कायद्याच्या लढाईशी सुसज्जता


 

कायद्याच्या लढाईशी सुसज्जता

महाराष्ट्रात विधि शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या आणि संशोधनास वाव देणाऱ्या तीन महत्वाच्या संस्थांची स्थापना भारत सरकारने मुंबई, नागपूर आणि  औरंगाबाद येथे केली आहे. या संस्था नॅशनल लॉ स्कूल युनिव्हर्सिटी या नावाने ओळखल्या जातात. या संस्थांमध्ये प्रारंभी पदवी अभ्यासक्रमच शिकवला जात असे. मात्र आता या संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमांसोबतच विधि शाखेशी निगडीत विविध घटकांचे शिक्षण देणारे पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पीएचडी अभ्यासक्रम सुरु झाले आहेत. विधि शाखेतच उत्तम करिअर घडविण्याच्या अनुषंगाने हे अभ्यासकम उपयुक्त ठरु शकतात. पदवी आणि काही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी कॉमन लॉ युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (क्लॅट) द्यावी लागते.

() महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई- या संस्थेतील अभ्यासक्रमपुढील प्रमाणे आहेत- () बीए -एलएलबी- कालावधी-५ वर्षे. अर्हता- ४५ टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. राखीव संवर्गासाठी गुणांमध्ये ५ टक्के सूट. () एलएलएम- कालावधी एक वर्षं. प्रवेश "क्लॅट" परीक्षेव्दारे दिला जातो. कॉर्पोरेट ॲण्ड कर्मशिअल लॉ, काँस्टिट्युशन ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ आणि मेरिटाइम लॉ या तीन विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. () एलएलएम इन इन्व्हेस्टेमेंट ॲण्ड सेक्युरिटीज लॉज, हा अभ्यासक्रम नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सेक्युरिटीज मार्केट्स या संस्थेच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे. कालावधी- एक वर्षं. अर्हता - ५० टक्के गुणांसह एलएलबी. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गाच्या विद्यार्थ्यांना गुणांमधून ५ टक्के सुट. प्रवेशासाठी ऑनलाइन चाळणी परीक्षा घेतली जाते. () एमबीए इन इंटरनॅशनल बिझिनेस, टॅक्सेशन ॲण्ड लॉ- या अभ्यासक्रमाला कोणत्याही ज्ञानशाखेतील ५० टक्के गुणांसह पदवी प्राप्त  उमेदवार प्रवेश घेऊ शकतो. अनुसूचित जाती आणि जमाती या संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये ५ टक्के सूट दिली जाते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते. गुणवत्ता यादित येणाऱ्या उमेदवारांना राखीव जागांचे निकष लक्षात घेऊन प्रवेश दिला जातो. कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. वित्तीय बाजार, भांडवली बाजार, बँकिंग  या क्षेत्रात उद्भवणाऱ्या विविध कायदेविषयक बाबी, धोरण, नियामके, व्यवस्थापन, प्रक्रिया, अनुपालन आदी बाबींवर लक्ष केंद्रित केले जाते. ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. () एमबीए इन कॉर्पोरेट फायनांस ॲण्ड लॉ- या अभ्यासक्रमाला कोणत्याही ज्ञानशाखेतील ५० टक्के गुणांसह पदवी प्राप्त  उमेदवार प्रवेश घेऊ शकतो. अनुसूचित जाती आणि जमाती या संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये ५ टक्के सूट दिली जाते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते. गुणवत्ता यादित येणाऱ्या उमेदवारांना राखीव जागांचा निकष लक्षात घेऊन प्रवेश दिला जातो. कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. () मास्टर इन इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स- या अभ्यासक्रमामध्ये पॅटेंट्स, इंडस्ट्रिअल डिझाइन, ट्रेड मार्कस, कॉपी राइट्स, जिऑग्रॅफिकल इंडिकेशन्स, प्लॅन्ट व्हरायटी प्रोटेक्शन राइट्स, सेमिकंडक्टर लेआऊट आयसी डिझाइन लेआऊट्स, आदी विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेच्या वतिने ऑनलाइन चाळणी परीक्षा घेतली जाते. ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. () पीएचडी - प्रवेशासाठी पीएचडी-ॲडमिशन टेस्ट घेतली जाते. युजिसी -नेट (नॅशनल इलिजिबिलीटी टेस्ट), जेआरएफ (ज्युनियर रिसर्च फेलोशीप), सीएसआयआर (काऊंसिल ऑफ सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रिएल रिसर्च) , एसएलइटी (स्टेल लेव्हल इलिजिबिलिटी टेस्ट), गेट (ग्रॅज्यूएट ॲप्टिट्युड टेस्ट इन इंजिनीअरिंग), अशा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्याची गरज नाही. मात्र त्यांना त्यांचा संशोधन प्रस्ताव सादर करावा लागेल. मुलाखतीनंतर अंतिम निवड केली जाते. () एम.ए मेडिएशन (मध्यस्थी) ॲण्ड काँफ्लिक्ट रिझोल्युशन (संघर्ष ठराव/ निर्णय), कालावधी दोन वर्षे. अर्हता कोणत्याही विषयातील पदवी.

 

पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम

() पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्राइम इन्व्हेस्टिगेशन, मेडिकल ज्युरिसप्र्युडन्स ॲण्ड फॉरेंसिक सायन्स, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी- एक वर्षं. () पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन लिटिगेशन लॉयरिंग ॲण्ड लॉ फर्म मॅनेजमेंट, अर्हता-कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी - एक वर्षं. () पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन गुड्स ॲण्ड सर्व्हिस लॉ, अर्हता - कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी-एक वर्षं. () पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स, अर्हता - कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी- एक वर्षं. () पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲनिमल लॉ, राइट्स ॲण्ड प्रोटेक्शन, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी-एक वर्षं. () पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टेक्नॉलॉजी ॲण्ड लॉ, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी-एक वर्षं. () पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन व्हिक्टिमॉलॉजी ॲण्ड व्हिक्टिम ज्युरिसप्र्युडन्स, अर्हता- ५० टक्के गुणांसह सामाजिक कार्य, नर्सिंग ,विधि, मानसशास्त्र, समाजशास्त्र, समुपदेशन इत्यादी संबंधित विषयातील पदवी, कालावधी-एक वर्षं, () डिप्लोमा इन फॅशन लॉ, अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी किंवा पदवी, या अभ्यासक्रमामध्ये पुढील विषय घटकांचा समावेश आहे. फॅशन लॉची तोंडओळख, फॅशन लॉ आणि व्यवसाय, फॅशन लॉ आणि वाटाघाटी, फॅशन लॉ आणि बौध्दिक संपदा, कालावधी- सहा महिने. () सर्टिफिकेट कोर्स इन मर्जर ॲण्ड ॲक्विझिशन, अर्हता- विधि, वाणिज्य आणि व्यवस्थापन विषयातील पदवी/ पदव्युत्तर पदवी, कालावधी- सहा महिने.

संपर्क- महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दुसरा माळा, सीइटीटीएम एमटीएनएल बिल्डिंग, टेक्नॉलॉजी स्ट्रीट, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई- ४०००७६, दूरध्वनी-०२२-२५७०३१८७

() नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर

अभ्यासक्रम- () बीए-एलएलबी (ऑनर्स), () बीबीए-एलएलबी (ऑनर्स), () बीए-एलएलबी (ऑनर्स इन ॲडज्युकेशन ॲण्ड जस्टिसिंग), () एलएलएम. स्पेशलाझेशनचे विषय- कॉर्पोरेट ॲण्ड कर्मशिअल लॉ, काँस्टिट्युशनल लॉ, पर्सनल लॉ, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ आणि एनर्जी लॉ.

पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम- हे सर्व अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचे असून ते दूरस्थ शिक्षण (डिस्टंस एज्युकेशन) पध्दतीने करता येतात. हे अभ्यासक्रम राजीव गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, पंजाबच्या सहकार्याने सुरु करण्यात आले आहेत. अभ्यासाचे साहित्य घरी पाठवले जाते. काही प्रत्यक्ष वर्ग घेतले जातात. त्याबाबत संबंधितांना वेळोवेळी कळवले जाते. अभ्यासक्रम - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन () अल्टरनेट डिस्प्युट रिझोल्युशन, () फॅमिली डिस्प्युट रिझोल्युशन, () एनर्जी लॉज ॲण्ड पॉलिसी, () मेडिएशन, () टेलिकम्युनिकेशन लॉज, () इन्फ्रास्ट्रक्चर लॉज, () सायबर लॉज ॲण्ड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, () रिअल इस्टेट लॉज, () मेरिटाइम लॉज, (१०) लेबर ॲण्ड इंडस्ट्रिअल लॉज, (११) एव्हिएशन लॉज, (१२) इंटरनॅशनल ट्रेड लॉज, (१३) इनसॉल्व्हेंसी ॲण्ड बँकरप्सी लॉज, (१४) बँकिंग लॉज, (१५) मीडिया लॉज, (१६) इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राइटस, (१७) फॉरेंसिक सायन्स ॲण्ड लॉज, (१८) क्रिमिनॉलॉजी,पेनॉलॉजी ॲण्ड व्हिक्टिमॉलॉजी

संपर्क- महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, वारंगा गावाजवळ, पोस्ट ऑफिस  डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर- ०७१२- २८१२६०५, संकेतस्थळ- nlunagpur.ac.ins

() महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी औरंगाबाद

अभ्यासक्रम - () बीए-एलएलबी(ऑनर्स), () बीबीए-एलएलबी (ऑनर्स), () एम. ए. इन लॉ, फॉरेंसिक सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी, कालावधी- दोन वर्षे, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. () एम. ए. इन पब्लिक पॉलिसी, या अभ्यासक्रमांततर्गत इंटरनॅशनल डेव्हलपमेंट ॲण्ड पब्लिक अफेअर्स, सस्टेनॅबिलिटी ॲण्ड डेव्हलपमेंट पॉलिसी, स्टेट इंडस्ट्री नेक्सस ॲण्ड बिझिनेस पॉलिसी यापैकी कोणत्याही एका विषयात स्पेशलायझेशन करता येते. कालावधी- दोन वर्षे, अर्हता- कोणत्याही विषयातील ५५ टक्के गुणांसह पदवी. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये ५ टक्के सूट, () बीबीए- एमबीए - हा पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम आहे. () एमबीए इन लॉ ॲण्ड मॅनेजमेंट, () पीएचडी, () एलएलडी (डॉक्टर ऑफ लॉ)

संपर्क- महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, पैठण रोड, कांचनवाडी औरंगाबाद- ४३१००५, दूरध्वनी- ०२४०-२३३४८००, ईमेल-registrar@mnlua.ac.in, संकेतस्थळ- mnlua.ac.in

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी