जैवतंत्रज्ञानातील नवसंकल्पनेला उत्तेजन
जैवतंत्रज्ञानातील नवसंकल्पनेला
उत्तेजन
जैवतंत्र
विषयातील उद्योग, स्टार्टअप आणि नवीन संकल्पनांना, बिग
(बायोटेक्नॉलॉजी इग्निशन ग्रँट) योजनेंतर्गत
उत्तेजन देण्यासाठी, बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंस, या संस्थेची
स्थापना भारत सरकारने केली आहे. या संस्थेने आतापावेतो आठशेहून अधिक नव
संकल्पनांना अर्थसाहाय्य केलं आहे. वैद्यकीय उपकरणे (मेडिकल
डिव्हायसेस), जैवविज्ञान (लाइफसायंस),
आरोग्यसुविधा (हेल्थकेअर), स्वच्छ उर्जा (क्लिन एनर्जी), औद्योगिक
जैवतंत्रज्ञान (ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी), घनकचरा व्यवस्थापन (वेस्ट मॅनेजमेंट), व्हॅक्सिन (लस), निदानतंत्र (डायग्नोस्टिक्स), ड्रग्ज (औषधे), सॅनिटेशन (स्वच्छता), औषध
सूत्रे आणि वितरण प्रक्रिया (ड्रग फार्म्युलेशन ॲण्ड
डिलिव्हरी सिस्टिम्स), कृषी, मशिन लर्निंग, पाण्यावरील शेती (ॲक्वापॉनिक्स),
जैविकखते, जैविकप्रकिया, मत्स्यपालन, पशुवैद्यकीय शास्त्र, पोषण
आहार, कुक्कुटपालन, रेशीमपालन जैवसेवा, जैवविश्लेषन , जैवइंधन, इंटरनेट ऑफ थिंग्ज,
जैवतंत्र उपकरणातील स्वयंचलन, बिग डेटा, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स
या सारख्या क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संकल्पनांना अर्थसाहाय्य दिलं जातं.
अर्थसाहाय्याचं
स्वरुप
ज्या
नव्या संकल्पनांमध्ये उद्योगाची बीज दडल्याचं स्पष्टपणे लक्षात येतं, त्यांना ५०
लाख रुपयांचं अर्थसाहाय्य केलं जातं. या अर्थसाहाय्याचा उपयोग उपकरणं, साहित्य, रसायनं
व इतर द्रव्ये यांची खरेदी, कौशल्ययुक्त मनुष्यबळाची नियुक्ती, इमारत भाडे, प्रवास
आदी बाबींसाठी करता येतो. हा खर्च या साहाय्याच्या १८ महिन्यांच्या कालावधीत करावा
लागतो.
या
कालावधीत संस्थेमार्फत संबंधित नवसंकल्पनाकारास मोठी संपर्क साखळी उपलब्ध करुन
दिली जाते. यामध्ये या क्षेत्रातील उद्योजक, प्रेरक (मेंटॉर), विशेष प्रशिक्षक, विशेष कार्यशाळा यांचा
समावेश आहे.
अटी
आणि शर्ती
(१) या योजनेमधून साहाय्य मिळण्यासाठी संबंधित
उमेदवार कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवीधर असावा. संशोधक आणि वैज्ञानिक यांना सुध्दा
अर्ज करता येतो. (२) १ जानेवारी २०१८
पूर्वी कंपनी अथवा स्टार्टअपची नोंदणी केलेली असावी. (३) नवसंकल्पनाकाराची स्टार्टअप किंवा कंपनीत, भागीदारी (शेअर होल्डर) असावी. (४) अर्ज ऑनलाइनच करावा लागतो. त्यासाठीचे संकेतस्थळ-www.birac.in. या योजनेविषयी विस्तृत माहिती www.birac.nic.in या
संकेतस्थळावर ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी
२०२३ ही आहे. साधारणत:चार महिन्याच्या कालावधीत निर्णय कळवला जातो.
निवडीचे
टप्पे
नवसंकल्पानांच्या
निवडीचे चार टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.
(१) प्राथमिक चाळणी- प्रिलिमनरी सिलेक्शन कमिटी (प्रारंभिक
निवड समिती) मार्फत केली जाते. ही समिती सादर केलेला
प्रस्तावाच्या उपयुक्तेबाबत खातरजमा करुन घेते. या प्रस्तावातील माहितीची
वस्तुनिष्ठता तपासून बघते. चौर्यकर्म केलं नसल्याची खात्री केली जाते.
(२) या समितीने स्वीकृत केलेला प्रस्ताव विषय तज्ज्ञाकडे पाठवला जातो. तो
ऑनलाइन तपासला जातो. (३) विषय तज्ज्ञांनी स्वीकृत केलेल्या प्रस्तावांना, तांत्रिक
मूल्यमापन समिती (टेक्निकल इव्हॅल्युशेन पॅनेल) कडे समक्ष सादरीकरणासाठी निमंत्रीत केलं जातं. १०० गुणांच्या आधार घेऊन
प्रस्तावांचं गुणांकन केलं जातं. (४) हा
प्रस्ताव तज्ज्ञ निवड समितीकडे (एक्सर्पट सिलेक्शन कमिटीकडे ) पाठवला जातो. अर्थसाहाय्यासाठी अंतिम निवड ही समिती करते. प्रत्येक
टप्प्याबाबत अर्जदारांना अवगत केलं जातं.
एखाद्या कंपनीत काम करणारी व्यक्ती, व्यक्तिगत पातळीवर या
अर्थसाहाय्यासाठी अर्ज करु शकते. मात्र अर्थसाहाय्यास पात्र ठरल्यास, संबंधित
कंपनीसोबतचे सर्व संबंध तोडण्यात येत असल्याचं हमीपत्र लिहून द्यावं लागतं. किंवा
मग कंपनी/लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशीप,या
घटकांतर्गत अर्ज दाखल करता येतो. या
प्रकरणी संबंधित कंपनीचा अर्थसाहाय्यासाठी विचार केला जातो. संबंधित
कंपनीची स्थापना किमान पाच वर्षापूर्वी झालेली असावी.
एकापेक्षा अधिक प्रस्ताव सादर करण्याची मुभा आहे. तथापि अर्जदारास
स्वत: जो प्रकल्प किंवा नवसंकल्पना सर्वोत्कृष्ट वाटते, तोच सादर करावा अशी
अपेक्षा आहे. एकापेक्षा अधिक नवसंकल्पना सादर करणारे अर्जदार स्वत:च्या उत्कृष्ट
नवसंकल्पनेविषयी साशंक असल्याचं समजले जातं. प्रकल्प सादर करण्यासाठी मार्गदर्शक
किंवा प्रेरकाची मदत घेता येते. मात्र ते बंधनकारक नाही.
इनक्युबेटर
इनक्युबेटर म्हणून पुढील काही संस्थांची निवड करता येते. या संस्था
बिग योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
(१) सेंटर फॅार सेल्युलर ॲण्ड मॉलेक्युलर प्लॅटफॉर्म- बेंगळुरु- www.ccamp.res.in
080-67185055.
(२) फाउंडेशन फॉर
इनोव्हेशन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर,नवी दिल्ली,संकेतस्थळ- www. fitt‐iitd.org दूरध्वनी- 011‐26597167
(३) आयकेपी
नॉलेज पार्क हैदराबाद, संकेतस्थळ- www.ikpknowledgepark.com;
दूरध्वनी- 040-23480022
(४) केआयआयटी
बायोनेस्ट भूवनेश्वर, संकेतस्थळ- www.kiitincubator.in;
दूरध्वनी- 9178665577
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment