त्यांची सेवा..
वेगळया वाटा,अनोखी संधी
त्यांची
सेवा..
दुग्धव्यवसाय आणि दुग्धजन्यपदार्थांच्या व्यवसायामध्ये सामाजिक व आर्थिक
बदल करण्याची क्षमता आहे. ही बाब महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात सिध्द झाली
आहे. ग्रामीण भागातील शेतीला दुग्धव्यवसायाने उत्तम प्रकारचे आर्थिक पाठबळ दिले
आहे. त्यामुळेच पशुधन विकासाला राज्यपातळीवर महत्वाचे स्थान देण्यात आले आहे.
त्यासाठी तालुकापातळीपर्यंत शासकीय यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे.
पशुवैद्यक डॉक्टर होण्यासाठी विद्यार्थ्यांना १२ वीमध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय
घ्यावे लागतात. पशुवैद्यक महाविद्यालयातील अभ्यासक्रम बॅचलर ऑफ व्हेटर्नरी सायन्स ॲण्ड ॲनिमल हज्बंड्री या नावाने ओळखला
जातो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शासनामार्फत कॉमन एन्ट्रन्स टेस्ट घेतली
जाते. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा आहे. त्यानंतर एक वर्षाची इन्टर्नशीप करावी
लागते. देशातील महत्वाच्या शासकीय संस्थामंधील १२ टक्के जागा या अखिल भारतीय कॉमन
एन्ट्रन्स टेस्टने भरल्या जातात. या परीक्षेतील मिळालेल्या गुणावंर आधारित आणि
नमूद पर्यायानुसार या महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो. ही परीक्षा इंडियन काउंसिल
ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्चमार्फत घेतली जाते. त्यानंतर दोन वर्षे कालावधीचा पदव्युत्तर
पदवी अभ्यासक्रम (मास्टर ऑफ व्हेटर्नरी सायन्स ॲण्ड ॲनिमल हज्बंड्री) करता येतो.
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये
मेडिसिन, सर्जरी, गॉयनकॉलॉजी, पथॉलॉजी आणि ॲनिमल प्रॉडक्शन अशा विषयांमध्ये स्पेशलायझेशन करतात
येते. ॲनिमल अनॉटॉमी, ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी, ॲनिमल हज्बंड्री, ॲनिमल इकॉनॉमिक्स, ॲनिमल रिप्रॉडक्शन, ॲनिमल जेनेटिक्स ॲण्ड ब्रीडिंग, डेअरी सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी, डेअरी केमिस्ट्री, डेअरी इंजिनिअरिंग, डेअरी
मायक्रोबायॉलॉजी, फूड हायजिन, फीड ॲण्ड फॉडर टेक्नॉलॉजी, मिट सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी, ॲनिमल न्यूट्रिशन, पोल्ट्री सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ॲण्ड
टॉक्सिकॉलॉजी या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.
करिअर
संधी
पशुवैद्यकांना शासकीय नोकरींसोबतच (१) डेअरी
रिसर्च इन्स्टिट्यूट , (२) खाजगी
पशुवैद्यक रुग्णालये, (३) स्टड फार्म्स, (४) रेस
क्लब, (५) पिगेरी
फार्म्स, (६) शिप
आणि रॅबिट फार्म्स, (७) डेअरी
फार्म्स, (७) पोल्ट्री
फार्म्स मध्ये करिअर करण्याची संधी मिळू शकते. (८)
उच्चभ्रू
आणि श्रीमंतांमध्ये कुत्रे आणि मांजर पाळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यांची
देखभाल करण्यात ही मंडळी कोणतीही कसूर ठेवत नाहीत. या प्राण्यांना स्वत:चे
कुंटुंबीय मानतात. या पाळीव प्राण्यांवर खर्च करायला ते मागेपुढे पाहत नाहीत.
त्यामुळे शहरी भागांमध्ये खाजगी पशुवैद्यकांना मोठी मागणी आहे. (९) प्राणी
संग्रहालये, राष्ट्रीय उद्याने, वन्यप्राणी अभयारण्ये यासाठी
पशुवैद्यकांची गरज भासते. (१०) संरक्षण
दलात घोडे, कुत्रे, उंट आणि इतर प्राण्यांचा उपयोग केला जातो. त्यामुळे या ठिकाणीही
पशुवैद्यकांची सेवा घेतली जाते. (११) प्राणीशास्त्र
संशोधन संस्थांमध्ये पशुवैद्यकांना संशोधन
आणि विकासकार्यासाठी संधी मिळू शकते. (१२) पदव्युतर
पदवी आणि पीएचडी केलेल्या विद्यार्थ्यांना पशुवैद्यकीय संस्थांमध्ये प्राध्यापक
म्हणून संधी मिळू शकतो.
(१३) इंडियन व्हेटर्नरी रिसर्च
इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक म्हणून संधी मिळू शकते. (१४) लस निर्मिती केंद्रात- संशोधक आणि
प्रक्रिया व्यवस्थापक (१५)
पशुंसाठी आरोग्यदायक आहार निर्मिती
केंद्रे या ठिकाणीही संधी मिळू शकते.

Comments
Post a Comment