व्हा रणरागिणी! - भाग एक
व्हा रणरागिणी! - भाग एक
साहस आणि शौर्य गाजवण्याची इच्छा आणि
आणि आत्मविश्वास असणाऱ्या पदवीधर महिलांना लष्कराच्या तिनही शाखांमध्ये लघु सेवा
कमिशनव्दारे पुढील संधी मिळू शकते.
भारतीय
वायुसेना
१) एनसीसी स्पेशल एन्ट्री योजना- अर्हता- ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील
बीई किंवा बीटेक किंवा कोणत्याही विषयातील पदवी आणि १२ वीमध्ये भौतिक शास्त्र आणि
गणित या विषयांमध्ये किमान ५० टक्के गुण आवश्यक. एनसीसी सिनिअर डिव्हिजन विंग मधील
सी प्रमाणपत्र आवश्यक. उमेदवाराचे वय २० ते २४ वर्षे असावे. या निवडीसाठीची
जाहिरात भारतीय वायुदलामार्फत जून आणि डिसेंबर महिन्यात प्रकाशित करण्यात येते.
२) एफसीएटी-एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट-
ही परीक्षा
भारतीय वायुदलामार्फत दरवर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्ट अशी दोनदा घेतली जाते. ही
परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, एअर फोर्स सिलेक्शन बोर्ड टेस्टिंग हा दुसरा टप्पा पार
पाडावा लागतो. याअंतर्गत दोन टप्पे आहेत.
पहिला टप्पा- ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग टेस्ट.दुसरा
टप्पा- पिक्चर पर्सेप्शन ॲण्ड डिस्कशन टेस्ट. पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण
झालेल्या उमेदवारांनाच दुसऱ्या टप्प्यासाठी संधी दिली जाते. पहिल्या टप्प्यात
अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्वरित घरी पाठवले जाते. टप्पा दोनची
परीक्षा/चाळणी चार ते पाच दिवस चालते. यामध्ये पुढील बाबिंचा समावेश असतो. (१) लेखी मानसशास्त्रीय (सॉयकॉलॉजिकल टेस्ट) चाचणी- ही परीक्षा मानसोपचार
तज्ज्ञामार्फत घेतली जाते. (२)
समूह (ग्रुप
टेस्ट)
चाचणी- यामध्ये बाह्य (आऊटडोर) बौध्दिक आणि शारीरिक कृतींचा समावेश असतो. (३) मुलाखत (इंटरव्ह्यू)- मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यामार्फत
व्यक्तिगत संवाद साधला जातो. (४)
फ्लाईंग ब्रँचसाठी निवड झालेल्या उमेदवारांना संगणकीय वैमानिक निवड प्रक्रिया
चाळणी (कॉम्प्युटराईज्ड
पायलट सिलेक्शन सिस्टिम टेस्ट) द्यावी लागते.)
तिसरा टप्पा- (वैद्यकीय चाळणी/मेडिकल एक्झामिनेशन)- दुसऱ्या टप्प्यात, निवड मंडळाकडून
शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाळणीस सामोरे जावे लागते.
चौथा टप्पा (अखिल भारतीय गुणवत्ता यादी)-वैद्यकीय चाळणीत उत्तीर्ण झालेल्या
उमेदवारांची विविध शाखांमध्ये उपलब्ध जागांनुसार अखिल भारतीय गुणवत्ता यादी तयार
केली जाते.
या योजनेंतर्गत हवाई शाखेत (फ्लाईंग ब्रँच) साठी निवड केली जाते. अर्हता -
कोणत्याही विषयातील ६० टक्के गुणांसह पदवी आणि १२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित
या विषयांमध्ये किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. किंवा ६० टक्के गुणांसह
बीई/बीटेक किंवा ६० टक्के गुणांसह असोशिएट मेंबरशिप ऑफ इंस्टिट्यूशन ऑफ
इंजिनीअर्सची अथवा एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाची ए आणि बी परीक्षा उत्तीर्ण. या
परीक्षेला विद्यापीठाची मान्यता प्राप्त हवी. उमेदवारांचे वय २० ते २४ वर्षे
असावे. जून आणि डिसेंबरमध्ये या पदाच्या परीक्षेची जाहिरात भारतीय वायुदलामार्फत
प्रकाशित केली जाते.
३) ग्राउंड ड्युटी (तांत्रिक) - एरॉनॉटिकल इंजिनीअर (इलेक्ट्रॉनिक्स) - अर्हता-बीई/बीटेक आणि १२वी मध्ये
भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये किमान ६० टक्के गुण मिळालेले हवेत किंवा
किंवा ६० टक्के गुणांसह असोशिएट मेंबरशिप ऑफ इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सची अथवा
एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाची ए आणि बी परीक्षा उत्तीर्ण किंवा ग्रॅज्युएट
मेंबरशीप एक्झामिनेशन ऑफ इंस्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिक्यमुनिकेशन
इंजिनीअर्सची परीक्षा ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (विषय सुची- कम्युनिकेशन इंजिनीअरिंग,
काम्प्युटर इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजी, काम्प्युटर इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी,
काम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल ॲण्ड काम्प्युटर
इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग ईत्यादी.) या परीक्षेला विद्यापीठाची मान्यता
प्राप्त हवी. उमेदवारांचे वय २० ते २६ वर्षे असावे. जून आणि डिसेंबरमध्ये या
पदाच्या परीक्षेची जाहिरात भारतीय वायुदलामार्फत प्रकाशित केली जाते.
४) ग्राउंड ड्युटी (तांत्रिक)- एरॉनॉटिकल इंजिनीअर (मेकॅनिकल)- अर्हता-१२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि
गणित या विषयांमध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक. बीई/बीटेक किंवा इंटिग्रेटेड
पोस्ट ग्रॅज्युएट इन इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजी किंवा असोशिएट मेंबरशीप ऑफ
इंस्टिट्युशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया)च्या परीक्षेतील ए आणि बी भाग (सेक्शन) उत्तीर्ण किंवा एरोनॉटिकल सोसायटी ऑफ
इंडियाच्या परीक्षेतील ए आणि बी भाग उत्तीर्ण. पुढील विषय किंवा शाखांमध्ये किमान
६० टक्के गुण आवश्यक- एरोस्पेस इंजिनीअरिंग, एरोनॉटिकल इंजिनीअरिंग, एअरक्रॉफ्ट
मेंटनंन्स इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग ॲण्ड ऑटोमेशन,
मेकॅनिकल इंजिनीअरिंग-प्रॉडक्शन, मेकॅनिकल इंजिनीअरिंग - रिपेअर ॲण्ड मेंटनन्स,
मेकॅट्रॉनिक्स, इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग.
संपर्क- एफसीएटी सेल, दूरध्वनी-०२०-२५५०३१०५, ईमेल- afcatcell@cdac.in
५) ग्राउंड ड्युटी (अतांत्रिक) - या अंतर्गत पुढील शाखांमध्ये निवड केली जाते. (अ) ॲडमिनिस्ट्रेशन (प्रशासन) - ६० टक्के गुणांसह कोणत्याही
विषयातील तीन वर्षे कालावधीची पदवी किंवा किंवा ६० टक्के गुणांसह असोशिएट मेंबरशिप
ऑफ इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सची अथवा एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाची ए आणि बी
परीक्षा उत्तीर्ण, उमेदवारांचे वय २० ते २६ वर्षे असावे. (ब) एज्युकेशनल (शैक्षणिक)-किमान अर्हता- एमबीए/एमसीए किंवा
एमए/एमएस्सी इन इंग्रजी/ भौतिकशास्त्र/ गणित/ रसायनशास्त्र/ सांख्यिकी/
आंतरराष्ट्रीय अभ्यास- इंटरनॅशनल स्टडीज / आंतरराष्ट्रीय संबंध- इंटरनॅशनल रिलेशन्स/ डिफेन्स स्टडीज- सुरक्षा
अभ्यास/ मानसशास्त्र/ संगणकशास्त्र/ माहिती तंत्रज्ञान- इंफॉर्मेशन
टेक्नॉलॉजी/व्यवस्थापन/ मास कम्युनिकेशन/ पत्रकारिता/ जनसंपर्क. सर्व विषयांमध्ये
सरासरीने किमान ५० टक्के गुण आवश्यक. पदव्युत्तर पदवीचा कालावधी किमान दोन वर्षाचा
असणे आवश्यक. इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांसाठी हा कालावधी कमी आहे. पदवी परीक्षेत
किमान ६० टक्के गुण आवश्यक. उमेदवारांचे वय २० ते २६ वर्षे असावे. (क) अकांउट्स (लेखा)- ६० टक्के गुणांसह बी.कॉम पदवी, उमेदवारांचे वय २० ते २६ वर्षे असावे,
(ड) लॉजिस्टिक्स (साधनसामग्री)- अर्हता-६० टक्के गुणांसह कोणत्याही
विषयातील पदवी,
किंवा ६० टक्के गुणांसह असोशिएट मेंबरशिप ऑफ इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सची अथवा
एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाची ए आणि बी परीक्षा उत्तीर्ण, उमेदवारांचे वय २० ते २६ वर्षे असावे.
(इ) मेटिऑरॉलॉजी शाखा- अर्हता- पुढील शाखांमधील पदव्युत्तर
पदवी- गणित/ सांख्यिकी/ भुगोल/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ एन्व्हीराँमेंटल सायंस/
ॲप्लाइड फिजिक्स/ ॲग्रिकल्चरल मेटिऑरॉलॉजी/ इकॉलॉजी ॲण्ड एन्व्हीराँमेंट ,
एन्व्हीराँमेंटल बॉयलॉजी, जिओ फिजिक्स. पदव्युत्तर पदवीच्या सर्व पेपरमध्ये
सरासरीने किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. पदवी स्तरावर भौतिकशास्त्र आणि गणिताचा
अभ्यास केलेला असावा. या पेपरमध्ये किमान ५५ टक्के गुण मिळायला हवेत.
मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस
मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसच्या
माध्यमातून भारतीय थल सेनेमध्ये महिला उमदेवारांचा प्रवेश होऊ शकतो. या सेवेमध्ये
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांना लष्करामार्फत चालविण्यात येणाऱ्या
बी.एस्सी (नर्सिंग) या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवावा
लागतो. हा अभ्यासक्रम आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसेच्या अंतर्गत पुणे, कोलकता,
बेंगळुरु, अश्विनी, लखनौ आणि नवी दिल्ली येथे कार्यरत असणाऱ्या नर्सिंग
महाविद्यालयात करावा लागतो. एकूण २२० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. यापैकी २५
जागा या एनसीसी सी प्रमाणपत्र प्राप्त उमेदवारांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती
आणि जमाती उमेदवारांसाठी १५ जागा राखीव आहेत.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर कायम
स्वरुपी किंवा लघु सेवा (कमिशन) साठी नियुक्ती केली जाते. या सर्व बाबी शारीरिक क्षमता आणि वैद्यकीय
चाळणी यावर अवलंबून असतात.
अशी असते परीक्षा-
अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा घेतली
जाते. पेपर वस्तुनिष्ट पध्दतीचा आणि बहुपर्यायी उत्तरांचा असतो. एकूण प्रश्न १५०
कालावधी ९० मिनिटे. पेपरमध्ये सामान्य ज्ञान, इंग्रजी आणि विज्ञान (भौतिकशास्त्र, जीवशास्त्र,
रसायनशास्त्र)
यावर प्रत्येकी ५० प्रश्न विचारले जातात. परीक्षेचे माध्यम इंग्रजी. निगेटिव्ह गुण
नाहीत. या परीक्षेत विशिष्ट गुणांनी उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखती व वैद्यकीय
चाचणीसाठी बोलावले जाते. त्यानंतर अंतिम निवड केली जाते.
अर्हता- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र,
जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि इंग्रजी हे विषय घेतेलेल्या महिला उमदेवार या परीक्षेसाठी
पात्र ठरतात. त्यांना सरासरीने किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक ठरते.
संपर्क- डायरेक्टर जनरल ऑफ मेडिकल
सर्व्हिसेस, आर्मी-४ बी, रुम नंबर ३४ एल ब्लॉक, एजी ब्रँच, इंटिग्रेटेड
हेडक्वार्टर्स ऑफ मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स (आर्मी), नवी दिल्ली ११०००१ दूरध्वनी- ०११-
२३०९२२९४
०००

Comments
Post a Comment