- मायक्रॉनने पुन्हा अधोरखित केले विषाणूशास्त्राचे महत्व !-
- मायक्रॉनने पुन्हा अधोरखित केले विषाणूशास्त्राचे
महत्व !-
पंधरा वीस दिवसांपूर्वी ध्यानीमनी
नसणाऱ्या मायक्रॉन या करोनाच्या पुढील अवतराची चर्चा सुरु झाली आणि पुन्हा एकदा विषाणुशास्त्राच्या
अभ्यासाचे महत्व अधोरेखित झाले.
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ
व्हायरॉलॉजी या संस्थेने दोन वर्षे कालावधीचा मास्टर ऑफ सायन्स इन व्हायरॉलॉजी हा
अभ्यासक्रम सुरु केला आहे. संगसर्गजन्य आजाराचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास
करण्यासाठी संस्थेकडे स्वत:ची अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे. हा अभ्यासक्रम
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. अभ्यासक्रमाच्या काळात
विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनात्मक कल्पना साकारण्यासाठी उत्तेजन दिले जाते.
त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाते व सुविधा पुरविल्या जातात. त्यामुळे
विद्यार्थ्यांचे सैध्दांतिक ज्ञान पक्के होते.
नित्य नव्याने उदयास
येणाऱ्या विषाणूंचा सामना करण्याच्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांना परिपूर्ण ज्ञान
प्रदान केले जाते. विषाणूचा प्रसार, आजाराची कारणे, विषाणूजन्य संसर्गास
थोपववण्याच्या उपाययोजना याविषयी विद्यार्थ्यांचा पाया भक्कम केला जातो.
प्रतिकारशास्त्र, लसशास्त्र या विषयघटकांचे ज्ञान प्रदान केले जाते. त्यासाठी
आंतरज्ञानशाखीय तत्वांचा अवलंब केला जातो.
करिअर संधी
विषाणू शास्त्रातील असे
सखोल ज्ञान प्राप्त करत असल्याने या
विद्यार्थांना भारत बायोटेक, हिंदुस्थान युनिलिव्हर, वेकंटेश्वरा हॅचरिज, सेरम इंस्टिट्यूट
ऑफ इंडिया, टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, नॅशनल इंस्टिट्यूट फॉर रिसर्च
इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ, नॅशनल एडस रिसर्च इंस्टिट्यूट या सारख्या संस्थांमध्ये
करिअर संधी मिळाल्या आहेत. विद्यार्थ्यांना सिंगापूर, थायलंड, इटली, जर्मनी, इटली,
फिनलँड, कॅनॅडा, बेल्जियम, अमेरिका या सारख्या देशांमध्ये संशोधनाची संधी मिळाली
आहे.
अर्हता- बायोटेक्नॉलॉजी,
केमिस्ट्री , प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जैविक शास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र,
क्लिनिकल लेबॉरेटरी सायन्स यापैकी कोणत्याही एका विषयामध्ये ६० टक्के गुणांसह
बी.एस्सी पदवी. राखीव संवर्गातील उमदेवारांसाठी ही मर्यादा- ५५ टक्के. मास्टर ऑफ
व्हेटनर्री सायन्स (एम.व्हीएस्सी) किंवा एमबीबीएस पदवी घेतलेले विद्यार्थी सुध्दा या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु
शकतात. त्यांनाही पदवी परीक्षेत ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
प्रवेशासाठी
परीक्षा
प्रवेशासाठी
पुणे येथे चाळणी परीक्षा घेतली जाते. पेपर बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ पध्दतीचा
असतो. यामध्ये १२ वीच्या स्तरावरील भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र आणि
रसायनशास्त्रावर २० प्रश्न विचारले जातात. ८० प्रश्न हे पदवी स्तरावरील,
जैवतंत्रज्ञान, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, जैविक शास्त्र, वैद्यकीयशास्त्र,
पशुवैद्यक शास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयांवर आधारित
असतात. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण असल्याने एकूण
गुण २०० होतात. चुकलेल्या प्रश्नासाठी ०.५ टक्के गुण कपात केले जाते.
संपर्क- कुऑर्डिनेटर, ॲकॅडेमिक सेल,
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हॉयरॉलॉजी,,एमसीसी कॅम्पस,१३०/१,सुस रोड,पाशान,पुणे-
४११०२१,दूरध्वनी-०२०-२६००६३०४,ईमेल- ghole.vs@niv.co.in संकेतस्थळ-
niv.co.in
०००
Comments
Post a Comment