जैव-वैद्दकीय क्षेत्राला गती
जैव-वैद्दकीय क्षेत्राला गती
भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागांतर्गत
कार्यरत असणाऱ्या बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री असिस्टंस काउंसिल (जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन साहाय्यता
मंडळ) मार्फत, नॅशनल बायोफार्मा मिशन राबवले जाणार आहे. जैव-वैद्यकीय
क्षेत्राला गती देण्याच्या उद्देशाने हे अभियान, भारत सरकार व या क्षेत्रातील
उद्योजक आणि प्रशिक्षण संस्था संयुक्तपणे राबवणार आहेत. या अभियानाला
जैवतंत्रज्ञान विभाग आणि जागतिक बँक निधी पुरवणार आहे.
या अभियानांतर्गत जैवतंत्रज्ञान क्षेत्रात कार्य
करु इच्छिणाऱ्या नवउद्दमी आणि सध्या कार्यरत असणा-या उद्योजकांना साहाय्यं केले
जाईल. या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सूक्ष्म जैविक विषाणुंचा सामना करण्यासाठी, नावीन्यपूर्णरित्या
उपचार पध्दतीचा विकसित करणारे संशोधन प्रस्ताव अपेक्षित आहेत.हे प्रस्ताव ऑनलाइन
सादर करावे लागतील. त्याचे संकेतस्थळ - www.birac.nic.in/birac_registration_page.php
प्रस्ताव केवळ भारतीय कंपनीच सादर करु शकते. या
कंपनीची नोंद, इंडियन कंपनी ॲक्ट १९५६/२०१३ अन्वये करण्यात आलेली असावी. या कंपनीचे
५१ टक्के समभाग भारतीय पारपत्रधारक भारतीय नागरिकाचे हवे. कंपनीमध्ये खाजगी
संस्था, सार्वजनिक संस्था, सेक्शन आठ अंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या संस्था, लाभ
घेणाऱ्या संस्था (फॉर प्रॉफिट), लाभ न घेणाऱ्या संस्था (नॉट फॉर प्रॉफिट), लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशीप
यांचा समावेश आहे.
शिवाय, या क्षेत्रातील उद्योजक किंवा संशोधन
संस्थांशी सहकार्य करुन कार्यरत असणा-या स्टार्टअप्सना सुध्दा प्रस्ताव सादर करता
येतील. अशा प्रस्तावांना प्रोत्साहन देण्यात येईल.
सुलभ प्रक्रिया
प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात
आली आहे.
याचे काही टप्पे पुढीलप्रमाणे आहेत -
(१) www.birac.nic.in/nbm/
या लिंक (संपर्क साखळी)
वर क्लिक करा.
(२) या
लिंकवरील RPF या बटनला क्लिक करा. या योजनेच्या प्रस्तावाची
माहिती (ॲक्टिव्ह कॉल) दिसू लागेल.
(३) या योजनेच्या ॲक्टिव्ह कॉलच्या
प्रस्तावावर क्लिक करा.
(४) प्रस्ताव कसा सादर
करायचा? (हाऊ टू सबमिट प्रपोजल), या विषयाची विस्तृत माहिती संकेतस्थळावरील, "वापर
कर्त्यांसाठी मार्गदर्शन - युझर गाइड", या बटनला क्लिक
केल्यावर बघायला मिळेल.
(५) या आधी नोंदणी केली
नसल्यास, नवीन नोंदणी (न्यू युझर रजिस्ट्रेशन) या बटनवर क्लिक करुन कंपनी/ संस्थेची नोंदणी करावी लागेल.
(६) नवीन नोंदणी
करणाऱ्यांना संगणक निर्मित लिंक (साखळी) ई-मेलव्दारे पाठवण्यात येईल. त्याव्दारे पासवर्डची निर्मिती करता येईल.
(७) लॉग-इन पूर्ण झाल्यावर
प्रस्ताव सादर करणाऱ्या पृष्ठावर सहजतेने जाता येईल.
संपर्क ईमेल- nbm1.barac@nic.in
००००
जैवतांत्रिक प्रकल्पांना साहाय्य
जैवतंत्रज्ञानाचा वापर करुन विकसित करण्यात
येणारी विविध उत्पादने आणि तंत्रज्ञान विकासाला उत्तेजन देण्यासाठी जैवतंत्रज्ञान
विभागामार्फत (१)
बिग (बायोटेक्नॉलॉजी इग्निशन ग्रँट), (२) बिप (बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री
पार्टनरशीप प्रोग्रॅम), (३) एसबिरी (स्माल बिझिनेस इनोव्हेशन रिसर्च
इनिशिएटिव्ह), (४) पेस (प्रमोटिंग ॲकॅडेमिक रिसर्च कनव्हर्शन टू एंटरप्राईज), (५) स्पर्श (सोशल इव्होव्हेशन इर्मशन प्रोग्रॅम फॉर प्रॉडक्ट्स : ॲफॉर्डेबल ॲण्ड
रिलेव्हन्ट टू सोसायटल हेल्थ), सारख्या योजना राबवत आहे. यासाठी ग्रॅड
चॅलेंजेस इंडिया, नॅशनल बायोफार्मा मिशन अशासारखे उपक्रम नियमितपणे राबवले जातात.
या मोहिमेंतर्गत विकसित उत्पादने आणि
तंत्रज्ञानाची गुणवत्ता आणि दर्जा सतत तपासली जाते. त्यातील त्रुटी दूर करुन ते अधिक प्रगत
होण्यासाठी तांत्रिक सहकार्य पुरवले जाते. या विषयीची विस्तृत माहिती http://www.birac.nic.in/desc_new.php?)
या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आली
आहे.
संस्थेच्या विविध योजनेंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या
उत्पादनांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर, व्यापारी उपयोग करण्यापूर्वीची वेगवेगळया
पध्दतीची व्यापक सिध्दता यासाठी अर्थसाहाय्य केले जाते. सर्व प्रकारच्या चाचण्या
/परीक्षण यातून तावूनसुलाखून निघालेली उत्पादने आणि तंत्रज्ञान जेव्हा व्यापारी
उपयोगासाठी संपूर्णरीत्या सिध्द होतात, त्यांना विक्रीसाठी सोई- सुविधा- व्यासपीठाची
गरज भासते. त्यासाठी वेगळा निधी लागतो. तो सध्याच्या योजनांमधून देय नाही. ही बाब
लक्षात घेऊन संस्थेने, प्रॉडक्ट कर्मशिलायझेशन प्रोग्रॅम (उत्पादन व्यावसायिककरण योजना) कार्यान्वित केली आहे. या
योजनेंतर्गत अनुदानाच्या स्वरुपात नवउद्दमींना व्यवसाय करण्यासाठी अर्थसाहाय्य
केले जाते. या योजनेंतर्गत वर्षभर प्रस्ताव सादर करता येतात.
|
संपर्क- बायोटेक्नॉलॉजी
इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स काउंसिल, फर्स्ट फ्लोअर, एमटीएनएल
बिल्डिंग,९,सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड,न्यू
दिल्ली-११०००३, दूरध्वनी-०११-२४३८९६००, ईमेल-birac.dbt@nic.in |
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment