पुढे काय करायच?
पुढे काय करायच?
प्रश्न - माझं बी.ए ,डी.एड झालं असून मी एम.ए करत आहे, मला कोणकोणत्या
क्षेत्रात करिअर करता येऊ शकतं?
सुनील मोरे,नागपूर
उत्तर- सुनील, तू अध्यापनाच्या क्षेत्रात करिअर करु
शकतोस. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देण्यास पात्र आहेस. एमबीए वा पोस्ट
ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम करुन वेगवेगळया
कंपन्यामध्ये नोकरी मिळवू शकतोस. इव्हेंट मॅनेजमेंट, वेडिंग प्लॅनर, टॅटू आर्टिस्ट
असे विविध पर्याय उपलब्ध आहे. गती असणाऱ्या विषयाची शिकवणी घेण्याचा पर्यायही आहे.
०००
प्रश्न- मी सध्या मराठी माध्यमातून अर्थशास्त्रात
एम.एम करित आहे. मला पुढे परदेशात शिक्षण्याच्या संधी आहेत का.?
मिथून चोरमुले,बारामती
उत्तर- मिथून, तुला परदेशी शिक्षण घेण्याच्या संधी
नक्कीच आहेत. मराठी माध्यमात शिक्षण घेण्याचा गंड बाळगू नकोस. तथापि परदेशातील
शिक्षणसंस्थेतील प्रवेशासाठी इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टिम (आयइएलटीएस) / टेस्ट ऑफ इंग्लिश ॲज फॉरेन लँग्वेज
( टीओइएफलएल) या परीक्षा उत्तमरीतीने उत्तीर्ण होणं
आवश्यक ठरतं.
०००
प्रश्न- मी राज्य लोकसेवा
आयोगाचा अभ्यास करत आहे. पण मला अभ्यास कसा करावा किती वेळ करावा हे समजत
नाही, त्यामुळे अभ्यासाचं
नियोजन कसं करू याबद्दल मार्गदर्शन करा.
संदीप जाधव,अकोला
उत्तर- संदीप, तू
यंदा परीक्षा देणार असशील तर प्राथमिक परीक्षेचा कालावधी लक्षात घेऊन प्रत्येक
विषयासाठी विशिष्ट वेळ ठरवून घ्यावा. तुझ्या स्वत:च्या वेळापत्रकात तुला कठीण
वाटणाऱ्या विषयांसाठी जास्त वेळ आणि सोप्या वाटणाऱ्या विषयासाठी कमी वेळ द्यावास.
सराव आणि चिंतनासाठी वेळ राखून ठेवावा. याशिवाय व्यायाम/ मनोरंजन/वृत्तपत्रे वाचन/
दूरचित्रवाहिनी-आकाशवाणीवरील बातम्या-चर्चाविषयक कार्यक्रमांसाठीही वेळ द्यावा. ही
सर्व प्रक्रिया आनंदाने करावी. तणाव घेऊ नये. मात्र ठरवलेला अभ्यासक्रम
वेळापत्रकानुसारच पूर्ण करावा. आजचा अभ्यासक्रम उदयावर ढकलू नये.थेंबे थेंबे तळे
साचे ही म्हण या परीक्षेच्या तयारीसाठी खूप उपयुक्त ठरते.
००००
पुढे काय करायचं?
प्रश्न- मी १२ वी झालेली आहे.
भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे माझे विषय आहेत. मी पुढे एमबीबीएस, बीडीएस आणि बीएएमएस
सोडून काय करावे हे मला कळत नाही.
गीता वानखेडे, नवी मुंबई
उत्तर- गीता, तुझ्या प्रश्नावरुन
तुला वैद्यकीय क्षेत्रात नाही जायचय हे स्पष्ट आहे. तू औषधीनिर्माणशास्त्र म्हणजे बी.फार्म हा अभ्यासक्रम
करु शकतेस. त्याच बरोबर बी.एस्सी नर्सिंग हा पर्यायही उपलब्ध आहे.
याही क्षेत्रात जायचे नसल्यास तू विज्ञान विषयात पदवी व त्यानंतर तुझ्या आवडीच्या
व गती असलेल्या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी म्हणजेच एम.एस्सी करु शकतेस. सध्या भारत सरकार
संशोधनाला खूप चालना आणि प्रोत्साहन देत आहे.
त्यामुळे एम.एस्सी नंतर संशोधनाचं क्षेत्र निवडू शकतेस. या क्षेत्रात अनेक संधी मिळू शकतात.
०००
प्रश्न- मी यशवंतराव चव्हाण
मुक्त विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. मी यूपीएसस्सीची तयारी करत
आहे. मुक्त विद्यापीठातून पदवी घेतल्यामुळे यूपीएस्सी किंवा एमपीएस्सीच्या
मुलाखतीमध्ये काही समस्या येईल का?
सुरेंद्र सोनवणे, धुळे
उत्तर-
सुरेंद्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा दर्जा हा कोणत्याही अधिकृत विद्यापीठाच्या
समकक्ष असल्याने तुला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.
००००
प्रश्न- मी २०१९ मध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण
केले आहे. मी
कम्बाइन्ड डिफेंस परीक्षेची तयारी करत आहे. मला भारतीय नौदल किंवा वायुदलात
जायचे आहे. पण
माझ्याकडे १२वी उत्तीर्ण प्रमाणपत्र नाही. कारण मी पदविका केली आहे. मी जर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र
मुक्त विद्यापीठामधून १२वी केले तर नौदल किंवा वायुदलातील प्रवेशासाठी पात्र ठरु
शकतो का?
देवेंद्र बागूल,यवतमाळ
उत्तर- देवेंद्र, संघ लोकसेवा आयोगाने कम्बाइन्ड
डिफेन्स सर्व्हिसद्वारे नौदल व वायुदलातील प्रवेशासाठी शैक्षणिक अर्हता स्पष्टपणे
नमूद केली आहे. त्यानुसार
नैदल व वायुदलातील प्रवेशासाठी कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी ग्राह्य धरली
जाते. त्यामुळे
तुला कोणतीही अडचण नाही. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त
विद्यापीठामधून १२ वी
करण्याची गरज नाही.
०००
पुढे काय करायच?
प्रश्न-फॅशन डिझायनिंग या विषयातील अभ्यासक्रम चालवणाऱ्या महत्वाच्या
संस्था कोणत्या आहेत.
-रश्मी देसाई,नागपूर
फॅशन डिझाइन अभ्यासक्रम शिकवणाऱ्या देशातील टॉप २५ संस्था-
(१)नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन
टेक्नॉलॉजी-नवी दिल्ली,
(२)नॅशनल इंस्टिट्यूट
ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी-नवी मुंबई
(३)नॅशनल इंस्टिट्यूट
ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी-बेंगळुरु
(४)नॅशनल इंस्टिट्यूट
ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी-चेन्नई
(५)नॅशनल इंस्टिट्यूट
ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी-पाटणा
(६)नॅशनल इंस्टिट्यूट
ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी-गांधीनगर
(७)नॅशनल इंस्टिट्यूट
ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी-हैदराबाद
(८)नॅशनल इंस्टिट्यूट
ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी-कोलकता
(९)पर्ल ॲकेडमी- नवी
दिल्ली
(१०)सिम्बॉयसीस
इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन-पुणे
(११)नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी-रायबरेली
(१२)नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी-शिलाँग
(१३) आर्मी इंस्टिट्यूट
ऑफ फॅशन ॲण्ड डिझाइन-बेंगळुरु
(१४)पर्ल ॲकेडेमी- जयपूर
(१५)ॲमिटी स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी-नॉयडा
(१६)नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी-कांग्रा
(१७)जे.डी इंस्टिट्यूट फॅशन टेक्नॉलॉजी-बेंगळुरु
(१८)एनआयएफटी-टी कॉलेज ऑफ निटवेअर फॅशन-तिरुपूर
(१९)स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी पुणे(महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था)
(२०)ॲपिजे कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स-जालंदर
(२१)डिपार्टमेंट ऑफ डिझाइन,मनिपाल स्कूल ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड
प्लॅनिंग-उडुपी
(२२)फॅशन ॲण्ड ॲपेरल डिझाइन,टी जॉन कॉलेज बेंगळुरु
(२३)वोग इंस्टिट्यूट ऑफ आर्ट ॲण्ड डिझाइन- बेंगळुरु
(२४)पर्ल ॲकॅडेमी-मुंबई
(२५)आयएमएस डिझाइन ॲण्ड इनोव्हेशन ॲकॅडेमी-नॉयडा
Comments
Post a Comment