पुढे काय करायचं?
पुढे काय करायचं?
प्रश्न-मला
नोकरीची गरज आहे.पण नोकरी मिळत नाही.त्यामुळे माझ्यात न्युनगंड निर्माण झाला
आहे.यावर योग्य ते मार्गदर्शन करावे.
नितीन काळे
उत्तर- तुला नोकरी
न मिळण्याचे कारण म्हणजे तुझे सादरीकरण कौशल्य, संवाद कौशल्य आणि विषयाचे ज्ञान
कमी पडत असले पाहिजे. या तीन बाबींवर आत्मपरीक्षण करुन त्यात काही सुधारणा करता
येते का बघ. तुझे महाविद्यालय सुटले असल्याने तुला आता नोकरीसाठी ऑफ कॅम्पसच
प्रयत्न करावे लागतील. लिंक्डइन वर तुझा प्रोफाइल टाकून ठेव. त्याचा सुध्दा कधीकधी
उपयोग होतो. सी डॅक- सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग या संस्थेने सुरु
केलेले ॲडव्हान्सड डिप्लोमा इन मल्टिलिंग्यूअल मल्टिमीडिआ , ॲडव्हान्सड डिप्लोमा
इन मल्टिलिंग्यूअल कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स , ॲडव्हान्सड डिप्लोमा इन
मल्टिलिंग्यूअल कॉम्प्युटर
प्रोग्रॅमिंग, पोस्ट
ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन मल्टिलिंग्यूअल कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स , पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन मोबाइल कॉम्प्युटिंग, पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन व्हीएलअसआय डिझायनिंग, पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन आयटी इंफ्रास्ट्रक्चर,
सिस्टिम्स, ॲण्ड सिक्युरिटी, पोस्ट
ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन जिओइंर्फमेटिक्स, पोस्ट
ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन एम्बेडेड सिस्टिम डिझाइन, पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन सिस्टिम सॉफ्टवेअर
डेव्हलपमेंट, पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन
इंटरनेट ऑफ थिंग्ज, पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन बिग
डाटा ॲनॅलिटिक्स,हे अभ्यासक्रम करिअर संधी मिळण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात. संपर्क- https://cdac.in/index.aspx?id=edu_pgpd_pgd_programmes
सार्वजनिक बँकामध्ये
संगणक पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांना स्पेशल ऑफिसर म्हणून नियुक्त केले जाते. ही
नियुक्त चाळणी परीक्षेद्वारे केली जाते. ही परीक्षा तू देउु शकतोस. GATE- ग्रज्यूएट ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनीअर्स ही
परीक्षा देउुन तू चांगल्या संस्थेतील एम.टेकसाठी प्रयत्न करु शकतोस. गेट परीक्षेत
चांगले गुण मिळाले तुला सार्वजनिक कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते.
०००
प्रश्न- मी २०१९ मध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण
केले आहे. मी
कम्बाइन्ड डिफेंस परीक्षेची तयारी करत आहे. मला भारतीय नौदल किंवा वायुदलात
जायचे आहे. पण
माझ्याकडे १२वी उत्तीर्ण प्रमाणपत्र नाही. कारण मी पदविका केली आहे. मी जर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र
मुक्त विद्यापीठामधून १२वी केले तर नौदल किंवा वायुदलातील प्रवेशासाठी पात्र ठरु
शकतो का?
देवेंद्र बागूल,यवतताळ
उत्तर- देवेंद्र, संघ लोकसेवा आयोगाने कम्बाइन्ड
डिफेन्स सर्व्हिसद्वारे नौदल व वायुदलातील प्रवेशासाठी शैक्षणिक अर्हता स्पष्टपणे
नमूद केली आहे. त्यानुसार
नैदल व वायुदलातील प्रवेशासाठी कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी ग्राह्य धरली
जाते. त्यामुळे
तुला कोणतीही अडचण नाही. यशवंतराव चव्हाण महारष्ट्र मुक्त
विद्यापीठामधून १२ वी
करण्याची गरज नाही.
०००
आज करिअर कंसेप्ट(https://www.facebook.com/Career-concept-100260352041907)मध्ये- विद्यार्थ्यांच्या
प्रश्नांना उत्तरे-पुढे काय करायचं?- उदा.- प्रश्न- मी सध्या एम.ए करित
आहे. सध्या ॲक्सिस सेक्युरिटिज लिमिटेडमध्ये रिेलेशनशीप ऑफिसर म्हणून मी कार्यरत
आहे. मला नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ बँकिंगबद्दल सांगा. या संस्थेचे अभ्यासक्रम
पूर्णवेळेचे आहेत की दूरशिक्षण पध्दतीने करता येईल का? मला नियमित स्वरुपाचे एमबीए
नोकरीमुळे करणे शक्य नाही. मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ किंवा
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे एमबीए करु की नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ
बँकिंगचे एमबीए करु?
पंकज बोथीकर
उत्तर- पंकज, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग या संस्थेची
स्थापना १९६९ साली भारत सरकारच्या सल्लामसलतीने रिझर्व बँक ऑफ इंडियाने केली.
बँकिंग व्यवस्थेची थिंक टँक म्हणून ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेने पोस्ट
ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (बँकिंग ॲण्ड फायनांशिअल सर्व्हिसेस) हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम
सुरु केला आहे. या संस्थेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी १०० टक्के प्लेसमेंट मिळाले
आहे. संस्थेतील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॉमन ॲडमिशन टेस्ट- कॅट किंवा कॉमन
मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट- सीमॅट मधील गुणांचा आधार घेतला जातो. या दोन्ही
परीक्षा दिलेले जे विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करतात, त्यातील
निवडक विद्यार्थ्यांना लेखनकौशल्य चाळणी आणि
मुलाखतीसाठी बोलावले जाते. त्यानंतर अंतिम निवड केली जाते. संपर्क- http://pgdm.nibmindia.org. याचा अर्थ असा आहे की या संस्थेत
प्रवेश घेतल्यास उत्तम प्लेसमेंट मिळण्याची हमी आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र
मुक्त विद्यापीठ किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे एमबीए
अभ्यासक्रम मान्यताप्राप्त असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात त्याला कितपत महत्व दिले
जाते हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे तू कॅट किंवा सीमॅट परीक्षा देऊन नॅशनल
इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग या संस्थेत प्रवेश घेणे श्रेयस्कर ठरु शकते. आतापर्यंतच्या
कामाच्या अनुभवाचा सुध्दा लाभ होऊ शकतो.
०००
Comments
Post a Comment