
ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन सीएनसी (कॉम्प्युटर
न्युमरिकल कंट्रोल) प्रोग्रॅमिंग टेक्निक/ कालावधी - सात
महिने/ अर्हता - १० वी. (२) सर्टिफिकेट
कोर्स इन मशिन ऑपरेशन/ कालावधी - बारा महिने/ अर्हता - ८ वी. (४) ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन टूल डिझाइन आणि
कॉम्प्युटर एडेड डिझाइन / कालावधी-बारा महिने/ अर्हता- आयटीआय. (५) ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन कॉम्प्युटर हार्डवेअर
ॲण्ड नेटवर्क मॅनेजमेंट /कालावधी - सहा महिने/ अर्हता-अभियांत्रिकी पदविका/ पदवी .
(६) ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन टूल ॲण्ड डाय मॅन्युफॅक्चुरिंग /कालावधी
- बारा महिने/ अर्हता- आयटीआय.
(७) सर्टिफिकेट कोर्स इन टर्निंग ॲण्ड मिलिंग / कालावधी - बारा महिने/ अर्हता
- १२ वी. (८) सर्टिफिकेट कोर्स इन
इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंटस टेक्निशिअन/ कालावधी-बारा महिने/ अर्हता-१२ वी.
(९) थ्री डी माया/ कालावधी - सहा महिने/ अर्हता-बारावी. (१०) ॲडव्हान्स्ड वेब डिझायनर ॲण्ड ॲनिमेटर/ कालावधी -सहा
महिने/ अर्हता-बारावी.
(४) पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रम-पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन (१) टूल डिझाइन ॲण्ड कॉम्प्युटर एडेड डिझाइन, अर्हता - बीई - मेकॅनिकल/ प्रॉडक्शन/
ऑटोमोबाईल, कालावधी-१८ महिने. (२) मेकॅनिकल
प्रॉडक्ट डिझाइन, अर्हता - बीई इन मेकॅनिकल/ प्रॉडक्शन/ ऑटोमोबाईल, कालावधी - १८
महिने, (३) मेकॅट्रॉनिक्स, अर्हता -बीई
इन मेकॅनिकल / प्रॉडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ इंस्ट्रुमेंटेशन, कालावधी-१८
महिने,(४) ॲडव्हॉन्स्ड ॲनिमेशन ॲण्ड
फिल्म मेकिंग, अर्हता - माहिती तंत्रज्ञान किंवा मल्टिमीडिया विषयातील पदवी, कालावधी
- १८ महिने. पोस्ट डिप्लोमा इन (१) ॲडव्हॉन्स्ड ॲनिमेशन ॲण्ड फिल्म मेकिंग, अर्हता - माहिती तंत्रज्ञान/ फाईन
आर्ट किंवा मल्टिमीडिया विषयातील पदविका, कालावधी - १२ महिने,(२) टूल डिझाइन ॲण्ड कॉम्प्युटर एडेड डिझाइन, अर्हता-डिप्लोमा
इन मेकॅनिकल/ प्रॉडक्शन/ ऑटोमोबाईल, कालावधी-१२ महिने.
(५)
उद्योजकता विकास कार्यक्रम- ऑटोकॅड-मेकॅनिकल, सॉलिडवर्क्स, युनिग्रॅफिक्स, मास्टरकॅम, सीएनसी
प्रोग्रॅमिंग -लेथ, सीएनसी प्रोग्रॅमिंग - मिलिंग अर्हता- आयटीआय/ मेकॅनिकल किंवा
प्रॉडक्शन किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी पदविका
(६) दीर्घ कालावधीचे अभ्यासक्रम- (१) डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स ॲण्ड रोबोटिक्स - हा
अभ्यासक्रम केल्यावर नाविण्यपूर्ण स्वयंचलित यांत्रिकी वस्तूंच्या निर्मिती
व्यवसायात करिअरची संधी मिळू शकते. इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा एकात्मिक वापर
करुन स्मार्ट आणि स्वयंचलित वस्तू निर्मिती करणारे उद्योग यामध्ये संधी मिळू शकते.
अशी संधी सध्या अन्नप्रक्रिया उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मिती,औषधी
निर्मिती उद्योग, रासायनिक आणि हवाई वाहतूक उद्योगांमध्ये उपलब्ध होत आहे. रोबो व
स्वयंचलित वस्तू व साहित्य निर्मितीचे नियोजन, विक्री, विपणन या क्षेत्रात
करिअरच्या संधी मिळू शकतात.
(२) डिप्लोमा इन थ्रीडी ॲनिमेशन ॲण्ड ग्रॅफिक्स- हा अभ्यासक्रम केल्यावर
ॲनिमेशन आणि चित्रपट निर्मिती स्टुडिओ, टेलिव्हिजन चॅनेल आणि निर्मिती संस्था,
जाहिराती आणि मुद्रित माध्यमे, ई-लर्निंग ॲण्ड इंटरॲक्टिव्ह कंपन्या, मेडिकल
ॲनिमेशन स्टुडिओ, ॲनिमेशन कॉलेज ॲण्ड इंस्टिट्यूट, इंजिनीअरिंग ॲण्ड व्हर्च्युअल
रिॲलिटी इन डिफेन्स, ग्रॅफिक्स ॲण्ड वेब स्टुडिओज, इंटरनेट ॲडव्हर्टायजिंग, फॅशन
आणि इंटेरिअर डिझायनिंग, डेव्हलपमेंट ऑफ कॉम्पुटर ॲण्ड मोबाइल गेम, आर्किटेक्चर
ॲण्ड लॅण्ड स्केपिंग, आयटी इंडस्ट्री या क्षेत्रात करिअरच्या संधी मिळू शकतात.
(३) डिप्लोमा इन टूल ॲण्ड डाय मेकिंग- हा अभ्यासक्रम
डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या समकक्ष आहे. ऑटोमोबाइल, ॲरोनॉटिकल, मेडिकल आणि इलेक्ट्रिकल
क्षेत्राशी निगडित विविध उपकरणे आणि साहित्याचे डिझाइन करणाऱ्या कंपन्या व
उद्योगांमध्ये हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. टूल (उपकरणे) आणि डाय (साचे) बनवणाऱ्या कंपन्या/उद्योग, प्रकल्प व्यवस्थापन, तांत्रिक विक्री आणि
विपणन, गुणवत्ता नियंत्रण क्षेत्रात तपासणी व परीक्षण, यांत्रिकी सॉफ्टवेअरचे
डिझायनिंग, विकास, प्रशिक्षण या क्षेत्रातही संधी मिळू शकते.
अर्हता
- (१) शैक्षणिक- १० वीमध्ये खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याला ५० टक्के गुण आणि
राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमांच्या
निवडीसाठी मुंबई येथे लेखी परीक्षा घेतली जाते. (१२ वी
विज्ञान किंवा आयटीआय किंवा १२वी व्होकेशनल परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना
डिप्लोमा इन टूल ॲण्ड डायमेकिंग आणि डिप्लोमा इन रोबोटिक्स ॲण्ड मेकॅटॉनिक्स या
अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश दिला जातो.) (२) वयोमर्यादा-१ ऑगस्ट २०२२ रोजी १५ ते १८ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती
संवर्गातील उमेदवारांना -३ वर्षे सूट.
संपर्क - इंस्टिट्यूट ऑफ
डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेझरिंग इंस्ट्रुमेंट्स, तात्या टापे मार्ग, चुनाभट्टी
सायन-मुंबई - ४०००२२ दूरध्वनी- ०२२ - २४०५०३०१ संकेतस्थळ- https://idemi.org/
०००
(३) टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मुंबई
-या संस्थेने, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन
मेडिकल इमेजिंग, हा कौशल्य निर्मितीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमात
एक्स रे, सीटी स्कॅन, एमआरआय, मॅमोग्रॅफी, कॅथलॅब मेकॅनिक्स या संयंत्रांच्या
प्रत्यक्ष हाताळणीचे शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते. अर्हता - कोणत्याही शाखेतील
विज्ञान पदवी किंवा बी.फार्मसी.अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा घेतली
जाते. ही परीक्षा १२वी तील भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र याविषयावर
आधारित राहील. अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये
विद्यावेतन दिले जाते. कालावधी- दोन वर्षे आणि एक वर्षं इंटर्नशीप.
संपर्क - टाटा मेमेारिअल हॉस्पिटल, डॉ. ई
बोर्जेस रोड, परळ, मुंबई - ४०००१२, दूरध्वनी - ०२२-२४१७७०००, ईमेल-registrar@tmc.gov.in, संकेतस्थळ tmc.gov.in
सुरेश वांदिले
०००

Comments
Post a Comment