समाजमाध्यमातील संधी आणि आव्हाने---


 

       समाजमाध्यमातील संधी आणि आव्हाने---

भारतात इंटरनेटची जोडणी सध्या अत्यंत सुलभतेने होण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाचा मोठा हातभार लागला आहे. इंटरनेटच्या या स्वस्त  आणि सहज उपलब्धतेमुळे समाजमाध्यमांच्या वापरात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते. ६६० मिलियन्स भारतीय इंटरेनटचा वापर करत असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले. चीन नंतर याक्षेत्रात भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

सर्वसामान्य लोकांसाठी फेसबूक, इंस्टाग्राम, व्टीटर, व्हॅाटस ॲप, स्पॅनचॅट ही मनोरंजनाची साधने असले तरी बऱ्याच जणांसाठी ते उत्तम करिअरचे माध्यम ठरले आहे.

ब्रँडची गरज

कोणत्याही औद्योगिक ब्रँडला समाजमाध्यमावर स्वत:ची उपस्थिती राखणे, हे व्यवसायवृध्दीसाठी अत्यावश्यक बाब समजली जाते. त्याला सध्या काही पर्याय राहिलेला नाही. यातून, सोशल मीडिया मार्केटिंग, ही करिअर घडवणारी नवी शाखा उदयास आली. सोशल मीडिया मार्केटिंग आणि मॅनेजमेंट या क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी निर्माण होताना दिसतात. व्यावसायिक, शासन, सेलिब्रेटिज, अशासकीय संस्था या सर्वांनाच त्यांचे समाजमाध्यमे हाताळण्यासाठी प्रशिक्षित आणि तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. अशांना आपल्याकडे आकर्षिक करुन ते कायमस्वरुपी टिकावे यासाठी चांगले वेतनसुध्दा दिले जाते.

समाजमाध्यमांव्दारे एखाद्या ब्रँडबाबत जाणीव जागृती केली जाते. संकेतस्थळाकडे अधिकाधिक दर्शक/वाचक यांची वाहतूक वळवली जाते. ब्रँडबाबत उत्सुकता वाढवून, त्या उत्पादनाची विक्री वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात. ग्राहक आकर्षित होतील अशा नव्या नव्या संकल्पनांची निर्मिती केली जाते. मुद्रित माध्यमांमध्ये अधिकाधिक उल्लेख यावा यासाठी प्रयत्न केले जातात. सामाजिक माध्यमातील ग्राहकांना समस्या निराकरण्यासाठी सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात. ब्रँडबाबात ग्राहकांचा प्रतिसाद (फीडबॅक) जाणून घेतला जातो. व्रिकीमध्ये वाढ व्हावी आणि महसूल वाढावा यासाठी प्रयत्न केले जातात.

समाजमाध्यमांशी संबंधित () कंटेट क्रिएटर्स, () इंफ्ल्युंसर्स, () कम्युनिटी मॅनेजर्स, () ॲनॅलिस्ट अशा संधीही निर्माण होत आहेत.

समाजमाध्यम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीस स्वत:जवळ असणाऱ्या विविध कौशल्यांचे सतत नुतनीकरण करणे गरजेचे असते. नवी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असते. डेटा ॲनॅलिस्ट - (माहिती विश्लेषण) आणि संहिता लेखन या सारखे कौशल्य हे प्रयत्नपूर्वक साध्य करता येऊ शकतात. तथापि संपर्कसाखळीत सातत्याने वाढ करणे, अधिक सुव्यस्थित कार्यान्वयन करणे या बाबी साध्य करणे काहिसे कठीण जाऊ  शकते. मात्र ही कौशल्येसुध्दा महत्वाची आहेत. या कौशल्यप्राप्तीसठी लक्ष केंद्रित केल्यास अधिकाधिक प्रभावीपणे कार्य करता येऊ शकते. शिवाय व्यवसायवृध्दी आणि महसूल वृध्दीही साध्य होऊ शकते.

समाजमाध्यमे ही सतत प्रवाही असतात. यात साचलेपणास स्थान नाही. त्यामुळे विपणन आणि व्यवस्थापन या दोन्ही घटकात सतत बदल करणे भाग पडते. त्यामुळे नव्या नव्या संकल्पना शिकता येतात. नवी आव्हानेसुध्दा स्वीकारता येतात. ब्रँडची प्रतिमा उंचावण्यासाठी व हा ब्रँड सतत ग्राहकांच्या नजरेसमोर ठेवण्यासाठी हटके क्लृपत्या, संकल्पनाचा सतत वापर करावा लागतो. त्यामुळे ज्या व्यक्तीस या बाबीसाध्य होतात त्याचे कंपनी/व्यवसाय/उद्योगातले महत्व वाढून ते आबाधित राहू शकते. त्यामुळे मार्केटिंग पथकांसाठी तुमचा सहभाग हा मौलव्यान ठरत असतो. समाजमाध्यमातील संदेश अधिकाधिक प्रभावीरीत्या पोचण्यासाठी व्हीडियो, छायाचित्रे, संगीत, नाट्यकृती, कथाकथन, संहिता लेखन, नवे तंत्रज्ञान या सर्वांचा वापर करावा लागतो. त्यामुळे संबंधित व्यक्तीस या सर्वबाबी हातळण्यासाठी किंवा स्वत: करण्यासाठी वेगळया प्रकारच्या कौशल्यसंचाची गरज भासते.

विविध समाजमाध्यमे

मार्केटिंगसाठी पुढील समाजमाध्यमांचा अधिकाधिक वापर केला जातो, टेलिग्रॅम, लाइन, क्यूझोन, टंबलर, व्हॉट्स ॲप, कोरा, यू ट्यूब, स्पॅनचॅट, लिंक्ड इन, प्रिंटरेस्ट, व्टीटर, इन्स्टाग्रॅम, फेसबूक.

समाजमाध्यमांसाठी पुढील बाबी महत्वाच्या ठरतात.

() संहिता निर्मिती - एखाद्या ब्रँडला लोकांच्या ह्रदय आणि मनापर्यंत पोहचवण्यासाठी संहिता महत्वाची ठरते. संहिता हा खराच राजा किंवा राणी असल्याचे सध्या सर्वमान्य झाले आहे. जर संहिता प्रभावी असेल तर ब्रँड आणि व्यवसायवृध्दी प्रभाविरीत्या होऊ शकते. लाइक्स, शेअर, रिव्टिटव्दारे संभाव्य ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी संहितेचे मोठे सहाय्य होते. वस्तू, उत्पादने यांच्याच्या प्रचारापेक्षा त्यामध्ये ग्राहकांचा रस वाढून त्याने त्या वस्तू स्वीकाराव्यात किंवा विकत घ्याव्यात हे या संहितेव्दारे अपेक्षित असते. यासाठी परीक्षण, शीर्षक लेखन स्पर्धा, इतर गमतिशीर आव्हाने या घटकांचा उपयोग करणे अपेक्षित असते. व्हीडिओ, थेट प्रक्षेपण, माहिती आलेख, शैक्षणिक किंवा मार्गदर्शनपर संहिता यांचा समावेश असतो. संभाव्य ग्राहकांच्या मनाच्या  तारा या संहितेने हलवणे अपेक्षित असते.

() इंफ्ल्युअंसर (प्रभावकर्ते) मार्केटिंग-  हे सध्या सर्वाधिक लोकप्रिय आणि महत्वाचे साधन ठरले आहे. इंफ्ल्युअंसर हे मोठे उद्योग अथवा जाहिरात संस्थेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात त्यांचा प्रभाव वाढला आहे. ब्रँडच्या प्रचारासाठी या इंफ्ल्युअंर्सना मोठी मागणी असते. समाजमाध्यम  हा महत्वाचा करिअर पर्याय ठरत आहे. हे इंफ्ल्युअंर्स लोकांची वर्तणूक आणि विचारप्रकिया बदलण्याची क्षमता ठेवतात. यामध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही अर्थ अभिप्रेत आहे. तुम्हाला इंफ्ल्युअंसर व्हायचे असेल तर तुमच्या क्षेत्रातील विस्तृत ज्ञान असणे आवश्यक ठरते. तरच ग्राहक तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही प्रचार करणाऱ्या ब्रँडकडे आकर्षित होऊ शकतील.

() व्युहनितीकार (धोरण आखणी) - ब्रँडचा प्रचार करताना, स्पष्ट अशी व्युहनीती अथवा धोरण आवश्यक असते, तरच आपल्या संभाव्य ग्राहकांपर्यंत सुलभतेने  आणि सहजतेने पोहचणे शक्य होऊ शकते. प्रत्येक समजामाध्यमांच्या गरजा लक्षात घेऊन व्युहनीती आखावी लागते. अन्यथा केवळ "पोस्टिंग" करुन तोंडघशी पडण्याचीच पाळी येऊ शकते.

() समुदाय व्यवस्थापन- ऑनलाइन व्यवसायामध्ये संभाव्य ग्राहकांचा शोध घेणे, त्यांच्यापर्यंत पोहचणे, त्यांना टिकवून ठेवणे महत्वाचे ठरते. ग्राहकांची संख्या वाढली की त्यांना टिकवून ठेवणे आणि त्यांना हाताळणे कठीण होऊ शकते. ग्राहकांच्या ऑनलाइन तक्रारींना तत्काळ प्रतिसाद देऊन त्या सोडवणे आवश्यक असते. प्रत्येक ग्राहकास कायमस्वरुपी मित्र बनवणे गरजेचे असते. इंफ्ल्युअंर्सना आपल्याकडे वळवणे, संभाव्य ग्राहकांना ब्रँडकडे आकर्षित करणे, ग्राहकांचा प्रतिसाद मिळवणे, इत्यादी बाबी अपेक्षित असतात.

पार पाडाव्या लागणाऱ्या भूमिका

समाजमाध्यमांमध्ये करिअर करु इच्छिणाऱ्या व्यक्तिस या सेवा स्वतंत्ररीता किंवा एकत्रीतच पार पाडव्या लागू शकतात.

 () सोशल मीडिया मार्केटिंग मॅनेजर, () सोशल मीडिया ॲनॅलिस्ट, () कम्युनिटी मॅनेजर, () कॉपी रायटर, () कंटेंट मॅनेजर, () इन्फ्ल्युअंसर, () ब्लॉगर, () मीडिया प्लॅनर, () पब्लिक रिलेशन मॅनेजर, (१०) सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट, (११) सोशल मीडिया कंसलटन्ट, (१२) डायरेक्टर ऑफ मार्केटिंग ॲण्ड सोशल मीडिया, (१३) चिफ मार्केटिंग ऑफिसर, (१४) डिझायनर-अभिकल्पकार, (१५) कस्टमर सर्व्हिस रिप्रेंझेटेटिव्ह - ग्राहक सेवा प्रतिनिधी,

आवश्यक असणारी कौशल्ये

() उत्कृष्ट संवाद कौशल्य, () संहिता लेखन कौशल्य, () संपादन आणि अभिकल्पन (व्हीडिओ आणि ग्रॅफिक्स), () संभाषण कौशल्य (कॅमेराच्या समोर उपस्थित असलेल्या नागरिकांसमवेत संवाद/संभाषण), () ग्राहक सेवा आणि समुदाय व्यवस्थापन कौशल्य, () माहिती विश्लेषण क्षमता, () वर्तणूक मानशसास्त्राची प्राथमिक माहिती, () अर्थसंकल्प तयार करण्याचे कौशल्य, () स्वीकारहार्यता आणि व्यवसाय गरजा ओळखण्याची क्षमता.

झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन-  

या संस्थेने पोस्ट ग्रॅज्यएट डिप्लोमा इन डव्हर्टायझिंग ण्ड मार्केटिंग कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.

या अभ्यासक्रमात पुढील विषयघटकांचा समावेश आहे- रिलेशनशीप मॅनेजमेंट, कॉपीरायटिंग, ॲड फिल्म मेकिंग, रिटेल  मॅनेजमेंट, व्हिज्युएल कम्युनिकेशन, बिझिनेस कम्युनिकेशन, मीडिया प्लॅनिंग, मीडिया लॉ ॲण्ड इंटलेक्चुएल प्रॉपर्टी राइट्स, ब्रँड मॅनेजमेंट, ॲडव्हर्टायजिंग प्लँनिंग, कॅम्पेन ॲण्ड स्ट्रॅटेजी, पब्लिक रिलेशन ॲण्ड क्लायंट सर्व्हिसिंग, इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन, मार्केटिंग रिसर्च, डिजिटल मार्केटिंग, बिझिनेस स्ट्रॅटेजी, क्रिएटिव्ह डेव्हलपमेंट प्रोसेस, बिझिनेस कम्युनिेकेशन, ब्रँडिंग, कालावधी- १० महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.

    संपर्क- झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन , महापालिका मार्ग, सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई-४००००१,दूरध्वनी - ०२२-२२६२१३६६, फॅक्स-२२६५८५४६ संकेतस्थळ-http://xaviercomm.org/ ईमेल-admin@xaviercomm.org

०००

 

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी