वाणिज्य,वित्त आणि विश्लेषण (1)
वाणिज्य,वित्त आणि विश्लेषण (1)
परदेशातील शिष्यवृत्तीबाबत
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काय योजना आहेत, याची माहिती घेण्यासाठी नुकतीच या
बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट घेतली. हे गृहस्थ मुळचे बिहारचे. अनेक
ठिकाणी शाखा व्यवस्थापक म्हणून कामाचा अनुभव. मुंबईत येण्यापूर्वी ते दिल्लीच्या
एका शाखेचे प्रमुख होते. त्यावेळी त्यांची मुलगी 12 वीत होती. तिला वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा होता.
या गृहस्थांनी तिला दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश
मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले. या गृहस्थास आपल्या
मुलीस लेडी श्रीराम कॉलेज
ऑफ वुमेन मध्ये प्रवेश
मिळावा असे वाटण्याचे कारण, हे महाविद्यालय एखाद्या
उत्तम व्यावसायिक (प्रोफेशनल) संस्थेसारखेच गुणवत्ता
आणि शैक्षणिक दर्जाला
प्राधान्य देणारे आहे.
सर्वोत्तम
दर्जा
कला आणि वाणिज्य विषयातील
सर्वोत्तम
दर्जा गेल्या कित्येक दशकांपासून
या संस्थेने जपला
आहे. या महाविद्यालयात प्रवेश
मिळाल्यानंतर विद्यार्थीनींच्या व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास तर
होतोच शिवाय आधुनिक काळातील
आव्हाने स्वीकारण्याची क्षमता
त्यांच्यामध्ये निर्माण होते. या
संस्थेचे प्लेसमेंट सेल
हे अतिशय सक्रीय असून
२०२० मध्ये १०० हून
अधिक कंपन्यांनी प्लेसमेंट
प्रक्रियेत सहभाग घेतला. अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वेगवेगळया शिष्यवृत्ती
दिल्या जातात. यामध्ये वार्ड वेलफेअर स्कॉलरशीप, केपीएमजी स्कॉलरशीप, जी.एल.बन्सल
स्कॉलरशीप, एल्सा स्कॉलरशीप, श्री ओंकार नाथ पंडित स्कॉलरशीप, श्री मनोहर श्याम जोशी
स्कॉलरशीप इत्यादी. बहुतेक सर्वविद्यार्थ्यांनी शिक्षणशुल्कात सूट (फ्रीशीप दिली जाते.) (संपर्क- लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमेन, लाजपत नगर- ४, नवी दिल्ली-११००२४,
दूरध्वनी-०११-२६४३४४५९, ईमेल-principal@lsr.du.ac.inसंकेतस्थळ-lsr.du.ac.in)
लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमेन या महाविद्यालयात
प्रवेशासाठी या गृहस्थाच्या मुलीला काही
गुण कमी मिळाले. तेव्हा त्यांनी लेडी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या तोडीस तोड अशा
महाविद्यालयाचा शोध घेतला. तेव्हा चेन्नईतील ख्रिस्त कॉलेज , कोलकत्याचे झेवियर
कॉलेज हे पर्याय समोर आले. मात्र मुंबई ही देशाची वित्तीय राजधानी असल्याने
त्यांनी मुंबईतील एन. एम. कॉलेज ऑफ कॉमर्सला पसंती दिली. स्वत:ची बदली मुंबईत करुन
घेतली.
इतके विस्ताराने ही हकिकत सांगण्याचा
हेतू हा की, जागरुक पालक वाणिज्य शाखेतील पदवीस्तरीय अभ्यासक्रमासाठीसुध्दा खूप
जागरुक असतात आणि त्यासाठी देशातील कोणत्याही उत्तम महाविद्यालयात मुलगा किंवा
मुलीला प्रवेश देतात. किती महाराष्ट्रीय पालक वाणिज्य शाखेतील प्रवेशाचा इतका
विचार करत असतील, हा प्रश्नच आहे.
आपली मानसिकता
साधारणत: आपल्याकडे अभियांत्रिकी आणि
वैद्यकीय शाखेतील प्रवेश महाराष्ट्रातच मिळाला तर बरेच बरे, अशी एक ढोबळ विचारसरणी
दिसते. नागपुरातील एखाद्या हुषार मुलाच्या पालकास वैद्यकीय प्रवेशासाठी नागपूर
येथील शासकीय महाविद्यालय किंवा इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम
मुंबई असा पर्याय दिला तर ते नागपुरातील दोन महाविद्यालयासच प्राधान्य देतील.
अभियांत्रिकीचे शिक्षण आपल्या घराजवळच झालेले बरे असाच दृष्टीकोन असतो. त्यामुळे
वाणिज्य शाखेच्या दृष्टीने तर आपल्याच राज्यातील इतर ठिकाणी प्रवेश घेण्याचा विचार
सुध्दा केला जात नाही. त्यामुळे लेडी श्रीराम कॉलेज ऑफ कॉर्मस किंवा देशातील इतर
नामवंत वाणिज्य महाविद्यालयात प्रवेशासाठी विचार करणे हे फार लांबचे राहिले.
महाराष्ट्रीय पालकांनी ही मानसिकता आता
सोडायला हवी. आपल्या गावात/शहरात जरी कला -वाणीज्य- विज्ञानशाखेतील अनेक महाविद्यालये
असली तरी त्याच ठिकाणी प्रवेश घेण्याचा विचार करणे मुलांचे करिअर व्यवस्थित आकार
घेण्याच्या दृष्टीने कुचकामी ठरु शकते. त्यामुळे वाणिज्य शाखेतील देशात सतत
आघाडीवर राहणाऱ्या महाविद्यालयांचा विचार करायला हवा. अशा महाविद्यालयांमधील
शिक्षण शुल्क कमी असते. शिवाय राहण्याचा वा इतर जो शैक्षणिक खर्च असेल तो भागवता
येणे शक्य नसल्यास, बँका शैक्षणिक कर्ज देतात. त्याचा लाभ घ्यायला हवा. या
महाविद्यालांची ख्याती मोठी असल्याने बँका सुलभतेने कर्ज देतात.
प्लेसमेंट
उद्योग आणि कंपन्यांमार्फत
प्लेसमेंटसाठी प्राधान्य देणाऱ्या सर्वोच्च महाविद्यालयांची नावे- (१) श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स- नवी दिल्ली, (२) लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमेन - नवी दिल्ली, (३) लोयोला कॉलेज चेन्नई, (४) एन.एम कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स- मुंबई, (५) मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्स मुंबई, (६) हिंदू कॉलेज दिल्ली, (७) ख्रिस्त युनिव्हर्सिटी-बेंगळुरु, (८) हंसराज कॉलेज दिल्ली, (९) रामजस कॉलेज दिल्ली, (१०) चौहान इंस्टिट्यूट ऑफ सायन्स ॲण्ड अमृतबेन जीवनलाल कॉलेज ऑफ कॉमर्स
ॲण्ड इकॉनॉमिक्स- मुंबई
या महाविद्यालयांमध्ये पुढील कंपन्या
प्लेसमेंटसाठी येतात. त्या पदवीस्तरीय उमेदवारांची निवड करतात. (१) टीसीएस, (२) डेलॉइट, (३) आयसीआयसीआय बँक, (४) केपीएमजी, (५) एचडीएफसी, (६) आरबीएल, (७) इंडस्ट्रिअल बँक, (९) एसबीआय- लाइफ, (१०) कोटक महिंद्रा,
स्पेशलायझेशन
वाणिज्य
महाविद्यालयांमधील स्पेशलायझेशनचे विषय- (१)
वित्त-फायनांस, (२)
सेल्स ॲण्ड मार्केटिंग- विक्री आणि विपणन, (३)
कंपनी सेक्रेटरी- कंपनी सचिव, (४)
कॉम्प्युटर सायन्स- संगणक शास्त्र, (५)
ट्रान्सपोर्ट ॲण्ड लॉजिस्टिक्स-वाहतूक आणि रसद, (६)
ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम मॅनेजमेंट- प्रवास आणि पर्यटन व्यवस्थान, (७)
ह्युमन रिसोर्स- मनुष्यबळ संसाधन, (८)
फायनांशिअल प्लॅनिंग ॲण्ड ॲनॅलिसीस-वित्तीय नियोजन आणि विश्लेषण, (९)
अकांउटन्सी- लेखा, (१०)
कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट अकाउंटिंग- खर्च आणि व्यवस्थापकीय लेखा
करिअर
संधी-
वाणिज्य शाखेत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम
व या विषयाशी संबंधित स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम केल्यास पुढील करिअर संधी उपलब्धक
होऊ शकतात.(1) अकाउंटन्ट, (2) फायनांस
कन्ट्रोलर, (3) अकाउंटन्ट
एक्झिक्युटिव्ह, (4) चार्टर्ड
अकाउंटन्ट (5) कंपनी
सेक्रेटरी (6) फायनांस
ॲनॅलिस्ट (7) फायनांस
कंट्रोलर (8) फायनांस
मॅनेजर (9) फायनांस
कंसलटंन्ट (10) इनव्हेस्टमेंट
ॲनॅलिस्ट (11) स्टॉक
ब्रोकर (12) पोर्टफोलिओ
मॅनेजर (13) टॅक्स
ऑडिटर (14) टॅक्स
कन्सलटंट (15) ऑडिटर
(16) स्टॅटिस्टियन
(17) इकॉनॉमिस्ट
(18) क्रेडिट
मॅनेजर (19) ज्युनिअर
अकाउंटंट (20) बूक
कीपर. (21) इंटरनेट
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह- ईकॉमर्स. (22) कार्पोरेट लॉयर.
०००
मुंबईतील
आघाडीची महाविद्यालये- (१)
नर्सी मोन्जी कॉलेज ऑफ कॉमर्स, (२)
मिठिबाई कॉलेज ऑफ आर्ट्स,
चौहान इंस्टिट्यूट ऑफ सायन्स ॲण्ड अमृतबेन जीवनलाल कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड
इकॉनॉमिक्स-स्वायत्त,(३)
के.जे.कॉलेज ऑफ कॉमर्स, (४)
के.सी.कॉलेज-मुंबई, (५)
एस के सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स ॲण्ड कॉमर्स.
पुण्यातील
आघाडीची महाविद्यालये-(१)
सिम्बॉयसीस कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स, (२)
नेस वाडीया कॉलेज ऑफ कॉमर्स ,(३)
सेंट मिरा कॉलेज फॉर गर्ल्स, (४)
इंदिरा कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड सायन्स, (५)
स्कूल ऑफ कॉमर्स-एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, (६)
सर परशुरामभाऊ कॉलेज, (७)
एमआयटी आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज
०००
सिम्बॉयसीस कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड
कॉमर्स
या संस्थेत नियमित स्वरुपाच्या बी.कॉम या
अभ्यासक्रमाशिवाय, बी.कॉम (इंटरडिसिप्लिनरी) हा
अभ्यासक्रम करता येतो. सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यास उद्योग आणि
व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन सक्षमरीत्या कार्यरत होता व्हावे आणि उच्च शिक्षण
घेण सुलभ व्हावे या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या
दुसऱ्या वर्षी स्पेशलायझेशनचा विषय निवडता येतो. स्पेशलायझेशनचे विषय - (१) बिझिनेस आंत्रप्रिन्युरशीप, (२) कॉस्टिंग, (३) ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, (४) बँकिंग ॲण्ड फायनांस, (५) मार्केटिंग मॅनेजमेंट. या अभ्यासक्रमांतर्गत लिबरल आर्ट
अभ्यासक्रमांतर्गत संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेले प्रत्येकी दोन विषय प्रत्येक
सत्रामध्ये अभ्यासावे लागतात. याचा अर्थ तीन वर्षाच्या कालावधीतील सहा सत्रांमध्ये
१२ विषयांचा अभ्यास करणे शक्य होते.
संस्थेची
पदवी स्पेशलायझेशनच्या उल्लेखासह दिली जाते. (उदा-बी.कॉम (इंटरडिसिप्लिनरी
वुइथ स्पेशलायझेशन इन..संबंधित विद्यार्थ्याने निवडलेला विषय.))
१२
वीमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित विद्यार्थ्यांची निवड केली जाते. शासनाच्या
नियमानुसार विविध संवर्गासाठी राखीव जागा ठेवल्या जातात.
संपर्क- सिम्बॉयसीस कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड
कॉमर्स, सेनापती बापट रोड, पुणे- ४११००४, दूरध्वनी-०२०-२५६५३९०३, ईमेल-contact@symbiosiscollege.edu.in, संकेतस्थळ- https://symbiosiscollege.edu.in/
0000

Comments
Post a Comment