मनाच्या डोही
मनाच्या
डोही
यंदाच्या मार्चमध्ये
हरयाणातील रितिका फोगट या महिला कुस्तिपटूने आत्महत्या करण्याची दुर्देव्यी घटना
घडली. एका स्पर्धेत मनाजोगते यश न मिळाल्याने त्यांनी हा आत्मघातकी निर्णय घेतला. या
घटनेनंतर खेळाडू आणि इतरही व्यक्तींवर सध्याच्या काळात असणाऱ्या मानसिक ताण -तणावांची
माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली.
मानसिक ताण- तणावाचा हा
विषय गेली काही वर्षे सातत्याने चर्चिला जात आहे. छोट्या छोट्या कारणांवरुन
नैराश्यात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. बाह्यत: स्थिर दिसणाऱ्या
बहुतेक व्यक्ती मानसिक अशांततेने घेरल्याचे वेगवेगळया घटनांमुळे स्पष्ट होत
चाललेय.
२०१७ साली जागतिक
आरोग्य संघटनेने, भारताचा उल्लेख जगातील सर्वाधिक नैराश्यवादी देश असा केला होता. भारतातील
१० पैकी ७ व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मानसिक व्याधीने ग्रस्त असल्याचे या
संघटनेने एका अहवालात नमूद केले.
करोनाचे धक्के
करोना विषाणू प्रादुर्भावामुळे विविध पातळयांवर नागरिकांना
मानसिक धक्के बसले आहेत. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच समावेश
होतो. करोनामुळे झालेल्या टाळेबंदीचा मोठा ताण सर्वच पातळयांवर दिसून आला. हा ताण
सहन करणे प्रत्येकालाच शक्य होईल अशी स्थिती नाही.
भारतीय मासशास्त्रीय
संस्थेने (द इंडियन सायकीॲट्री सोसायटीच्या) अहवालानुसार करोना प्रादुर्भावाच्या काळात मानसिक आजारांमध्ये २०
टक्क्यांनी वाढ झाली. बेरोजगारी, आर्थिक चणचण, आजाराची भीती, शिक्षणाचे बदलेले
स्वरुप, घरातूनच काम शैली, पगार कपात, प्रत्यक्ष संपर्क साधण्यात आलेल्या/येत
असलेल्या अडचणी, प्रवासासाठी असलेल्या मर्यादा इत्यादी कारणांनी मनावर मोठा परिणाम
झाल्याचे दिसून आले.
मानसोपचार तत्जांची गरज
देशात आजमितीस ९ ते १०
हजाराच्या आसपास मानसोपचार तज्ज्ञ आहे. भारताची सध्याची १३० कोटी ही लोकसंख्या
गृहित धरली तर प्रत्येक १ कोटी नागरिकांच्या पाठिमागे ७ ते ८ मानसोपचार तज्ज
येतात. ही दरी प्रचंड असून पुढील काळात त्यात आणखी भर पडू शकते. मानसिक आजारांच्या
निराकरणासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शनाची गरज असते. ही गरज
तातडीने भागवली गेली नाही तर संबंधित व्यक्ती/रुग्णाची मानसिक स्थिती अधिक बिघडू
शकते.
या काळात भावनिक आणि
मानसिक पाठबळाची अधिक गरज असते. रुग्णाचे प्रमाण आणि मानसोपचार तज्ज्ञ यांच्यातील
मोठी दरी भरुन काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे वळणे गरजचे आहे. किंबहुना
तसे प्रोत्साहन पालक-शिक्षक यांनी द्यायला हवे.
तणाव व्यवस्थापन
जीवनातील तणावाचे
व्यवस्थापन करुन आपले दैनंदिन जगणे सकारात्मक करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ साहाय्य
करतात. अशा तज्ज्ञांची गरज मोठी असून या क्षेत्राकडे जाणीवपूर्वक वळणाऱ्या
विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक नाही.
रुग्णांना जीवनातील
उत्साह देणारे हे करिअर संबधित विद्यार्थ्यास मनोजोगते मानधन, प्रतिष्ठा आणि
समाधान देऊ शकते.
मानसशास्त्र
करिअर दिशा
मानसशास्त्र विषयाचा
अभ्यास १२ वी नंतर करता येणे शक्य आहे. कोणत्याही ज्ञानशाखेतील विद्यार्थी
पदवीस्तरीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. पदवी स्तरावर इतर विषयांसोबत हा एक
विषय असतो. तोच पुढे पदुव्यत्तर स्तरावर स्पेशलायझेशनसाठी निवडता येतो. पदव्युतर
पदवी स्तरावरील अभ्यासक्रमानंतर करिअर करणे सुलभ जाऊ शकते. बीए, बीएस्सी इन
सायकॉलॉजी असे अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये शिकवले जातात. या क्षेत्रात अधिक
चांगल्या संधी मिळण्यासाठी परदेशातील मास्टर ऑफ सायन्स इन सायकॉलॉजी हा अभ्यासक्रम
सुध्दा करायला हरकत नाही. (उदा-मॅसॉन विद्यापीठ अमेरिका, कॅरॉल
विद्यापीठ ,हार्वर्ड विद्यापीठ, स्टॅनफोर्ड, आक्सफोर्ड,केंबिज विद्यापीठ इत्यादी)
पदव्युत्तर पदवी
अभ्यासक्रमानंतर संशोधन-अध्यापन ते खाजगी रुग्ण सेवा, सल्लागार आदी करिअर संधी
उपलब्ध होऊ शकतात..
करिअर संधी (१) क्लिनिकल
सायकॉलॉजिस्ट, (२) क्लिनिकल काउंसेलर,
(३) कम्युनिटी कांउसेलर, (४) न्युरो सायकॉलॉजी, (५) कॉग्निटिव सॉयकॉलॉजी, (६) डेव्हलपमेंटल
सायकॉलॉजी, (७) सोशल सायकॉलॉजी,
(७) ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजी, (८) स्कूल सायकॉलॉजी, (९) मेंटल सायकॉलॉजी, (१०) फॉरेंसिक
सायकॉलॉजी, (११) लर्निंग डिसऑर्डर
थेरपिस्ट (१२) संशोधक
मेंदुचा मागोवा
या अभ्यासक्रमात मेंदुबाबात अद्याप अनुत्तरीत असलेल्या प्रश्नांचा
मागोवा घेता येणे शक्य आहे. तणावाच्या काळात मेंदू कसं कार्य करतो ,भाषा
शिकण्यासाठी कसा साहाय्य करतो, अनेक बाबी स्मरणात कसा ठेवतो, मानसिक व्याधी
शरीरावर कशा तऱ्हेने परिणाम करते, अशासारख्या बाबींचे अध्ययन या अभ्यासक्रमात करता
येणे शकय होते. स्पेशलायझेशनच्या विषयांमध्ये आरोग्य, उपचार, शैक्षणिक, संशोधन, क्रीडा,
समुपदेशन, व्यवसायाशी (ऑक्युपेशनल) संबंधित, मेंदू (न्युरो) विषयक इत्यादींचा समावेश होतो.
स्पेशलायझेशनच्या विषयानुसार
सॉयकॉलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट, समाज कार्य, समुपदेशन, मनुष्यबळ व्यवस्थापन, अध्यापक
,संशोधक या भूमिकांमध्ये करिअर संधी मिळू शकते.
मानसशास्त्र
कौशल्य निर्मिती
मानसशास्त्राचा अभ्यासक्रम
केल्यानंतर पुढील कौशल्ये प्राप्त करता येतात- (१) व्यामिश्र स्वरुपाच्या
सांख्यिकी माहितीचे विश्लेषण, (२) संवाद
आणि समुदायासोबत काम करण्याचे कौशल्य, (३) सांख्यिकी माहिती हाताळण्यासाठीचे तांत्रिक कौशल्य, (४) संशोधनातील निष्कर्ष लेखी आणि मौखिकरीत्या
प्रभावीरीत्या सादर करण्याचे कौशल्य, (५) शास्त्रीय तथ्यांना सुलभतेने समजून घेण्याचे कौशल्य, (६) विविधांगी बाजूंनी समस्येचे निराकरण करणाऱ्या
शैलीचा विकास, (७) विविध अनुभव आणि
भावनांबद्दल संवेदनशीलतेने विचार करण्याचे कौशल्य, (८) माहिती गोळा करण्याचे, निरीक्षण आणि एखाद्या प्रकरणाचा (केस) सखोल अभ्यास, (१०) समस्यांचे निर्धारण करण्याचे कौशल्य.
मानसशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम चालविणाऱ्या महत्वाच्या संस्था- (१) लेडी श्रीराम कॉलेज ऑफ
वुमेन दिल्ली, (२) झेव्हियर कॉलेज मुंबई, (३) फर्ग्युसन कॉलेज पुणे, (४) के.जे.सोमय्या
कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स ॲण्ड कॉमर्स-मुंबई, (५) जयहिंद कॉलेज मुंबई, (६) रामनारायण
रुइया कॉलेज- मुंबई, (७) के.सी कॉलेज
-मुंबई, (८) वझे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स
ॲण्ड कॉमर्स- मुंबई (९) आबासाहेब
गरवारे कॉलेज पुणे, (१०) सिम्बॉयसीस
कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स, (११) विल्सन
कॉलेज मुंबई, (१२) एलफिंन्स्टन
कॉलेज-मुंबई, (१३) अबेदा इनामदार
सिनिअर कॉलेज पुणे, (१४) एसआयइएस कॉलेज
ऑफ आर्ट्स, सायन्स ॲण्ड कॉमर्स- मुंबई, (१५) एस.एफ.एस कॉलेज-नागपूर (१६) डी.वाय.पाटील
आर्ट्स, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेज -पिंपरी चिंचवड, (१७) रुपारेल कॉलेज मुंबई, (१७) दुर्गाबाई
सराफ ऑर्ट्स,कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज मुंबई (१८) रहेजा कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स मुंबई, (१९) फ्लेम युनिव्हर्सिटी-पुणे, (२०) एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी पुणे, (२१) अशोका युनिव्हर्सिटी-सोनपत (२२) ख्रिस्त युनिव्हर्सिटी बेंगळुरु,
०००
बी.ए
सॉयकॉलॉजी (ऑनर्स )
§ पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बी.ए सॉयकॉलॉजी (ऑनर्स) हा अभ्यासक्रम शिकवला जातो. तीन वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रम सहा
सत्रांमध्ये पूर्ण करण्यात येतो. काही विषय घटक- सामाजिक मानसशास्त्र, मानसशास्त्राचा
विकास, आरोग्य मानसशास्त्र, समाजिक मानसशास्त्र, मानशास्त्रीय परीक्षण आणि
सांख्यिकी, ॲबनॉर्मल मानसशास्त्र, औद्योगिक संस्थात्मक मानसशास्त्र, समुपदेशन
मानसशास्त्र.
याच
महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी (एम.ए)
अभ्यासक्रमासोबतच सर्टिफिकेट इन कांउसेलिंग सायकॉलॉजी हा अभ्यासक्रमही करता येतो. संपर्क- www.fergusson.edu
डिप्लोमा
इन काउंसेलिंग
मुंबईतील झेवियर कॉलजने, पोस्ट
ग्रज्युएट डिप्लोमा इन काउंसेलिंग हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. मानसशास्त्र, सामाजिक
कार्य किंवा मनुष्यबळ विकास या विषयात पदव्युत्तर पदवी (एमए) अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी हा अभ्यासक्रम करु शकतात.
याच संस्थेत, सर्टिफिकेट कोर्स इन पर्सनल काउंसेलिंग हा चार महिने
कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. अर्हता- कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण,
संपर्क संकेतस्थळ- http://xaviers.edu/
०००
शिष्यवृत्ती
कीप
इंडिया स्मायलिंग फाऊंडेशन शिष्यवृत्ती
ही शिष्यवृत्ती कोलगेट पामोलिव्ह कंपनीने सुरु केली आहे. १० वी
नंतरचे पदविका , पदवीस्तरीय आणि एक वर्ष कालावधीच्या व्होकेशनल अभ्यासक्रमांना
प्रवेश घेतलेल्या गरजू विद्यार्थ्याना या शिष्यवृत्तीअंतर्गत आर्थिक साहाय्य दिले
जाते. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांस दहावीमध्ये किमान
७५ टक्के किंवा १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या
उमेदवाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
याशिष्यवृत्ती अंतर्गत दरवर्षी ३० रुपयांचे साहाय्य किमान ३ वर्षांसाठी केले जाते
संपर्क- दूरध्वनी- ०११- ४३०९२२४८, ईमेल- keepindiasmiling@buddy4study.com

Comments
Post a Comment